टाळूवरील कोंड्यामुळे सतत खाज येते? मग 'हा' घरगुती उपाय ठरेल प्रभावी
वातावरणातील बदल, सतत केमिकलयुक्त शँम्पूचा अतिवापर केल्यामुळे केसांच्या समस्या वाढू लागतात. केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर केस सतत गळतात. हल्ली महिलांसह पुरुषांच्या केसांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोंडा होतो. केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे सतत खाज येते, ज्यामुळे काहीवेळ टाळूवर जखम होण्याची शक्यता असते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाऊस पडल्यानंतर केस ओले होऊन जातात. ज्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो.टाळूवर कोंडा चिटकून राहिल्यामुळे केस मोठ्या प्रमाणावर गळू लागतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केस भिजल्यानंतर व्यवस्थित कोरडे उकरून घ्यावे. अनेकांना केस गरम पाण्याने धुवण्याची सवय असते. पण असे केल्यामुळे केसांमधील आवश्यक घटक नष्ट होतात. यासोबतच केस अतिशय कोरडे आणि निस्तेज होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे टाळूवर वाढलेला कोंडा कमी होतो आणि केसांचे नुकसान होत नाही.(फोटो सौजन्य – istock)
वय वाढलं तरी चिंता नको! पन्नाशीतील महिलांनी अंगीकाराव्यात ‘या’ ५ सवयी
टाळूवर वाढलेल्या कोंड्यामुळे बऱ्याचदा केस अतिशय चिकट आणि तेलकट होऊन जातात. तेलकट झालेल्या केसांची व्यवस्थित हेअर स्टाईल सुद्धा करता येत नाही. अशावेळी टाळूवर वाढलेला कोंडा घालवण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करावा. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा अॅपल सायडर व्हिनेगर केसांवर लावावे. यामुळे कोंडा कमी होईल आणि केस चमकदार दिसू लागतील. अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करताना सर्वप्रथम, स्प्रे बॉटलमध्ये पाणी घेऊन त्यात अॅपल सायडर व्हिनेगर टाकून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. केस धुवण्याच्या काहीवेळ आधी तयार केलेले मिश्रण केसांवर लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या.
केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर केस मोठ्या प्रमाणावर गळतात.त्यामुळे घरच्या घरी तुम्ही दही आणि लिंबाचा हेअरमास्क तयार करून केसांवर लावू शकता. यासाठी वाटीमध्ये दही घेऊन त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे हेअरमास्क लावून काहीवेळ तसेच ठेवा. नंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून एकदा हेअरमास्क केसांना लावल्यामुळे केसांची चमक कायम टिकून राहते आणि केस सुंदर दिसतात.
पिंपल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? ‘या’ कारणांमुळे चेहऱ्यावर येतात सतत पिंपल्स, जाणून घ्या सविस्तर
लिंबाच्या रसात असलेले गुणधर्म टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी करतात. याशिवाय केस स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करावा. वाटीमध्ये लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण केसांवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे केसांची चमक वाढेल. त्यानंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या.