Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ही’ असू शकतात पित्ताशयातील खड्यांची लक्षणे, वारंवार होणारी पोटदुखी, पोट फुगणे आणि अपचनाकडे दुर्लक्ष करणं ठरेल त्रासदायक

पित्ताशयाच्या खड्यांची लक्षणे तुम्हाला माहीत आहेत का? सतत पोट फुगत असेल वा पोटदुखी होत असेल तर कामचलाऊ औषधं घेऊन दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांनी याबाबत इशारा दिला आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 23, 2026 | 05:01 PM
पित्ताशयातील खड्यांची लक्षणे कशी ओळखाल (फोटो सौजन्य - iStock)

पित्ताशयातील खड्यांची लक्षणे कशी ओळखाल (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • लठ्ठपणा, असंतुलित आहार, मधुमेह आणि बैठी जीवनशैली ठरतेय कारणीभूत
  • दर महिन्याला ३० ते ७० वयोगटातील सुमारे ५० टक्के रुग्ण पोटदुखी, पोट फुगणे आणि अपचनाच्या तक्रारी घेऊन उपचारासाठी 
  • तज्ज्ञांनी दिला इशारा 
हल्ली पित्ताशयात खडे (गॉलस्टोन्स) होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक रुग्ण तीव्र पोटदुखी किंवा इतर गंभीर गुंतागुंत आढळून आल्यानंतरच डॉक्टरांकडे धाव घेतात येतात. संतुलित आहाराचा अभाव, लठ्ठपणा, बैठी जीवनशैली, झपाट्याने वजन कमी होणे, मधुमेह आणि वाढते वय ही पित्ताशयात खडे होण्यामागची प्रमुख कारणं आहेत. 

वारंवार होणारी पोटदुखी, पोट फुगणे किंवा अपचन यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच निदान आणि उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत तसेच आपत्कालीन शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

पित्त आणि पित्ताशयामध्ये नेमका फरक काय? एकच असण्याचा गैरसमज करा दूर

नक्की काय आहे समस्या 

पित्ताशयात तयार होणारे कोलेस्ट्रॅाल, पित्तद्रव्ये आणि कॅल्शियमपासून खडे तयार होतात. बऱ्याचदा याची  कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत. मात्र जेव्हा यामुळे पित्तवाहिनीत अडथळा निर्माण होऊ लागतो किंवा पित्ताशयाला सूज येते तेव्हा ही गंभीर समस्या उद्भवू शकते.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे येथील जनरल सर्जन डॉ. नितीन भावे म्हणाले की, तेलकट किंवा पचायला जड अशा अन्नपदार्थांचे सेवन केल्यानंतर पोटाच्या उजव्या बाजूस वरच्या भागात वेदना होऊ लागतात हे पित्ताशयातील खड्यांचे महत्त्वाचे लक्षण आहे. ही वेदना पाठीत किंवा उजव्या खांद्यापर्यंत वाढु शकते आणि ती काही मिनिटांपासून ते काही तासांपर्यंत टिकून राहू शकते. याशिवाय पोट फुगणे, मळमळ, उलट्या, अपचन किंवा जेवल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटणे अशी लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं अनेकदा अॅसिडिटी किंवा सामान्य पचनाच्या तक्रारी समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

डॉ. भावे  पुढे म्हणाले की, पित्ताशयात खडे असलेल्या जवळपास ५० टक्के रुग्णांकडून सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. दर महिन्याला ३० ते ७० वयोगटातील सुमारे ५० टक्के रुग्ण वारंवार होणारी पोटदुखी, पोट फुगणे आणि अपचनाच्या तक्रारींसह आमच्याकडे उपचारांसाठी येतात. लक्षणे सुरू झाल्यानंतरही उपचार न घेतल्यास पित्ताशयाला सूज येणे (कोलेसिस्टायटिस), संसर्ग, पित्तवाहिनीतील अडथळा, कावीळ, स्वादुपिंडास सूज (पॅन्क्रियाटायटिस) किंवा पोटाचा गंभीर संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे वारंवार पोटदुखी होत असल्यास किंवा त्यासोबत ताप, डोळे किंवा त्वचा पिवळी पडणे, सतत उलट्या होणे किंवा तीव्र पोटदुखी अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घ्या. पित्ताशयातील खड्यांचे निदान करण्यासाठी अल्ट्रासाऊंड ही सर्वात प्रभावी आणि प्राथमिक तपासणी आहे.

Gallstones Symptoms: पित्ताच्या पिशवीत तयार होत आहे दगड, शौचात दिसेल भयंकर लक्षण; दुर्लक्ष केल्यास थेट ऑपरेशन

पित्ताशय काढण्याची शस्त्रक्रिया 

डॉ. भावे पुढे म्हणाले की, लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी लॅप्रोस्कोपिक पद्धतीने पित्ताशय काढण्याची शस्त्रक्रिया हा सर्वोत्तम उपचार मानला जातो. या शस्त्रक्रियेमध्ये शरीरावर लहान छिद्र केले जातात. त्यामुळे वेदना कमी होतात, रक्तस्राव कमी होतो, रुग्णाचा रुग्णालयातील कालावधी तमी कमी होतो आणि रुग्ण लवकर बरा होतो. वजन नियंत्रित राखणे, फळे, भाज्या आणि तंतुमय पदार्थांचा समावेश असलेला संतुलित आहार घेणे, तेलकट पदार्थांचे अतिसेवन टाळणे, नियमित व्यायाम करणे आणि मधुमेह नियंत्रणात ठेवणे यामुळे गॉलस्टोन्सचा धोका कमी होऊ शकतो. मधुमेही आणि तरुणांमध्ये गुंतागुंतीची शक्यता अधिक असल्याने त्यांना लक्षणं नसली तरी काही वेळा शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. पित्ताशयाला सूज येण्यापूर्वी शस्त्रक्रिया केल्यास ती अधिक सोपी होते आणि रुग्ण लवकर बरा होतो.

Web Title: Ignoring symptoms of gallstones such as recurring abdominal pain bloating indigestion can lead to complications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • Gallstones
  • Health Tips
  • lifesytle news

संबंधित बातम्या

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
1

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

PCOS and Diabetes Risk: PCOS मुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो का?
2

PCOS and Diabetes Risk: PCOS मुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो का?

Asthma vs COPD: दमा की COPD? श्वास लागतोय, पण आजार नेमका कोणता? ‘या’ टेस्टशिवाय होणार नाही फरक स्पष्ट
3

Asthma vs COPD: दमा की COPD? श्वास लागतोय, पण आजार नेमका कोणता? ‘या’ टेस्टशिवाय होणार नाही फरक स्पष्ट

High BP at 30: तरुण वयातही वाढतोय High BP! 30 नंतर ‘इतक्या’ वेळा नक्की तपासा रक्तदाब
4

High BP at 30: तरुण वयातही वाढतोय High BP! 30 नंतर ‘इतक्या’ वेळा नक्की तपासा रक्तदाब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.