लग्न होण्यापूर्वी किंवा लग्नानंतर पती पत्नीमध्ये अनेक छोटी मोठी भांडण होत असतात. घरात होणारे छोटे मोठे मतभेद ही सर्व सामान्य आहेत. पण काहीवेळा या भांडणांना एक वेगळेच स्वरूप लागते. घरात झालेली छोटी मोठी भांडण जास्त वाढू नये यामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. नात्यातील गोडवा कायम टिकवून ठेवण्यासाठी आधी झालेली भांडण वाढवू नये. नात्यामध्ये कमीत कमी वाद कसे होतील यावर लक्ष दिल तर नात्यामध्ये गोडवा वाढेल. पण अनेक प्रयत्न करूनसुद्धा घरामध्ये वाद होत असेल तर पत्नीने पतीला असे काही बोलू नये ज्यामुळे आणखीन भांडण होतील. पती पत्नीची भांडण झाल्यानंतर पत्नीने पतीला काय बोलू नये हे जाणून घेऊया..
जुन्या चुकांची आठवण करू देऊ नये:
ज्यावेळी पती पत्नीमध्ये भांडण होतात तेव्हा त्यांनी पूर्वी झालेल्या वादाबद्दल काही बोलू नये. यामुळे आणखीन भांडण वाढण्याची शक्यता असते. काहीवेळेस यामुळे नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. नात्यातील दुरावा कमी करण्यासाठी पती पत्नीने भांडण टाळावी. भांडण चालू असताना पत्नीने पतीला जुन्या भांडणाची आठवण करून देऊ नये.
[read_also content=”पांढरे केस काळे करण्यासाठी केसांना लावा अंजीर हेअर मास्क https://www.navarashtra.com/lifestyle/apply-fig-hair-mask-on-hair-to-turn-white-hair-black-nrsk-535792.html”]
भांडण सोडवण्याची घाई करू नये:
भांडण झाल्यानंतर ती सोडवण्यासाठी घाई करू नये. काहीवेळेस भांडण आणखीन गंभीर होण्याची शक्यता असते. भांडण झाल्यानंतर घरातील वातावरण शांत झाल्यानंतर बोलावे. रागावलेल्या नवऱ्याला समजवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा राग आणखी वाढण्याची शक्यता असते. काहीवेळेस आपण जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करू नका.
समस्येचे निराकरण करण्याचा आव आणू नये:
जर तुमचे पतीसोबत वाद झाले असतील तर समस्येचे निवारण करण्याचा आव आणू नये. तुम्हाला सर्व काही ठीक करायचे असेल तर मनापासून भांडण मिटवण्याचा प्रयत्न करावा. खोट्या भावना व्यक्त करून एखाद्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळे लगेच माफी मागायला जाऊ नये.
[read_also content=”कडक उन्हाळ्यात उष्माघातापासून वाचण्यासाठी घरी बनवा चिया सीड्स गुलाब सरबत https://www.navarashtra.com/lifestyle/homemade-chia-seeds-gulab-sarbat-to-escape-from-heat-stroke-in-hot-summer-nrsk-535349.html”]
पतीच्या नातेवाईकांवर भाष्य करू:
पती पत्नीची भांडण झाल्यानंतर पतीच्या नातेवाइकांबद्दल कोणत्याही गोष्टी बोलू नये. तसेच एकमेकांच्या नातेवाईकांवर कोणत्याही कमेंट करू नये. यामुळे नातेसंबंध खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पती पत्नीमधील वाद शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करावा.