पारंपरिक पद्धतीने घरी बनवा सुंठगोळी
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर हवामानात मोठा बदल होतो. वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे साथीच्या आजारांची लागण होते. दमट आणि थंड वातावरणामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. या दिवसांमध्ये सर्दी, खोकला, ताप, अपचन आणि त्वचारोग होण्याची जास्त शक्यता असते. कारण दूषित पाणी, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सर्दी, खोकला झाल्यानंतर घसा सतत खवखवतो. अशावेळी मेडिकलच्या कोणत्याही गोळ्यांचे सेवन करण्याऐवजी सुंठगोळीचे सेवन करावे. आरोग्यासाठी सुंठ अतिशय गुणकारी आहे. सुकवलेल्या आल्याला सुंठ म्हणतात. यामध्येदाहक विरोधी गुणधर्म, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म आढळून येतात. सुंठ खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते. पित्त, गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीने सुंठगोळी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)