मुंबई : टाटा 1mg ह्या भारतातील अग्रगण्य डिजिटल हेल्थकेअर प्लॅटफॉर्मतर्फे जागतिक मधुमेह दिन (१४नोव्हेंबर) निमित्ताने केल्या गेलेल्या चाचणीनुसार मुंबईतील ३७% पेक्षा जास्त लोक ज्यांनी टाटा 1mg लॅबमध्ये HbA1c साठी चाचणी केली त्यामध्ये बहुतेक प्रकरणांमध्ये ४०+ वयोगटात मधुमेह असल्याचे आढळून आले आहे.
महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळूनआले. हा अहवाल पूर्वलक्ष्यी डेटा विश्लेषणाच्या आधारे तयार करण्यात आला आहे. ज्यांना मधुमेहासाठी विशेषत: स्वत:ची तपासणी करून घ्यायची आहे असे लोक किंवा ज्यांना प्रतिबंधात्मकआरोग्य तपासणी करायची होती असे हे लोक होते.
ही तपासणी HbA1c चाचणी (किंवा ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन चाचणी) द्वारे केली गेली जी मागील २ ते ३ महिन्यांतील रक्तातील साखरेची सरासरी पातळी सांगते. HbA1c पातळी ≥ 6.5% चे मूल्य मधुमेहाचे सूचक मानले जाते.
मार्च-ऑक्टोबर २०२२ दरम्यान मुंबईतील टाटा 1mg लॅबमध्ये एकूण६९,९६७ रक्त नमुन्यांची मधुमेहासाठी तपासणी करण्यात आली. यापैकी २६,१८५ (सुमारे ३७.४%) नमुने हे सकारात्मक असल्याचे निदान झाले. ४०-६० वर्षे वयोगटातील हे प्रमाण ४५%, त्यानंतर ६०+ वर्षे (४४%) आणि २५-४० वर्षे (१०%) होती. स्त्रियांपेक्षा (४३%) जास्त पुरुष (५७%) मधुमेहाने ग्रस्त असल्याचे आढळले .
टाटा 1mg लॅब्सचे क्लिनिकल हेड डॉ प्रशांत नाग म्हणाले, “मधुमेह हा जागतिक स्तरावर सार्वजनिक आरोग्यासाठी एक प्रमुख धोका मानला जात आहे आणि भारतासारख्या देशांमध्ये हे दृश्य अधिक विदारक आहे, अलिकडच्या दशकात मधुमेहाचे प्रमाण लक्षणिय वाढले आहे आणि ते वाढण्याची शक्यता जास्त आहे. मधुमेहाचा प्रसार जसजसा वाढत जातो तस तसे, अधिक तरुण, प्रौढ आणि पौगंडावस्थेतील लोक मधुमेहाचे बळी पडतील. विशेषतः जर त्यांचे वजन जास्त/लठ्ठ असेल त्यांच्यात हे प्रमाण जास्त असेलच पण आता आणखी लोक बॉर्डरलाइन डायबिटीजला बळी पडत आहेत. ह्यात रक्तातील साखरेची पातळी सामान्य श्रेणीपेक्षा किंचित जास्त असते, परंतु मधुमेह म्हणण्या इतपत जास्त नसते. २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात दर ६ पैकी १ भारतीयाला बॉर्डरलाइन डायबिटीज आहे.”
“भारतातील जोखीम घटक नसलेल्या सर्व प्रौढांची प्रीडायबेटिस आणि टाइप २ मधुमेहाची तपासणी वयाच्या ४५ ऐवजी वयाच्या ३५ व्या वर्षीपासून केली गेली पाहिजे. तथापि वयानुसार, देशातील तरुण प्रौढांमधील मधुमेहाच्या प्रकरणांमध्ये अलीकडील वाढ पाहता, अनेक तज्ञांनी शिफारस केली आहे की मधुमेहाची तपासणी आता २५ वर्षापासून सुरू करावी.” अनुवांशिक पूर्वस्थिती व्यतिरिक्त, भारतातील मधुमेहाच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची मुख्य कारणे म्हणजे शारीरिक हालचालींचा अभाव, फास्ट फूडचे अतिसेवन, धूम्रपान आणि मद्यपान यासारखे अपायकारक जीवनशैलीचे घटक. मात्र काही अभ्यासात असे आढळले आहे की कोविड-१९ स्वादुपिंडाचे थेट नुकसान करण्यास देखील सक्षम आहे ज्यामुळे ज्ञात मधुमेहींमध्ये साखरेची पातळी बिघडू शकते आणि पूर्वी मधुमेह नसलेल्यांमध्ये देखील मधुमेहाची सुरुवात होऊ शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
सुश्री छवी कोहली, मेदांता द मेडिसिटी, गुडगाव (टाटा 1mg च्या सल्लागार पॅनेलवरचे डॉक्टर) म्हणतात, ‘‘मधुमेहासाठी कोणताही विशेष आहार नाही; चांगली कल्पना म्हणजे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी विविध पोषक तत्वे घेऊन शरीराचे पोषण करणे. भरपूर हंगामी रंगीबेरंगी भाज्या खाण्यावर, चांगल्या घटकांचे सेवन आणि पुरेशा प्रथिने स्त्रोतांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कर्बोदकांमधे, संपूर्ण धान्यांची विविधता निवडा. फळे चुकवू नका, त्यांचा स्नॅक्स म्हणून वापर करा आणि पॅकेज केलेले आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ टाळा. तसेच, मधुमेहासाठी योग्य आहाराबाबत अनेक समज प्रचलित आहेत. चुकीच्या माहितीला बळी पडू नका. तुमच्या मधुमेहासाठी नेहमी प्रमाणित पोषणतज्ञ आणि मधुमेह शिक्षकांचा सल्ला घ्या.”
मधुमेह हा आजार असलेल्या लोकांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आजीवन बंधने लादतो. मधुमेह असलेले लोक त्यांच्या स्वतःच्या काळजीवर नियंत्रण ठेवतील तर ते अधिक चांगले. संतुलित आणि सकस आहार, सक्रिय जीवनशैली, निर्धारित औषधे वेळेवर घेणे, नियमित आरोग्य तपासणी आणि नियोजित डॉक्टरांच्या भेटी यांमुळे मधुमेहाचा सामना उत्तम रित्या करता येतो.






