
HbA1c ची किती पातळी ठरते धोकादायक (फोटो सौजन्य - iStock)
HbA1c ही चाचणी गेल्या दोन ते तीन महिन्यांतील रक्तातील साखरेची सरासरी पातळी दर्शवते. HbA1c चे प्रमाण सातत्याने वाढलेले दिसल्यास हृदयविकार, मूत्रपिंडांचे आजार, डोळ्यांची दृष्टी कमी होणे तसेच मज्जातंतूंचे नुकसान होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी HbA1c ६.५ टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यावर भर द्यावा, असे डॉक्टर सांगतात.
सरासरी पातळी घ्या जाणून
बहुतेक लोकांना माहीत आहे की रक्तातील साखर नियंत्रणात ठेवल्याने हृदय, डोळे आणि मूत्रपिंडांचे संरक्षण होते तसेच स्वादुपिंडाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मधुमेह नियंत्रणासाठी HbA1c ही तपासणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. HbA1c चाचणीमुळे मागील २ ते ३ महिन्यांतील रक्तातील साखरेची सरासरी पातळी समजण्यास मदत होते.
तज्ज्ञांच्या मते, HbA1c नियंत्रणात ठेवल्यास मधुमेहामुळे होणाऱ्या हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार, डोळ्यांचे विकार आणि मज्जासंस्थेच्या समस्या टाळता येऊ शकतात.योग्य HbA1c पातळी असल्यास रुग्ण अधिक सक्रिय, तणावमुक्त आणि दर्जेदार जीवन जगू शकतो. मात्र, या पातळीमध्ये सातत्याने वाढ होत राहिल्यास जीवनमानावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
World Diabetes Day: मधुमेहिंनी नियमितपणे HbA1cचाचणी करून घेण्याचे महत्व
नियंत्रणासाठी काय आवश्यक
HbA1c नियंत्रणासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात ठेवणे, औषधांचे नियमित सेवन करणे आणि वेळोवेळी आरोग्य तपासण्या करणे गरजेचे आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यास मधुमेह प्रभावीपणे नियंत्रणात ठेवता येतो, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
ज्या लोकांची HbA1c पातळी ७% पेक्षा कमी असते, त्यांना उच्च पातळी असलेल्या लोकांच्या तुलनेत स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. तुमची HbA1c पातळी प्रत्येक १% ने वाढल्यास, तुमच्या स्वादुपिंडाला असलेला धोका जवळपास ५०% ने वाढतो. योग्य HbA1c पातळी ही तुमच्या शरीराचे ‘संरक्षण’ करते,अशी प्रतिक्रिया डॉ. चंद्रशेखर तुलसीगेरी, संचालक, क्रिटिकल केअर विभाग आणि प्रमुख ए अँड ई, न्यूईरा हॉस्पिटल, वाशी, नवी मुंबई यांनी व्यक्त केली.
कोणती काळजी घ्यावी
HbA1c ७% पेक्षा कमी आणि उपाशीपोटी रक्तातील साखर १२६ mg/dL (७ mmol/L) किंवा त्यापेक्षा कमी राहील याची खबरदारी घ्या. ही साध्य केल्यास तुमच्या शरीराला जास्तीत जास्त संरक्षण मिळते. तुमच्या डॉक्टरांना तुमच्या HbA1c पातळीबद्दल आणि ती ७% च्या जवळ आणण्यासाठी कोणती पावले उचलावीत याबद्दल विचारा. मधुमेहाचे व्यवस्थापन करणे म्हणजे केवळ ‘गुंतागुंत’ टाळणे नाही; तर ते तुमच्या जीवनाचे संरक्षण करण्याचा आणि कर्करोग सुरू होण्यापूर्वीच तो टाळण्याचा एक सक्रिय मार्ग आहे. तुमची HbA1c पातळी प्रभावीपणे कमी करण्यासाठी, ‘ग्लुकोजमधील अचानक वाढ’ टाळणाऱ्या सवयींवर लक्ष केंद्रित करणे सर्वोत्तम आहे. जेव्हा तुम्ही ही वाढ टाळता, तेव्हा तुमची एकूण सरासरी (HbA1c) नैसर्गिकरित्या कमी होते,असे डॉ. निशांत तावडे, फॅमिली मेडिसिन , न्यूईरा हॉस्पिटल, वाशी, नवी मुंबई यांनी स्पष्ट केले.
मुंबईत HbA1c साठी तपासणी झालेल्या ३७% पेक्षा जास्त लोकांना मधुमेह, टाटा 1mg लॅबने केली तपासणी
कशा असाव्या खाण्याच्या सवयी?
डॉ. चंद्रशेखर तुलसीगेरी खाण्याच्या सवयींवरअधिक प्रकाश टाकला आहे