साधा डोसा खाऊन कंटाळलात? मग सकाळच्या नाश्त्यात नक्की बनवा कुरकुरीत Cheese Schezwan Dosa, नोट करा रेसिपी
दक्षिण भारतीय संस्कृती आणि पदार्थ भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये फेमस आहे. दक्षिण भारतात तांदूळ आणि उडीद डाळीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ म्हणजे इडली, डोसा आणि मेदुवडा. हे पदार्थ पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये कायमच डोसा बनवला जातो. पण नेहमीच साधा डोसा खाऊन कंटाळा आल्यास काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर झटपट तुम्ही चीज शेजवान डोसा बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा मस्त लागते. चीज, शेजवान चटणी आणि विविध भाज्यांचा वापर करून बनवलेला डोसा चवीसोबत शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा पाहुणे घरी आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी सुद्धा चीज शेजवान डोसा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)






