डोळ्यांखाली काळी झालेली त्वचा उजळदार करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील प्रभावी
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, पाण्याची कमतरता आणि अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळ येतात. हल्ली डार्क सर्कल्स येणे ही अतिशय सामान्य समस्या झाली आहे. डोळ्यांखालील त्वचा काळी झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. याशिवाय सतत लॅपटॉप किंवा स्किन जास्त वेळ पाहिल्यामुळे डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे किंवा डोळ्यांमधून सतत पाणी येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. डोळ्यांखाली आलेले काळे डाग घालवण्यासाठी वेगवेगळ्या क्रीम किंवा इतर स्किन ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. मात्राव यामुळे काहीकाळच त्वचा अतिशय सुंदर दिसते . मात्र कालांतराने तुम्हाला एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते.(फोटो सौजन्य: Pinterest)
वय वाढलं तरी चिंता नको! पन्नाशीतील महिलांनी अंगीकाराव्यात ‘या’ ५ सवयी
डोळ्यांखाली आलेले काळे डाग घालवण्यासाठी शरीरास आवश्यक असलेली झोप पूर्ण करणे आवश्यक आहे. शांत आणि आरामदायी झोप पूर्ण केल्यास तुम्ही कायमच फ्रेश आणि सुंदर दिसता. आज आम्ही तुम्हाला डोळ्यांखाली आलेले काळे डाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर आणि चमकदार होते. यामुळे डोळे कायमच सुंदर आणि देखणे दिसतात.
डार्क सर्कल्सच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे. याशिवाय बदाम तेल डोळ्यांना लावावे. हाताच्या बोटांवर तेल घेऊन हलक्या हाताने संपूर्ण डोळ्यांखाली लावून मसाज करावा. रात्री झोपण्याआधी हा उपाय नियमित केल्यास डोळ्यांखाली वाढलेले काळे डाग कमी होतील.
कापसाच्या गोळ्यावर गुलाब पाणी ओतून डोळ्यांवर ठेवावे. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो. याशिवाय जास्त वेळ स्किन पाहिल्यामुळे डोळ्यांवर वाढलेला तणाव कमी होण्यास मदत होईल. गुलाब पाण्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. पण डार्कसर्कल्स मोठ्या प्रमाणावर वाढल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
पिंपल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? ‘या’ कारणांमुळे चेहऱ्यावर येतात सतत पिंपल्स, जाणून घ्या सविस्तर
नियमित संपूर्ण चेहऱ्यावर बर्फ फिरवल्यास डोळ्यांसोबत त्वचा सुद्धा उजळदार होण्यास मदत होईल. याशिवाय अतिशय साधा उपाय म्हणजे झोपण्याआधी डोळ्यांखालील त्वचेवर खोबरेल तेल लावावे. यामुळे डोळे सुंदर होतात.