सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट व्हेज टोमॅटो आमलेट
सकाळच्या नाश्त्यात किंवा ऑफिसच्या डब्यात नेहमीच काय बनवावं? असे अनेक प्रश्न महिलांना नेहमीच पडतात. नाश्त्यामध्ये कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी सोप्या पद्धतीमध्ये आणि झटपट तुम्ही टोमॅटो आमलेट बनवू शकता. आमलेट हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. कारण कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट आमलेट तयार होते. नाश्त्यामध्ये बऱ्याचदा अंड्याचे आमलेट आणि पाव खाल्ले जाते. तुम्ही अंड्यापासूनच नाहीतर इतर शाहाकरी पदार्थांपासून सुद्धा आमलेट बनवू शकता. टोमॅटो हा पदार्थ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात तुम्ही या पदार्थाचे सेवन करू शकता. सकाळच्या वेळी नेहमीच पोटभर आणि पौष्टिक नाश्ता करावा. कारण सकाळच्या वेळी उपाशी राहिल्यास आरोग्यासंबंधित गंभीर आजार शरीराला लगेच घेरतात. यामुळे आजारपण वाढू लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये टोमॅटो आमलेट बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
कोकणी पद्धतीमध्ये फणसाच्या आठळ्यांपासून बनवा चमचमीत भाजी, आवडीने खाल्लं पारंपरिक पदार्थ
घरी आलेल्या पाहुण्यांना खाऊ घाला टेस्टी मोनॅको बिस्कीट चाट; 10 मिनिटांची रेसिपी