उन्हाळ्यात लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा हेल्दी टेस्टी नाचणीच्या पौष्टिक वड्या
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वच लहान मुलांना शाळेला सुट्ट्या असतात. सुट्टीच्या दिवसांमध्ये मुलं घरी असल्यानंतर त्यांना सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी खाण्यास काय द्यावं? असे अनेक प्रश्न सतत पालकांच्या मनात येत असतात. नाश्त्यात नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी मुलांना बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यास दिले जातात. पण तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सतत सेवन केल्यामुळे लहान मुलांची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुलांना बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यास देण्याऐवजी घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करण्यास द्यावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नाचणीचे वडी कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.(फोटो सौजन्य – iStock)
वर्षभर टिकणारे लसूण लोणचं सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा, भाकरी चपातीसोबत लागेल चविष्ट