११११ शेतकऱ्यांना मिळाली यंत्र-अवजारे! कृषी यांत्रिकीकरण योजनाः 'प्रथम अर्ज' करणाऱ्याला 'प्रथम प्राधान्य'
कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कृषी विषयक यंत्र व अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. सन २०२५-२६ मध्ये आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल १ हजार १११ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभदेण्यात आला आहे. नवीन यंत्र व अवजारे मिळाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदाही होत आहे. वर्धा जिल्ह्यात कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत तीन योजना राबविण्यात येत आहेत. सन २०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील १ हजार १११ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना संबंधित योजनामधून कृषी यंत्रे व अवजारे खरेदीसाठी अनुदान देण्यात आले.(फोटो सौजन्य – istock)
कृषी यांत्रिकीकरण योजनांतर्गत महा-डीबीटी पोर्टलवरील सन २०२५-२६ पासून अर्ज मंजुरीसाठी ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ ही कार्यपद्धती अवलंबविण्यात आली. सन २०२५-२६ मध्ये ३० हजार ९४६ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यापैकी विविध घटकासाठी कागदपत्रे अपलोड केल्यानंतर ४ हजार ६२५ लाभार्थ्यांना विविध घटक खरेदीसाठी पूर्वसंमती प्रदान करण्यात आली.
संबंधित योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी अवजारे उपलब्ध होऊन श्रम, खर्च व वेळेची बचत तसेच उत्पादन खर्चात घट होण्यास मदत झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात वाढ होऊन उत्पन्न वृद्धीला चालना मिळत आहे. जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॅक्टर चलित कृषी यंत्रे व अवजारे, पेरणी यंत्र, रोटावेटर, अवजारे, ड्रोन, कम्बाईन हार्वेस्टर आदी यंत्रांसाठी अनुदान दिले जाते. त्यामुळे या योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
थंडी ओसरल्यानंतर पर्यटन आराखडे सुरू! पहिली पसंती ‘टिपेश्वर’ला, सुन्ना गेटवर होतंय वाघाचे दर्शन
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या लाभासाठी सन २०२५-२६ मध्ये ३०९४६ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यापैकी विविध घटकासाठी कागदपत्रे अपलोड केल्यानंतर ४६२५ लाभार्थ्यांना विविध घटक खरेदीसाठी पूर्वसंमती प्रदान करण्यात आली, खरेदी नंतर मोका तपासणी व छाणनीनंतर ११११ पात्र लाभार्थ्यांना कृषी यंत्रे व अवजारेखरेदीसाठी ८.०८. कोटीचे अनुदान देण्यात आले,अरविंद उपरीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा, यांनी असे मत व्यक्त केले आहे.






