५ मिनिटांमध्ये घरी बनवा थंडगार Raw Mango Mojito, शेफ कुणालने सांगितली झटपट तयार होणारी रेसिपी
कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला थंडाव्याची जास्त आवश्यकता असते. पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी वेगवेगळे कोल्ड्रिंक, सरबत किंवा सोडा आणून प्यायला जातो. थंड पेय प्यायल्यानंतर काहीवेळापुरते शरीरात चांगले वाटते, पण पुन्हा एकदा शरीरात उष्णता वाढू लागते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर आतून थंड राहील अशाच पेयांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला थंडगार कच्च्या कैरीचे मोजितो बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आंबटगोड चवीची कैरी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे कडक उन्हात कुठेही बाहेर आल्यानंतर झटपट कैरी मोजितो बनवावे. याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरी पाहुणे आल्यानंतर त्यांना चहा देण्याऐवजी मोजितो बनवून पिण्यास द्यावे. गर्मीमध्ये कैरीचं पन्ह, आंब्याचा रस, मँगो फ्रुटी इत्यादी ठराविक पेय कायमच बनवली जातात. पण नेहमीच तेच ठराविक पेय पिण्याऐवजी नवीन काहीतरी बनवून पाहावे. चला तर जाणून घेऊया कैरी मोजितो बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
आंबट गोड चवीचा पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चटकदार चिंच कँडी, नोट करून घ्या रेसिपी






