कोकणी पद्धतीमध्ये फणसाच्या आठळ्यांपासून बनवा चमचमीत भाजी
उन्हाळाच्या दिवसांमध्ये कोकणासह बाजारात सुद्धा मोठ्या प्रमाणावर फणस उपलब्ध असतात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फणसाचे गरे खायला खूप आवडतात. फणसाच्या गऱ्यांचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे कापा फणस आणि दुसरा म्हणजे रसाळ फणस. कापा फणसाच्या आतील गऱ्यांपासून चविष्ट भाजी बनवली जाते तर रसाळ फणस पिकल्यानंतर त्यापासून साठ किंवा इतर अनेक पदार्थ बनवले जातात. फणसाचे गरे खाल्यानंतर त्यातील आठळ्या शिजवून किंवा भाजून खाल्ल्या जातात. यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, जीवनसत्त्वे आणि फायबर इत्यादी अनेक गुणकारी घटक आढळून येतात. मात्र आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये फणसाच्या आतील आठळ्यांपासून चविष्ट भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. यापद्धतीने बनवलेली चमचमीत भाजी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.(फोटो सौजन्य – iStock)
जगन्नाथपुरीच्या मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाते पौष्टिक पेय, चवीसह आरोग्यासाठी ठरेल गुणकारी