Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अपुऱ्या झोपेमुळे शरीराला होते ‘या’ गभींर आजारांची लागण, शांत व गाढ झोपेसाठी करून पाहा घरगुती उपाय

अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. त्यामुळे नियमित ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे फार आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे शरीराला या गंभीर आजारांची लागण होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 19, 2026 | 08:22 AM
अपुऱ्या झोपेमुळे शरीराला होते 'या' गभींर आजारांची लागण, शांत व गाढ झोपेसाठी करून पाहा घरगुती उपाय

अपुऱ्या झोपेमुळे शरीराला होते 'या' गभींर आजारांची लागण, शांत व गाढ झोपेसाठी करून पाहा घरगुती उपाय

Follow Us
Close
Follow Us:

झोपेची गुणवत्ता खराब होण्याची कारणे?
झोपेची कमतरतेमुळे उद्भवणारे आजार?
शांत झोपेसाठी काय करावे?

दिवसभर काम करून थकल्यानंतर शरीराला विश्रांतीची फार आवश्कता असते. सतत काम, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुलांची जबाबदारी इत्यादी अनेक गोष्टीमुळे आरोग्याची काळजी घ्याला जास्त वेळ मिळत नाही. कामाच्या धावपळीमध्ये आरोग्याकडे खूप जास्त दुर्लक्ष होते. बऱ्याचदा शरीरास आवश्यक असलेल्या प्रमाणात झोप न घेतल्यामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होते. तसेच डोळ्यांभोवती काळी वर्तुळ वाढणे, सतत डोकेदुखी इत्यादी बरीच लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे नियमित ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे फार आवश्यक आहे. झोपल्यानंतर मेंदू दिवसभरातील माहितीची साठवणूक करण्यासोबतच त्वचेच्या पेशी दुरुस्त करतो. ज्यामुळे सकाळी उठल्यानंतर चेहरा खूप जास्त फ्रेश वाटतो.(फोटो सौजन्य – istock)

आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध आहेत कडुलिंबाची पाने! शक्तिशाली पानांचे त्वचा केसांसह संपूर्ण शरीराला होतील भरमसाट फायदे

डॉक्टरांच्या मते, आदल्या दिवशी घेतलेल्या अपुऱ्या झोपेमुळे दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवस मानसिक तणावात जातो. वारंवार डोकं दुखणे, कामात व्यवस्थित लक्ष न लागणे इत्यादी समस्या उद्भवून सतत चिडचिड होते. वारंवार ७ तासांपेक्षा कमी झोपल्यामुळे जुनाट आजारांचा धोका खूप जास्त वाढतो. झोप पूर्ण न झाल्यामुळे रक्तातील साखर, हृदयाचे ठोके आणि हार्मोनच्या संतुलनावर परिणाम होतो.चला तर जाणून घेऊया अपुऱ्या झोपेमुळे शरीरसंबंधित कोणते आजार उद्भवतात.

मेंदूच्या कार्यावर परिणाम:

वारंवार ७ तासांपेक्षा जास्त वेळ झोप न घेतल्यास केवळ शरीरावरच नाहीतर मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होतो. झोपेच्या कमतरतेमुळे मेंदूतील ‘न्यूरॉन्स’ एकमेकांशी संपर्क साधण्यास असमर्थ ठरतात. ज्याच्या परिणामामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. गाढ झोपल्यानंतर मेंदू ग्लिम्फॅटिक सिस्टिम द्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतो. पण अपुऱ्या झोपेमुळे हे विषारी घटक शरीरात तसेच साचून राहतात आणि झोपेचे संतुलन बिघडण्यासोबतच नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा पूर्णपणे कमी होऊन जाते.

हृदयाचे आजार:

मानवी शरीराला झोप फार आवश्यक असते. शांत झोप घेतल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुद्धा चांगले राहण्यास मदत होते. शांत झोपेमध्ये असताना हृदयाच्या रक्तदाब कमी होऊन जातो, ज्याच्या परिणामामुळे हृदयाला विश्रांती मिळते. कमी झोपणाऱ्यांच्या शरीरात ‘कॉर्टिसोल’ हार्मोन वाढतो आणि रक्तवाहिन्यांवर जास्तीचा तणाव निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे कोणत्याही क्षणी उच्च रक्तदाब, अनियमित हृदयाचे ठोके आणि हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते.

वजन झपाट्याने वाढते:

झोप आणि भूक यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे.’लेप्टिन’ आणि ‘घ्रेलीन’ हे हार्मोन्स एकमेकांशी संबंधित असतात. वारंवार शरीरात झोपेची कमतरता निर्माण झाल्यास वजनावर परिणाम होतो. अपुऱ्या झोपेमुळे भूक वाढवणाऱ्या हार्मोनची पातळी वाढते आणि सतत काहींना काही खाण्याची इच्छा होते. यामुळे सतत गोड पदार्थ खाण्याची किंवा हाय-कॅलरी पदार्थ खाण्याची इच्छा जास्त वाढते. जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे वजन झपाट्याने वाढते.

एका जागी पुतळा बनवणारे Zombie Drug नेमके आले कुठून? तरुणाईला वेड लावलेल्या झॉम्बी ड्रग्जचे शरीरावर होतात घातक परिणाम

चांगल्या झोपेसाठी उपाय:

शांत आणि गाढ झोप येण्यासाठी एक ग्लास कोमट दुधात हळद आणि जायफळ पावडर मिक्स करून प्यायल्यास सकारात्मक परिणाम दिसू लागतील. याशिवाय नियमित ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे फार आवश्यक आहे. तसेच झोपण्याच्या १ किंवा २ तास आधी मोबाईल किंवा लॅपटॉप काहीच पाहू नये. दुपारच्या जेवणानंतर कमीत कमी २ तास चहा किंवा कॅफिन असलेले पेय पिऊ नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपुऱ्या झोपेमुळे कोणते आजार होऊ शकतात?

    Ans: अपुऱ्या झोपेमुळे हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा, नैराश्य आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका वाढतो.

  • Que: दररोज किती तास झोप आवश्यक आहे?

    Ans: प्रौढ व्यक्तींनी दररोज 7-8 तास झोप घेणे आवश्यक मानले जाते.

  • Que: चांगली झोप येण्यासाठी काय करावे?

    Ans: नियमित वेळेवर झोपणे, मोबाईल/स्क्रीनपासून दूर राहणे, हलका आहार घेणे आणि शांत वातावरण तयार करणे उपयोगी ठरते.

Web Title: Inadequate sleep causes these serious diseases in the body try these home remedies for restful and deep sleep

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 08:22 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • home remedies
  • sleep problems

संबंधित बातम्या

दिवसाची सुरुवात होईल आंनदाने! वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नाश्त्यात करा ‘या’ पौष्टिक स्मूदीचे सेवन
1

दिवसाची सुरुवात होईल आंनदाने! वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नाश्त्यात करा ‘या’ पौष्टिक स्मूदीचे सेवन

एका जागी पुतळा बनवणारे Zombie Drug नेमके आले कुठून? तरुणाईला वेड लावलेल्या झॉम्बी ड्रग्जचे शरीरावर होतात घातक परिणाम
2

एका जागी पुतळा बनवणारे Zombie Drug नेमके आले कुठून? तरुणाईला वेड लावलेल्या झॉम्बी ड्रग्जचे शरीरावर होतात घातक परिणाम

उन्हामुळे त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C सीरम, चेहऱ्यावर येईल ग्लो
3

उन्हामुळे त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C सीरम, चेहऱ्यावर येईल ग्लो

आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध आहेत कडुलिंबाची पाने! शक्तिशाली पानांचे त्वचा केसांसह संपूर्ण शरीराला होतील भरमसाट फायदे
4

आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध आहेत कडुलिंबाची पाने! शक्तिशाली पानांचे त्वचा केसांसह संपूर्ण शरीराला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.