भारताने उडवला झिम्बाब्वेचा २०४ धावांनी धुव्वा(फोटो-सोशल मीडिया)
U19 World Cup, India defeats Zimbabwe by 204 runs : ICC अंडर-१९ विश्वचषकातील पहिल्या सुपर सिक्स सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा २०४ धावांनी पराभव करत भारताने उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. विहानच्या शतकाच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेसमोर ३५३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, झिम्बाब्वेचा संघ १४८ धावांवरच गदगडला परिणामी भारताने तब्बल २०४ धावांनी विजय मिळवला. भारताकडून कर्णधार आयुष आणि उद्धव या जोडीने प्रत्येकी तीन विकेट घेऊन झिम्बाब्वेची दाणादाण उडवून दिली.
याआधी, झिम्बाब्वे संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. विहान मल्होत्राच्या नाबाद शतकामुळे, भारतीय अंडर-१९ संघाने चालू आयसीसी अंडर-१९ विश्वचषक २०२६ च्या सुपर सिक्स फेरीत झिम्बाब्वेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्स गमावून ३५२ धावा उभ्या केल्या. भारताची सुरुवात खराब झाली, परंतु वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकामुळे टीम इंडियाला जलद सुरुवात मिळाली.
धावांचा पाठलाग करायला उतरेलल्या झिम्बाब्वे संघाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी ९३ धावांवर आपल्या ४ विकेट्स गामावल्या होत्या. नॅथॅनियल हलाबांगना ०, ध्रुव पटेल ८, ब्रँडन सेन्झेरे ३ आणि कियान ब्लिग्नॉट ३७ धावांवर बाद झाले. त्यानंतर लिरॉय चिवौलाने ६२ धावांची खेळी करून थोडी झुंज दिली पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. त्याने ७७ चेंडूत ६२ धावा केल्या. शेवटच्या सहा विकेट फक्त सहा धावांवर गमावल्या. एका वेळी झिम्बाब्वे ४ बाद १४१ धावांवर होती, परंतु त्यानंतर त्यांना १४८ धावांवरच गारद झाली. तातेंडा चिमुगोरो २९, मायकेल ब्लिग्नॉट ०, कर्णधार सिम्बराशे मुडझेनगेरे ३, ताकुडझ्वा माकोनी १ आणि वेबस्टर मधिधी ० धावा करून बाद झाले तर पानशे माझाई ० धावेवर नाबाद राहिला. भारताकडून भारताकडून कर्णधार आयुष आणि उद्धव या जोडीने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, तसेच आरएस अम्ब्रिसने २ विकेट्स घेतल्या, तर खिलन पटेल आणि हेनिल पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. परिणामी, झिम्बाब्वे संघ ३७.४ षटकात १४८ धावांवर गारद झाला आणि भारताने २०४ धावांनी विजय मिळवला.
त्याआआधी भारताच्या १३० धावांवर ४ विकेट्स गेल्यावर विहान मल्होत्रा आणि अभिज्ञान कुंडू यांनी डाव सावरत ११३ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. अभिज्ञान कुंडू अर्धशतक झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने ६२ चेंडूत ६१ धावा केल्या. या दरम्यान, त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. तथापि, विहान मल्होत्रा शेवटपर्यंत क्रीजवर राहिला आणि त्याने त्याचे शतक पूर्ण केले. खिलन पटेलने १२ चेंडूत ३० धावांची खेळी केल्यामुळे भारताला ३५० धावांचा टप्पा पार करता आला. विहानने १०७ चेंडूत नाबाद १०९ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार लगावले.
झिम्बाब्वे अंडर-19 प्लेइंग 11: नॅथॅनियल हलाबांगना (यष्टीरक्षक), ताकुडझ्वा माकोनी, कियान ब्लिग्नॉट, वेबस्टर मधिधी, ध्रुव पटेल, लिरॉय चिवौला, सिम्बराशे मुडझेनगेरे (कर्णधार), ब्रँडन सेन्झेरे, मायकेल ब्लिग्नॉट, तातेंडा चिमुगोरो, पानशे माझाई
भारत अंडर-19 प्लेइंग 11: आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), वेदांत त्रिवेदी, कनिष्क चौहान, आरएस अम्ब्रिस, खिलन पटेल, हेनिल पटेल, उद्धव मोहन.






