• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Manage Diabetes To Maintain Good Heart Health Expert Guidance

हृदयाचे आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी Diabetes व्‍यवस्‍थापन कसे करावे, तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन

खरं तर डायबिटीस आणि हृदय या दोघांचा अगदी जवळचा संबंध आहे. डायबिटीसच्या रूग्णांना हृदयाची अधिक काळजी घ्यावी लागते. याचे कसे व्यवस्थापन करावे यासाठी तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 19, 2025 | 04:21 PM
डायबिटीस आणि हार्ट अटॅकचा संबंध काय, कसे कराल व्यवस्थापन (फोटो सौजन्य - iStock)

डायबिटीस आणि हार्ट अटॅकचा संबंध काय, कसे कराल व्यवस्थापन (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मधुमेह आणि हृदयाचे आरोग्‍य यांच्‍यामधील निकट संबंधाकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, ज्‍यामुळे त्याचा व्‍यक्‍तीच्या एकूण आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. रक्‍तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा त्याचा परिणाम फक्‍त ग्लुकोजपुरता मर्यादित नसतो, तर हृदयाच्या कार्यावर आणि एकूण कार्डिओव्‍हॅस्‍क्‍युलर जोखमीवर परिणाम होऊ शकतो.

संशोधनानुसार, मधुमेह असलेल्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात कधीतरी हृदयरोग होण्याचा धोका दुप्पट असतो.  रक्‍तातील साखरेची पातळी वाढल्याने रक्‍तवाहिन्या आणि हृदयाचे कार्य नियंत्रित करणाऱ्या नसांचे नुकसान होऊ शकते. पण, चांगली बातमी म्‍हणजे तुम्‍ही मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी केलेल्या उपाययोजना कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांचा धोका कमी करण्यासाठीही उपयुक्‍त ठरू शकतात.

काय म्हणतात तज्ज्ञ

अंधेरी, मुंबई येथील कोकिलाबेन हॉस्पिटलचे कन्‍सल्टंट केडीएएच डॉ. मनिष हिंदुजा म्हणाले, “भारतात, मधुमेहाने ग्रस्त असलेल्‍या अनेक व्‍यक्‍तींमध्‍ये हृदयाशी संबंधित गुंतागूंती आढळून येत आहेत. तरुण व्‍यक्‍तींमध्ये या गुंतागुंतींत वाढ होत आहे हे देखील अत्यंत चिंताजनक आहे. मधुमेहाचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर उच्‍च रक्‍तदाब, बॅड कोलेस्ट्रॉल आणि उच्‍च ट्रायग्लिसराइड्स सारख्या हृदयरोगाच्या जोखीम घटकांमध्ये वाढ होऊ शकते. ग्लुकोजमधील चढउतार टाळण्यासाठी व्‍यक्‍तींनी अतिरिक्‍त काळजी घेणे आणि प्रतिबंधात्मक पावले उचलणे महत्वाचे आहे. हृदयासाठी आरोग्‍यदायी आहार, नियमित व्यायाम आणि सीजीएम सारख्या डिवाईसेससह ग्लुकोजचे निरीक्षण करणे हे काही उपाय अवलंबता येऊ शकतात.” 

Blood Sugar Spike पासून वाचण्यासाठी डायबिटीसच्या रूग्णांनी 4 चुका करणं टाळा

ग्लुकोजच्या पातळीचे निरीक्षण आवश्यक

हृदयाच्या आरोग्यासाठी डायबिटीसची पातळी नियंत्रणात ठेवावी

हृदयाच्या आरोग्यासाठी डायबिटीसची पातळी नियंत्रणात ठेवावी

अ‍ॅबॉटच्‍या डायबेटिस डिव्हिजनच्‍या मेडिकल अफेअर्सचे संचालक डॉ. केनेथ ली म्हणाले, “प्रभावी मधुमेह व्यवस्थापनासाठी ग्लुकोजच्या पातळीचे नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे. हे कन्टिन्‍युअस ग्लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) डिवाईसेससारख्या साधनांचा वापर करून केले जाऊ शकते, ज्यामध्ये ग्लुकोज पातळीची माहिती देण्यासाठी बोटांना टोचण्याची आवश्यकता नसते. अशा डिवाईसेसमध्ये टाइम इन रेंज (टीआयआर) सारखे उपयुक्‍त मेट्रिक्स असतात, जे दिवसातील किती वेळ व्यक्‍तीची ग्लुकोजची पातळी विशिष्ट मर्यादेत राहते हे दाखवते. व्‍यक्‍ती दीर्घकाळापर्यंत या रेंजमध्‍ये असल्‍यास कार्डिओव्‍हस्‍क्‍युलर आजार होण्याचा धोका कमी होतो. खरेतर, टीआयआरमध्‍ये १० टक्‍के वाढ व्‍यक्‍तीच्‍या कॅरोटिड धमन्‍यांच्‍या असामान्‍य वाढीचा धोका ६.४ टक्‍क्‍यांनी कमी करू शकते.  म्हणून,कार्डिओव्‍हस्‍क्‍युलर आजारावर प्रतिबंध ठेवण्यासाठी जास्त टीआयआर मिळवणे महत्वाचे आहे.” मधुमेह असलेल्या लोकांनी त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी ५ सोप्या पायऱ्या दिल्या आहेत:

हृदयासाठी आरोग्‍यदायी आहाराचे सेवन करा

कोलेस्‍ट्रॉलची पातळी वाढवू शकणारे सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स टाळण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, सॅच्युरेटेड फॅट्स सामान्यतः बटर, लाल मीट आणि फुल-फॅट डेअरी उत्पादनांमध्ये आढळतात, तर ट्रान्स फॅट्स बहुतेकदा तळलेल्या आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अंशतः हायड्रोजनेटेड तेलांमध्ये आढळतात. पालेभाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रथिनेयुक्‍त पदार्थांनी युक्‍त संतुलित आहाराचे सेवन केल्‍याने हृदयसंबंधित आजारांना प्रतिबंध होऊ शकतो. पण संतुलित आहाराच्‍या सेवनासह त्‍यावर नियंत्रण ठेवत तुम्ही तुमच्या ग्लुकोजच्‍या पातळ्या अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवू शकता, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

डायबिटीस रूग्णांनी वाचाच, केवळ गोडच नाही तर ‘या’ पदार्थांनीही वाढते ब्लड शुगर पातळी

नियमित व्यायाम

रोज व्यायाम करायलाच हवा

रोज व्यायाम करायलाच हवा

हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी व्यायाम करत लठ्ठपणा, उच्‍च रक्‍तदाब आणि उच्‍च कोलेस्‍ट्रॉल पातळी यासारख्या घटकांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. नियमित शारीरिक हालचाली देखील मधुमेहाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करण्यास मदत करतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार निरोगी जीवनशैलीसाठी बैठेकाम करण्‍याची वेळ कमीत-कमी करणे आणि दर आठवड्याला किमान १५० मिनिटे मध्यम-तीव्रतेचा शारीरिक व्यायाम करणे, जसे जलद चालणे किंवा सायकल चालवणे यांची शिफारस केली जाते. 

रक्‍तातील साखरेच्‍या पातळीचे नियमितपणे निरीक्षण करा

सीजीएमसारख्या रिअल-टाइम ट्रॅकिंगमुळे रक्‍तातील साखरेच्या वाढत्या किंवा कमी पातळीवर लक्ष ठेवण्यास मदत होऊ शकते. दिवसातून किमान १७ तास इष्टतम ग्लुकोजच्या श्रेणीत (७० – १८० mg/dl) असणे महत्वाचे आहे. याव्यतिरिक्‍त, सीजीएमसारखी डिवाईसेस कनेक्टेड केअर डिजिटल इकोसिस्टम देखील देतात, जी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी आणि केअरगिव्‍हर्सशी संपर्कात राहण्यास मदत करेल. असे करत तुम्ही मधुमेह आणि हृदयसंबंधित आजारांच्या जोखमीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवू शकता.

धूम्रपान आणि मद्यपान करू नका

धूम्रपानामुळे रक्‍तवाहिन्यांच्या अस्तरांचे नुकसान होऊ शकते आणि मधुमेहामुळे होणारे रक्‍तवाहिन्यांचे आकुंचन वाढू शकते. याव्यतिरिक्‍त, मद्यपान कमी केले पाहिजे, कारण ते मधुमेहाच्या औषधांच्या परिणामात व्यत्यय आणू शकते आणि रक्‍तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करू शकते.

तणाव व्यवस्थापन

ताणतणावावर नियंत्रण आणणे गरजेचे

ताणतणावावर नियंत्रण आणणे गरजेचे

तणावात असताना शरीरात तणाव संप्रेरक तयार होते, ज्‍यामुळे रक्‍तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि इन्सुलिन प्रतिरोधकता निर्माण करू शकते. कालांतराने, यामुळे रक्‍तदाब वाढू शकतो आणि हृदयरोग होण्याची शक्यता वाढते. ताणतणाव कमी करण्यासाठी संगीत ऐकणे, योगा किंवा नृत्य करणे आणि प्रियजनांसोबत वेळ घालवणे यांसारख्या उत्‍साही क्रियाकलापांचा आनंद घेण्‍याचा प्रयत्न करा. 

आरोग्‍यदायी हृदयासाठी उत्तम जीवनशैलीचे पर्याय निवडणे सर्वांसाठी महत्वाचे आहे. मधुमेह व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी काय करावे यासंदर्भात डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या.

Web Title: How to manage diabetes to maintain good heart health expert guidance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 04:21 PM

Topics:  

  • diabetes
  • Health News
  • Heart attack prevention

संबंधित बातम्या

2 साहित्यांपासून घरीच तयार करा डायबिटीजचे औषध, वैद्यांनी दिला सल्ला; फक्त 40 दिवसांतच शुगर राहील नियंत्रणात
1

2 साहित्यांपासून घरीच तयार करा डायबिटीजचे औषध, वैद्यांनी दिला सल्ला; फक्त 40 दिवसांतच शुगर राहील नियंत्रणात

मुंबई डायबिटीज केअर फाउंडेशनतर्फे लठ्ठपणा आणि मधुमेह विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
2

मुंबई डायबिटीज केअर फाउंडेशनतर्फे लठ्ठपणा आणि मधुमेह विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?
3

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?

PeptideTrend : दीर्घायुष्याचे गुपित की फसवणूक? व्हायरल होणाऱ्या पेप्टाइड इंजेक्शनचे सत्य उघड; रिपोर्ट धक्कादायक
4

PeptideTrend : दीर्घायुष्याचे गुपित की फसवणूक? व्हायरल होणाऱ्या पेप्टाइड इंजेक्शनचे सत्य उघड; रिपोर्ट धक्कादायक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Nov 18, 2025 | 11:23 PM
शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Nov 18, 2025 | 10:31 PM
जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

Nov 18, 2025 | 10:15 PM
I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

Nov 18, 2025 | 10:13 PM
Mahabharat Katha: शकुनी मामासह कृष्ण खेळला का ‘चौसर’? महाभारताची अद्भुत कथा वाचा

Mahabharat Katha: शकुनी मामासह कृष्ण खेळला का ‘चौसर’? महाभारताची अद्भुत कथा वाचा

Nov 18, 2025 | 09:59 PM
Ulhasnagar Cyber ​​Fraud: कमी गुंतवणुकीत जादा परतावा’चे गोड स्वप्न; उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे!

Ulhasnagar Cyber ​​Fraud: कमी गुंतवणुकीत जादा परतावा’चे गोड स्वप्न; उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे!

Nov 18, 2025 | 09:51 PM
Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा

Nov 18, 2025 | 09:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.