Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिखट चटकदार खमंग चवीचा गावरान स्टाईल भडांग घरी कसा तयार करायचा? रेसिपी जाणून घ्या

Bhadang Recipe : भडांग म्हणजे महाराष्ट्राचा झणझणीत नाश्ता, कुरकुरीत आणि चटकदार! हलक्या भुकेला भागवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. एकदाच बनवून तुम्ही महिनोंमहिने त्याला साठवून ठेवू शकता आणि याच्या चवीचा आनंद लूटू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 21, 2025 | 09:30 AM
तिखट चटकदार खमंग चवीचा गावरान स्टाईल भडांग घरी कसा तयार करायचा? रेसिपी जाणून घ्या

तिखट चटकदार खमंग चवीचा गावरान स्टाईल भडांग घरी कसा तयार करायचा? रेसिपी जाणून घ्या

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र हा संस्कृती, परंपरा आणि चव यांचा खजिना आहे. प्रत्येक प्रांत, प्रत्येक गावाला स्वतःची खासियत आहे. महाराष्ट्रातील खानपानात तिखट-चटकदार स्नॅक्सचा एक वेगळाच ठसा उमटतो. यामध्ये भडांग ही एक लोकप्रिय पारंपरिक डिश आहे, ज्याची रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत. भडांग म्हणजे कुरकुरीत लाह्या (मुरमुरे) आणि मसाल्यांचा धमाकेदार संगम. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि विदर्भात तर भडांग अगदी रोजच्या जीवनाचा भाग आहे.

सकाळच्या कामात, घाईगडबडीच्या वेळी नाश्त्यासाठी झटपट बनवा ‘इंन्सटंट उपमा’

लाल तिखटाचा झणझणीतपणा, लसूण-खोबऱ्याची खमंग चव आणि मुरमुऱ्यांचा हलका पण भरपूर भूक भागवणारा स्पर्श, हे सगळं मिळून भडांगला एक अनोखी ओळख मिळते. भडांग हा केवळ चहा सोबतचा नाश्ता नाही तर लांब प्रवासातही सहज नेता येतो, कारण तो जास्त दिवस टिकतो. तुम्ही याला घरी बनवून अनेक महिने साठवून ठेवू शकता. संध्याकाळची हलकी भूक भागवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. चला तर मग लगेच जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • मुरमुरे (लाह्या) – ४ कप
  • शेंगदाणे – ½ कप
  • सुकं खोबरं (चिरलेलं) – ¼ कप
  • लसूण पाकळ्या – ८ ते १०
  • मोहरी – १ टीस्पून
  • हिंग – १ चिमूट
  • हळद – ½ टीस्पून
  • लाल तिखट – २ टीस्पून (तिखट आवडीनुसार कमी-जास्त करा)
  • कढीपत्ता – ८ ते १० पाने
  • मीठ – चवीनुसार
  • साखर – १ टीस्पून (ऐच्छिक, पण चवीत छानपणा येतो)
  • तेल – ३ टेबलस्पून
सुगंधित आणि सौम्य चवीने भरलेली कोलकात्याची नवाबी चिकन बिर्याणी बनवा घरच्या घरी; आजच नोट करा रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम कढईत मुरमुरे हलकेसे कोरडे भाजून घ्या, म्हणजे त्यांची कुरकुरीतपणा टिकून राहील. बाजूला ठेवा.
  • त्याच कढईत शेंगदाणे सोनेरी होईपर्यंत भाजा आणि एका वाटीत काढा.
  • थोडं तेल टाकून खोबरं सोनेरी होईपर्यंत परता. नंतर लसूण पाकळ्या हलक्या तांबूस होईपर्यंत भाजा.
  • उरलेल्या तेलात मोहरी टाका. तडतडल्यावर कढीपत्ता, हिंग, हळद, लाल तिखट टाकून छान फोडणी करा.
  • फोडणीत भाजलेले मुरमुरे, शेंगदाणे, खोबरं व लसूण टाकून छान मिसळा.
  • आता त्यात मीठ व साखर घालून पुन्हा एकदा मिक्स करा.
  • मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा.
  • गरमागरम चहा सोबत भडांग अप्रतिम लागतो.
  • त्यावर थोडं कांदा, कोथिंबीर, लिंबूरस घालून झटपट भेलसारखा स्वाद घेऊ शकता.
  • लांब प्रवासासाठी हे परफेक्ट स्नॅक आहे कारण जास्त दिवस खराब होत नाही.

FAQs (संबंधित प्रश्न)

भडांग हेल्दी आहे का?
ते तळलेले नसून हलके भाजलेले असल्याने ते एक आरोग्यदायी नाश्ता मानले जाते, ज्यामुळे ते पोटासाठी हलके होते.

भडांग कुठे जास्त लोकप्रिय आहे?
महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर भागात भडंग हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो.

Web Title: How to make village style crispy and spicy bhadang at home recipe in mara thi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

कांदा-लसूणचा वापर न करता अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा लाल भोपळ्याचे चविष्ट भरीत, पचनासाठी अतिशय हलका पदार्थ
1

कांदा-लसूणचा वापर न करता अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा लाल भोपळ्याचे चविष्ट भरीत, पचनासाठी अतिशय हलका पदार्थ

Monsoon Special Recipe: पावासाळ्यात एकदा तरी घरी नक्की बनवा कुरकरीत आणि स्वादिष्ट ‘मिरची भजी’
2

Monsoon Special Recipe: पावासाळ्यात एकदा तरी घरी नक्की बनवा कुरकरीत आणि स्वादिष्ट ‘मिरची भजी’

मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चीज स्वीट कॉर्न सँडविच, नोट करून घ्या रेसिपी
3

मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चीज स्वीट कॉर्न सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

कच्चे बीट खाल्ल्यानंतर पचन होत नाही? मग झटपट बनवा बीटरूट सॅलड, अशक्तपणा- रक्ताची कमतरता निघेल भरून
4

कच्चे बीट खाल्ल्यानंतर पचन होत नाही? मग झटपट बनवा बीटरूट सॅलड, अशक्तपणा- रक्ताची कमतरता निघेल भरून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.