शरीराला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सुधृढ बनवण्यासाठी योग्य तो आहार घेणे आवश्यक आहे. उत्तम आरोग्य आणि कल्याण हे चांगल्या आरोग्याचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. जर मानसिक आणि शारीरिक जीवन चांगले असेल तर जीवनात आलेल्या सर्व संकटाना सामोरे जाता येत. बदलत्या जीवनशैलीनुसार निरोगी आरोग्य जगणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे स्वतःला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सुधृढ बनवण्यासाठी सद्गुरू जग्गी वासुदेव (Sadguru Jaggi Vasudev) यांनी काही महत्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितलेल्या या टिप्स जीवन जगताना तुम्हाला नेहमीच उपयोगी पडतील. सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी दिलेल्या जीवन मंत्रांनी अनेकांना प्रेरित केले आहे. चला तर जाणून घेऊया निरोगी जीवनशैलीसाठी सद्गुरूंनी दिलेल्या काही महत्वाच्या टिप्स.
निरोगी जीवनशैलीसाठी सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी सांगितलेल्या महत्वाच्या टिप्स:
निरोगी राहण्यासाठी कच्च अन्न खावे:
सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या मते, रोजच्या आहारात ४० ते ५० टक्के जिवंत पेशी अन्न समाविष्ट केला पाहिजे. यामुळे आरोग्याला फायदे होतात. कच्च्या अन्नपदार्थांमध्ये फळे, कच्च्या भाज्या, ड्राय फ्रूट्स किंवा कोणत्याही प्रकारची कडधान्य तुम्ही खाऊ शकता. अन्नामध्येच एन्झाईम्स असतात ज्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. तसेच आजकाल ज्या पद्धतीने जेवण शिजवले जाते त्या पद्धतीमध्ये अन्नातील एन्झाईम्स नष्ट होऊन जातात. ज्यामुळे आपल्याला अन्न पदार्थ पचत नाहीत.
[read_also content=”जया किशोरीने सांगितले बहिणीच्या लहानसहान सवयींनी होते हैराण, कसे असावे बहिणीशी नाते https://www.navarashtra.com/lifestyle/motivational-speaker-jaya-kishori-explained-relationship-with-sister-how-to-make-bond-with-girl-siblings-537175.html”]
रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करणे:
बरेच लोक रात्रीच्या वेळी अंघोळ करतात. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. तर काही लोकांचा असा विश्वास आहे की सकाळी लवकर उठून अंघोळ केली पाहिजे. पण सद्गुरुंच्या मते, शारीरिक आरोग्य चांगले असणे फार आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी अंघोळ केल्यानंतर मनातील ताण तणाव कमी होऊन रात्री व्यवस्थित झोप लागते. यामुळे शरीर शुद्ध होते पण मनही शुद्ध होण्यास मदत होते. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो.
पाण्याच्या प्रमाणाची काळजी घ्यावी:
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी शरीराला पाण्याची गरज असते. पाण्याशिवाय आपले शरीर आणि मन सुधृढ राहू शकत नाही. सद्गुरुंच्या मते,पिण्याचे पाणी आपली शारीरिक ऊर्जा टिकवून ठेवते, आपल्या अधिक काळ सक्रिय ठेवण्यासाठी मदत करते. पाणी प्याल्यानंतर शारीरिक स्वास्थ्य स्थिर ठेवता येतं. शरीराची ऊर्जा पातळी राखण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने आपल्या अवयवांना ताजेतवाने आणि पोषण देण्याचे काम पाणी करते.
भूकेपेक्षा कमी खाऊन निरोगी राहा:
सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या सांगण्यानुसार, भूक लागणे आणि पोट रिकामे असणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ज्यावेळेस तुम्हाला भूक लागते तेव्हा तुमच्या शरीरात कमी ऊर्जा असते आणि जेव्हा तुमचे पोट रिकामे असते तेव्हा योग विज्ञान आणि आधुनिक विज्ञानानुसार ही स्थिती चांगली आहे. पोट रिकामे असेल तेव्हा आपण कोणतेही काम चांगल्या पद्धतीने करू शकतो.
[read_also content=”ओटझेम्पिक म्हणजे काय? वजन कमी करण्यासाठी व्हायरल होतोय ट्रेंड, आहारतज्ज्ञांनी दिली माहिती https://www.navarashtra.com/lifestyle/what-is-otzempic-the-trend-to-lose-weight-is-going-viral-dietician-informed-537146.html”]
डाळी आणि काजू रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात:
आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोजच्या आहारात पौष्टीक पदार्थ खाल्ले पाहिजेत. यामुळे रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते. आहारात फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्य, काजू आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स आढळून येतात. तसेच पुरेशी झोप घेतल्याने मानसिक आरोग्य चांगले राहते.