Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा हलक्या फुलक्या पदार्थाचा समावेश! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा दही साबुदाणा

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दुपारच्या जेवणात कायमच हलक्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीरात थंडावा टिकून राहतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया दही साबुदाणा बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: May 12, 2026 | 09:46 AM
उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा हलक्या फुलक्या पदार्थाचा समावेश! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा दही साबुदाणा

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा हलक्या फुलक्या पदार्थाचा समावेश! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा दही साबुदाणा

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानात मोठी वाढ झाली आहे. कडाक्याचे ऊन पडू लागल्यामुळे उष्माघाताचा रुग्ण संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. उन्हात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर शरीराला थंडाव्याची खूप जास्त आवश्यकता असते. याशिवाय अन्नपदार्थ खाण्याची जास्त इच्छा होत नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी अतिशय साधे आणि सहज तयार होतील असे पदार्थ बनवून खाल्ले जातात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दुपारच्या जेवणात कोणते पदार्थ बनवून खावे? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं कायम पडतात. डाळभात किंवा भाजी चपाती खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही दही साबुदाणा सुद्धा बनवून खाऊ शकता. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात बदल करणे फार आवश्यक आहे. आहारात सहज पचन होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ पचन होतात आणि पचनाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. चला तर जाणून घेऊया दही साबुदाणा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Summer Drink: ५ मिनिटांमध्ये घरी बनवा थंडगार Raw Mango Mojito, शेफ कुणालने सांगितली झटपट तयार होणारी रेसिपी

साहित्य:

  • साबुदाणे
  • दही
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • जिरं
  • साखर
  • कोथिंबीर
  • बटाटा
  • तूप
  • डाळिंबाचे दाणे
Summer Special : पिकलेल्या आंब्यांपासून घरी बनवा फ्रेश आंबा पापड, फार सोपी आहे पद्धत

कृती:

  • दही साबुदाणा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात साबुदाणे घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर ४ ते ५ तास पाण्यात साबुदाणे भिजत ठेवा.
  • भिजलेल्या साबुदाण्यांमधील पाणी काढून टाका आणि चाळणीमध्ये साबुदाणे मोकळे करून ठेवा.
    पॅनमध्ये तूप गरम करून त्यात जिरं, हिरवी मिरची घालून खमंग भाजा. त्यानंतर त्यात शिजवलेल्या बटाट्याचे बारीक तुकडे
  • टाका.
  • बटाटा तुपावर व्यवस्थित भाजून घ्या. यामुळे बटाट्याची चव अतिशय सुंदर लागेल.
  • त्यानंतर त्यात भिजवलेले साबुदाणे घालून मंद आचेवर व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • वाटीमध्ये दही घेऊन ते व्यवस्थित फेटून घ्या. फेटून घेतलेल्या दह्यात चवीनुसार मीठ घाला. त्यानंतर त्यात थंड झालेले साबुदाण्याचे मिश्रण टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर वरून कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले दही साबुदाणे. हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडेल.

Web Title: Include a light fluffy dish in your summer lunch make curd sago quickly in 5 minutes summer special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.