नवजात मुलांच किंवा लहान मुलांचं संगोपन हे नेहमी काळजीपूर्वक करायला हवे. याचे मुख्य कारण म्हणजे, लहान मुलांची त्वचा फार मुलायम असते ज्यामुळे ती लगेच खराब होऊ शकते. प्रत्येक आई आपल्या लहान मुलाचे संगोपन मायेने आणि प्रेमाने करत असते. अनेकदा बऱ्याच महिला आंघोळीनंतर आपल्या मुलाला टॅल्कम पावडर लावत असतात. तुम्हीही असे करता का? होय, तर आतापासूनच सावध राहा. टॅल्कम पावडरमध्ये वापरण्यात येणारे घटक शरीरासाठी घातक ठरू शकतात.
कर्करोगाचा धोका?
नुकतेच एका अभ्यासामधून असे दिसून आले आहे की, यामध्ये वापरण्यात येणारे घटक हे कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका वाढवू शकतात. यामध्ये टॅल्कम पावडरबरोबरच इतर कॉस्मॅटिक प्रोडक्टसचाही समावेश आहे. अलीकडेच, अनेक कंपन्यांच्या टॅल्कम पावडरमध्ये एस्बेस्टोस नावाचा एक घटक असू शकतो अशी चिंता शास्त्रज्ञांनी अभ्यासात व्यक्त केली आहे. संशोधक एस्बेस्टोसला गंभीर रोग वाढवण्याचा मानतात, यामुळे कर्करोगाचा धोका देखील होऊ शकतो.
टॅल्कम पावडरची चाचणी करणे आवश्यक
‘टॅल्क’ हे पृथ्वीवर आढळणारे एक खनिज आहे. ओलावा शोषून घेण्यासाठी आणि घर्षण कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि म्हणूनच अनेक कंपन्या बेबी पावडर, आय शॅडो आणि इतर प्रोडक्टसमध्ये याचा वापर करत असतात. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, एस्बेस्टोसचा घेतल्याने कर्करोगाचा धोका वाढू शकतो. म्हणूनच, कंपन्यांनी खाणकामाच्या ठिकाणे काळजीपूर्वक निवडली पाहिजेत. तसेच टॅल्कची नियमितपणे चाचणी करणे महत्त्वाचे आहे.
कोणती पावडर वापरू नये
अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या म्हणण्यानुसार, लहान मुलांना कोणत्याही प्रकारची पावडर लावू नये, मग ते टॅल्क आधारित असो व नसो. आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारच्या पावडरचे कण शरीरात गेल्यास लहान मुलांना फुफ्फुसाचा त्रास होऊ शकतो. तसेच जे लोक नियमित पावडर वापरतात, जे त्यांचा वास घेतात त्यांच्या शरीरात कर्करोगाचा शोक वाढू शकतो. टॅल्कम पावडर आणि कर्करोग यांच्यातील संबंध 100 टक्के स्पष्ट झालेले नाहीत, मात्र त्यापासून दूर राहणेच सुरक्षित मानले जाते. त्यामुळेच तुम्हीही तुमच्या मुलांना टॅल्कम पावडर वापरत असाल तर वेळीच सावध रहा आणि यांचा वापर बंद करा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






