देशभरात सगळीकडे कडक उन्हाळा (Summer) वाढला आहे. उन्हामुळे सर्वच नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाचा त्रास वाढल्यानंतर आरोग्यसंबंधित समस्या वाढू लागतात. या वाढत्या उन्हात थंडावा मिळवण्यासाठी घरात पंखा,कुलर, एसी सुद्धा लावला जातो. पण उष्णता वाढल्याने आरोग्यावर त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. उन्हातून बाहेर जाऊन आल्यानंतर शरीर डिहायड्रेट होण्यास सुरुवात होते. त्यामुळे उन्हाळ्यात बाहेर जाऊन आल्यानंतर शरीराला हायड्रेट करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. तसेच उन्हाळ्यात त्वचा रोग जास्त प्रमाणात उद्भवतात. घाम आल्यानंतर त्वचेवर पुरळ येणे, फोड, मुरूम येणं यांसारख्या अनेक समस्या जाणवू लागतात. घामोळं आल्यानंतर त्वचा लाल होऊन संपूर्ण शरीराला खाज येते. या खाजीमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हैराण झाले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
उन्हाळयात घामोळ्याची समस्या वाढली आहे. घामोळं आल्यानंतर आपण बाजारात मिळणारे अनेक क्रीम आणि पावडर लावतो. पण त्याचा फार काळ शरीरावर प्रभाव दिसून येत नाही. घामोळं आल्यानंतर संपूर्ण शरीराला खाज येते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घामोळ्यापासून बचाव करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्याने तुमचं घामोळं कमी होऊन खाजीपासून सुटका मिळेल. चला तर जाणून घेऊया घामोळ्यापासून वाचण्यासाठी घरगुती उपाय.
[read_also content=”पांढऱ्या रंगाच्या बटाट्यांऐवजी जेवणात वापरा लाल बटाटा, शरीराला होतील फायदे https://www.navarashtra.com/lifestyle/benefits-of-red-potato-in-health-538538.html”]
थंड पाण्याने अंघोळ करणे:
उन्हाळ्यात घामोळं आल्यानंतर थंड पाण्याने अंघोळ केली पाहिजे. यामुळे त्वचेवरील रोमछिद्र उघडण्यास मदत होईल. उन्हाळ्यामध्ये दिवसातून दोनदा अंघोळ करावी. यामुळे उष्णतेपासून शरीराला आराम मिळतो. तसेच शरीर थंड राहण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो थंड पाण्याने अंघोळ करावी. यामुळे घामोळं कमी होण्यास मदत होते.
नारळाचे तेल:
नारळाचे तेल जसे केस आणि चेहऱ्याचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी केला जातो तसाच वापर घामोळ्यांपासून बचाव करण्यासाठी केला जातो. घामोळं आलेल्या त्वचेवर झोपण्याआधी नियमित खोबऱ्याचे तेल लावून झोपल्याने त्वचेतील उष्णता कमी होते. त्वचेतील जळजळ कमी होऊन खाजीपासून आराम मिळतो.
[read_also content=”उन्हाळ्यात नारळ पाण्यापासून घरी बनवून पाहा किवी नारळ पाणी कूलर navarashtra.com/lifestyle/try-homemade-kiwi-coconut-water-cooler-for-summer-538506/”]
सुती कपडे घालणे:
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो सुती किंवा मऊ कपडे घालते पाहिजेत. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळ्यामध्ये पांढऱ्या आणि लाईट रंगाचे कपडे घालण्यास प्राधान्य दिले पाहिजे. लाईट रंगाचे कपडे घातल्याने शरीरात जास्त उष्णता जाणवत नाही. शरीर थंड राहून घामोळ्यांचा त्रास कमी होतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.