सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा रताळ्याचे गोड काप
रोजच्या आहारात रताळ्याचे नियमित सेवन करावे. रताळी खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण आपल्यातील अनेकांना रताळी खायला आवडत नाहीत. अशावेळी तुम्ही मुलांसह मोठयांनासुद्धा रताळ्यांपासून इतर वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ घालू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये रताळ्याचे गोड काप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. उपवासाच्या दिवशी सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवून खाऊ शकता. उपवासाच्या दिवशी नेहमीच साबुदाणे खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही रताळ्यांपासून चविष्ट पदार्थ बनवू शकता. बाजारात रताळी सहज उपलब्ध होतात. यामध्ये फायबर्स, विटामिन ए, विटामिन सी आणि बी-6, पोटॅशियम, मॅग्ननिज इत्यादी अनेक घटक आढळून येतात. रताळ्यांमध्ये असलेले एंटीऑक्सिडेंट्स त्वचा तरुण ठेवण्यासाठी मदत करतात. चला तर जाणून घेऊया रताळ्याचे गोड काप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
वर्षभर टिकणारे लसूण लोणचं सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा, भाकरी चपातीसोबत लागेल चविष्ट