Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

Recipe : शिमला मिरचीची बोरींग भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर यावेळी गावराण पद्धतीची भरली शिमला मिरची बनवून पाहा. ही डिश भाकरी किंवा चपातीसोबत फार लज्जतदार लागते आणि रात्रीच्या जेवणासाठी ए

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 21, 2026 | 09:28 AM
Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

Follow Us
Follow Us:
  • गावाकडे भरलेली शिमला मिरची फार आवडीने खाल्ली जाते.
  • शिमला मिरचीची भाजी आवडत नसल्यात तुम्ही ही रेसिपी ट्राय करु शकता.
  • फार झटपट आणि कमी वेळेत रेसिपी तयार होते.
शिमला मिरचीची भाजी नेहमीच्या पद्धतीने खाण्यापेक्षा तिच्यात मसालेदार आणि झणझणीत गावरान सारण भरून केली, तर साध्या जेवणाची चवच बदलून जाते. भाजलेल्या शेंगदाण्याचा खमंगपणा, खोबऱ्याची चव, कांदा आणि खास घरगुती मसाल्यांचा तिखट-झणझणीत स्वाद यामुळे ही भरलेली शिमला मिरची अतिशय रुचकर लागते. गावाकडच्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही भाजी गरमागरम भाकरी, पोळी किंवा वरण-भातासोबत छान लागते. विशेष म्हणजे सारण आधी हलके भाजून घेतल्यामुळे त्याचा सुगंध आणि चव अधिक खुलते. चला रेसिपी नोट करून घेऊयात.

Recipe : जेवणाचा बेत खास करायचा विचार आहे? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईस ‘पनीर टिक्का मसाला’, चव चाखूनच मन होईल खुश

साहित्य

  • ५ ते ६ मध्यम आकाराच्या शिमला मिरच्या
  • १ मोठा कांदा, बारीक चिरलेला
  • १/२ कप भाजलेले शेंगदाणे
  • २ टेबलस्पून सुके खोबरे
  • १ टेबलस्पून बेसन
  • १ ते २ हिरव्या मिरच्या
  • १ टीस्पून लाल तिखट
  • १/२ टीस्पून हळद
  • १ टीस्पून गोडा मसाला
  • १/२ टीस्पून जिरे
  • १/२ टीस्पून मोहरी
  • १/२ टीस्पून जिरेपूड
  • १ टीस्पून धणेपूड
  • चवीनुसार मीठ
  • २ ते ३ टेबलस्पून तेल
  • थोडी कोथिंबीर
साधा डोसा खाऊन कंटाळा आला आहे? मग सकाळच्या नाश्त्यात नक्की बनवा कुरकुरीत Cheese Schezwan Dosa, नोट करा रेसिपी

कृती

  • शिमला मिरच्या स्वच्छ धुऊन पुसून घ्या. त्यांचा देठ आणि बिया काढून आतून स्वच्छ करा. मिरची पूर्णपणे फोडू नये, जेणेकरून त्यात सारण व्यवस्थित भरता येईल.
  • भाजलेले शेंगदाणे आणि सुके खोबरे थोडे जाडसर कुटून घ्या. कढईत थोडे तेल गरम करून कांदा आणि हिरवी
  • मिरची परता. कांदा सोनेरी झाला की बेसन घालून मंद आचेवर हलके भाजा.
  • आता कुटलेले शेंगदाणे-खोबरे, हळद, लाल तिखट, गोडा मसाला, धणेपूड, जिरेपूड आणि मीठ घाला. सर्व मिश्रण
  • नीट एकजीव करून दोन ते तीन मिनिटे परता. सारण कोरडे राहिले पाहिजे.
  • तयार केलेले सारण थोडे थंड होऊ द्या. त्यानंतर प्रत्येक शिमला मिरचीमध्ये भरपूर सारण भरून घ्या. सारण बाहेर पडणार नाही याची काळजी घ्या.
  • कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे तडतडू द्या. त्यावर भरलेल्या शिमला मिरच्या सावधपणे ठेवा. झाकण ठेवून मंद आचेवर मिरच्या शिजू द्या.
  • मिरच्या अधूनमधून हलक्या हाताने फिरवत राहा, जेणेकरून त्या सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजल्या जातील. मिरची
  • मऊ होऊन बाहेरून थोडी खरपूस झाली की भाजी जवळपास तयार आहे.
  • शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि एक मिनिट झाकण ठेवून गॅस बंद करा. गरमागरम गावरान
  • भरलेली शिमला मिरची भाकरी, पोळी किंवा वरण-भातासोबत सर्व्ह करा.

Web Title: How to make stuffed shimla mirchi at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 09:28 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
1

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
2

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
3

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी
4

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.