दिवंगत अजित दादा यांनी पालकमंत्री म्हणून बीडची दहा महिने जबाबदारी घेतली अनेक प्रकल्प बीड शहरात व जिल्ह्यात हाती घेतले होते. त्या प्रकल्पांना चालना मिळावी आणि प्रकल्प पूर्णत्वाकडे गेले पाहिजे या अनुषंगाने गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीमध्ये 11 विविध विकास कामांच्या संदर्भात प्रशासनाला सूचना केल्या. दादांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही आमदार पंडित यांनी सांगितलं. रेशीम पार्क, एमआयडीसी जमीन अधिग्रहण, बीड शहराचा पाणीपुरवठा तारांगण, विमानतळ, आयटी पार्क, जिल्हा क्रीडांगण अशा विविध विषयावर आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.