• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Important Tips For Maintaining Reproductive Health For Men

पुरुषांसाठी प्रजनन आरोग्य चांगले राखण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स

Men Reproductive Health: प्रजनन आरोग्य किंवा प्रजननक्षमतेला विविध आरोग्य परिस्थितींमुळे आणि मधुमेह, एसटीआय (लैंगिक संक्रमण), स्वयंप्रतिकार रोग किंवा एचआयव्ही सारख्या रोगांमुळे देखील धोका उद्भवू शकतो. यासाठी नक्की काय करायचे याबाबत तज्ज्ञांचे मत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 21, 2024 | 10:10 AM
पुरूषांची प्रजननक्षमता (फोटो सौजन्य - iStock)

पुरूषांची प्रजननक्षमता (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुनरुत्पादक आरोग्य चांगले राखणे हे सर्वांगीण आरोग्य आणि प्रजननक्षमतेसाठी महत्त्वपूर्ण आहे. चांगले प्रजनन आरोग्य म्हणजे निरोगी शुक्राणू तयार करण्याची क्षमता ज्यामुळे जोडप्यासाठी निरोगी गर्भधारणा होऊ शकते. निरोगी आहाराच्या सवयी, शारीरिकरित्या सक्रिय राहणे, तणावाचे व्यवस्थापन करणे आणि धूम्रपान किंवा मद्यपान यांसारख्या हानिकारक सवयी टाळणे यासारखे काही आवश्यक बदल करून तुम्ही निरोगी जीवनशैली बाळगु शकता. 

योग्य सावधगिरी बाळगत प्रजनन आरोग्य चांगले राखल्यास जीवनाचा दर्जा उंचावतो, मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते.  योग्य वयातच कुटुंबाची नियोजन आखण्याची गरज आहे याची खबरदारी घ्यावी. तुमचे प्रजनन आरोग्य चांगले राखण्यासाठी डॉ. विकास भिसे, युरोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट सर्जन, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांनी दिलेल्या काही टिप्स फॉलो करा

निरोगी आहाराचे सेवन करा 

निरोगी आहार महत्त्वाचा (फोटो सौजन्य - iStock)

निरोगी आहार महत्त्वाचा (फोटो सौजन्य – iStock)

निरोगी आहाराच्या सेवनाने तुमचे आरोग्य चांगले राहण्यास आणि विविध रोगांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. तुमची प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी पोषक तत्वे महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे पुरेसे पौष्टिक अन्न न खाल्ल्याने विविध प्रजनन समस्या उद्भवू शकतात. ओमेगा -3 फॅटी ऍसिडस्, जस्त आणि अँटिऑक्सिडंट्स असलेल्या भाज्या खाल्ल्याने प्रजनन आरोग्य आणि शुक्राणूंची गुणवत्ता चांगली राखण्यास मदत होते. सतत जंक फूड किंवा शर्करायुक्त पेय, फॅटी फूड, चिप्स आणि पिझ्झा यासारखे प्रोसेस्ड फूड खाणे तसेच चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे तुमच्या प्रजनन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, परिणामी हार्मोनल असंतुलनाची समस्या उद्भवते. खाण्याच्या असामान्य सवयींमुळे तुमचे प्रजनन आरोग्य बिघडू शकते, त्यामुळे तुमच्या आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

जागरूक राहणे गरजेचे 

शुक्राणूंची कमतरता, इरेक्टाइल डिसफंक्शन, कमी टेस्टोस्टेरॉन पातळी, नपुंसकता आणि लैंगिक संक्रमण (STIs) यासारख्या प्रजनन आरोग्याशी संबंधित समस्यांबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे. तज्ञांचे मार्गदर्शन आणि सूचना मिळविण्यासाठी पुरुष डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरु नका आणि प्रजनन आरोग्याशी संबंधित समस्यांवर संकोच न बाळगता चर्चा करा.

धुम्रपान टाळा 

धुम्रपान करणे धोकादायक (फोटो सौजन्य - iStock)

धुम्रपान करणे धोकादायक (फोटो सौजन्य – iStock)

धूम्रपान केल्याने तुमच्या प्रजनन आरोग्यावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होणे आणि इरेक्टाइल डिसफंक्शन यांसारख्या प्रजनन समस्या देखील होऊ शकतात. सिगारेटच्या धुराचा दीर्घकाळ संपर्क तुमच्या हार्मोन्स आणि प्रजनन आरोग्यावर परिणाम करू शकतात आणि शुक्राणूमध्ये असलेल्या डीएनएला नुकसान पोहोचवू शकतो. तुमच्या जीवनाची गुणवत्ता आणि प्रजनन आरोग्य सुधारण्यासाठी धूम्रपान सोडणे हा सर्वोत्तम पर्याय ठरतो.

तणावाचे व्यवस्थापन करा 

तणाव करा कमी (फोटो सौजन्य - iStock)

तणाव करा कमी (फोटो सौजन्य – iStock)

तणावामुळे तुमच्या संप्रेरकांच्या पातळीवर आणि शुक्राणूंच्या उत्पादनावर लक्षणीय परिणाम होतो. योग, ध्यान, दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम, आवडते चित्रपट पाहणे किंवा तुमचा जोडीदार, कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत दर्जेदार वेळ घालवणे यासारख्या विविध तणाव-कमी करणाऱ्या तंत्रांचा अवलंब करा. तणाव आणि तुमचे एकंदर आरोग्य व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी किमान 8 तासांची पुरेशी झोप घ्या.

तुमच्या दैनंदिन दिनचर्येत या टिप्सचा समावेश केल्याने प्रजनन आरोग्य आणि तुमच्या एकूण जीवनशैलीशी निगडित समस्या सोडवण्यात मदत होऊ शकते. संतुलित आहाराचे सेवन करून, प्रजनन आरोग्याच्या समस्यांबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. धूम्रपान किंवा मद्यपान यासारख्या सवयी टाळून आणि तणावाचे व्यवस्थापन करून, तुम्ही तुमचे प्रजनन आरोग्य चांगले राखू शकता.

Web Title: Important tips for maintaining reproductive health for men

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2024 | 10:10 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ZP Election 2026: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६५% मतदान, भावी कारभाऱ्यांचे भाग्य ईव्हीएम यंत्रात झाले कैद

ZP Election 2026: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६५% मतदान, भावी कारभाऱ्यांचे भाग्य ईव्हीएम यंत्रात झाले कैद

Feb 08, 2026 | 04:03 PM
Propose Day 2026: प्रपोज कसे करावे? स्टेप बाय स्टेप चाल भाऊ, नाही तर प्रेमाला मिळेल पूर्णविराम! हे घे टिप्स

Propose Day 2026: प्रपोज कसे करावे? स्टेप बाय स्टेप चाल भाऊ, नाही तर प्रेमाला मिळेल पूर्णविराम! हे घे टिप्स

Feb 08, 2026 | 04:00 PM
धाराशिव जिल्ह्यात ६५.२२ टक्के मतदान; भूम–परांड्यात सर्वाधिक तर लोहाऱ्यात झाले सर्वात कमी मतदान

धाराशिव जिल्ह्यात ६५.२२ टक्के मतदान; भूम–परांड्यात सर्वाधिक तर लोहाऱ्यात झाले सर्वात कमी मतदान

Feb 08, 2026 | 03:56 PM
कृतिका कामरा दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधात; ‘या’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यासोबत घेणार सात वचनं

कृतिका कामरा दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधात; ‘या’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यासोबत घेणार सात वचनं

Feb 08, 2026 | 03:40 PM
Budh Gochar 2026: बुध ग्रहाने राहूच्या शतभिषा नक्षत्रात केले संक्रमण, या राशीच्या लोकांचा वाढेल बँक बॅलन्स

Budh Gochar 2026: बुध ग्रहाने राहूच्या शतभिषा नक्षत्रात केले संक्रमण, या राशीच्या लोकांचा वाढेल बँक बॅलन्स

Feb 08, 2026 | 03:40 PM
११११ शेतकऱ्यांना मिळाली यंत्र-अवजारे! कृषी यांत्रिकीकरण योजनाः ‘प्रथम अर्ज’ करणाऱ्याला ‘प्रथम प्राधान्य’

११११ शेतकऱ्यांना मिळाली यंत्र-अवजारे! कृषी यांत्रिकीकरण योजनाः ‘प्रथम अर्ज’ करणाऱ्याला ‘प्रथम प्राधान्य’

Feb 08, 2026 | 03:40 PM
महाराष्ट्रीयन जेवणाची शान: घरच्या घरी बनवा अस्सल ‘गोडा मसाला’, रेसिपी करा नोट

महाराष्ट्रीयन जेवणाची शान: घरच्या घरी बनवा अस्सल ‘गोडा मसाला’, रेसिपी करा नोट

Feb 08, 2026 | 03:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.