फोटो सौजन्य - Social Media
काय म्हणते पोस्ट?
Mouni Roy आणि Suraj Nambiar ने दोघांनी Collabe करून सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले आहे की, “माध्यमांतील काही घटकांकडून आमच्या खासगी आयुष्याबाबत होत असलेल्या अनावश्यक आणि अतिरेकी चर्चेमुळे आम्हाला निराशा वाटत आहे. आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा काळ शांततेत व खासगीपणे हाताळण्यासाठी आम्ही स्वतःला वेळ देत आहोत. आमच्या नात्याबाबत अनेक काल्पनिक कथा आणि चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, त्या गोष्टी आमच्या नात्याची खरी बाजू मांडत नाहीत. आयुष्यातील बदलत्या प्राधान्यांचा विचार करून आम्ही परस्पर आदर आणि समजुतीने स्वतंत्र मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या आम्ही हा टप्पा संयमाने आणि गोपनीयतेने पार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. पुढील काळातही आमच्यातील मैत्री कायम राहावी, अशी आमची इच्छा आहे. आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल आणि या काळात दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो – मौनी आणि सूरज”
तसेच पोस्टखाली Mouni ने कॅप्शन दिले आहे. कॅप्शनमध्ये तिने Media ला हात जोडून विनंती करत नमूद केले आहे की, “या कठीण काळात आम्हाला आमची गोपनीयता आणि सन्मान जपण्याची संधी द्यावी, ही नम्र विनंती. माझ्याबद्दल किंवा सूरजबद्दल कोणत्याही खोट्या कथा आणि अफवा पसरवू नयेत. सर्वांनी आमच्या खासगी आयुष्याचा आदर करावा, अशी अपेक्षा आहे. तसेच सर्व माध्यम संस्थांना हात जोडून विनंती आहे की, कृपया या विषयावर अनावश्यक चर्चा आणि अफवा थांबवाव्यात. – सूरज आणि मौनी”
चर्चेला आले होते उधाण!
Mouni च्या कालच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण आले होते. अनेकांना माध्यमांनी तर असे जाहीर केले होते की, “Mouni चा पती Suraj Nambiar ( दुबई स्थित भारतीय व्यावसायिक) मौनीच्या प्रसिद्धीचा आणि पैशांचा आजवर वापर करत आला आहे, त्यामुळे त्या दोघांच्यात खटके उडत आहेत. परंतु, या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचे Mouni ने सांगितले असून अशी विनंतीदेखील केली आहे.






