
पचनशक्ती कमकुवत झाली आहे? मग आतड्यांच्या हालचाल सुलभ ठेवण्यासाठी आहारात करा 'या' फळांचा समावेश
आतड्यांसाठी प्रभावी फळे कोणती?
नियमित फळे खाल्ल्यास शरीराला होणारे फायदे?
आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी उपाय?
दिवसभरात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. तिखट, तेलकट, आंबट,गोड इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. पण काहीवेळा पचनास जड असलेल्या पदार्थांचे सेवन कोणत्याही वेळी केल्यास शरीराची पचनक्रिया बिघडू शकते. अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे आतड्यांमध्ये विषारी घटक तसेच साचुन राहतात, ज्याच्या परिणामामुळे बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, गॅस किंवा पोटाच्या समस्या उद्भवू लागतात. दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीरातील सर्वच अवयव कायम निरोगी आणि हेल्दी असणे आवश्यक आहे. त्यातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे आतड्या. शरीरात दोन प्रकारच्या आतड्या असतात. लहान आतडे आणि मोठे आतडे. आतड्या शरीरास आवश्यक घटक शोषून घेतात आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतात. (फोटो सौजन्य – istock)
सध्याच्या धावपळीच्या जीवनात लोक आपल्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नाहीत. यामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांचा धोका वाढला आहे. याचबरोबर, कर्करोगासारखा जीवघेणा आजारही लोकांना वेगाने ग्रासत आहे. आपण जे काही खातो, त्याचा थेट परिणाम आपल्या पचनसंस्था आणि त्यातील चांगल्या बॅक्टेरियावर होतो. त्यामुळे आपल्या आहारात आरोग्यदायी फळांचा समावेश करणे आवश्यक आहे. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर शरीराला भरमसाट फायदे होतील. चला तर जाणून घेऊया आतड्यांच्या आरोग्यासाठी गुणकारी असलेली फळे.
किवीमध्ये एक्टिनिडिन नावाचे एन्झाइम आढळते. हे प्रथिने तोडून पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. यातील अँटिऑक्सिडंट्स आणि प्रीबायोटिक्स आतड्यांना मजबूत करतात. किवीचे सेवन केल्याने सूज आणि कोलन कर्करोगाचा धोका कमी होतो.
लिंबू, संत्री आणि ग्रेपफ्रूट यांसारखी लिंबूवर्गीय फळे शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करतात. यात विटामिन सी व फ्लेवोनॉइड् चांगल्या प्रमाणात असतात. है घटक शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ नष्ट करतात आणि पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात.
सफरचंदातील पेक्टिन फायबर गट बॅक्टेरियासाठी खूप फायदेशीर असते. हे फायबर आतड्यांमध्ये तुटते, तेव्हा ब्युटीरेट नावाचे फॅटी अॅटसिड तयार होते. जे कर्करोगाच्या पेशींपासून बचाव करते. सकाळी उठल्यानंतर नाश्त्यात नियमित एक सफरचंद खाल्ल्यास कधीच पचनाच्या समस्या उद्भवणार नाहीत. कारण यामध्ये असलेल्या फायबरमुळे विषारी घटक सहज बाहेर पडून जातात.
कलिंगडामध्ये ९० टक्के पाणी असते, जे शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि पचनक्रिया दुरुस्त ठेवते. यात असलेले लायकोपीन हे अॅटिऑक्सिडंट कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करते. तसेच, ते कोलनसह इतर अनेक कर्करोगाचा धोका कमी करते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर कलिंगड उपलब्ध असतात.
Ans: आतड्यांच्या आरोग्यासाठी फायबरयुक्त आणि सकस आहार घेणे महत्त्वाचे आहे.
Ans: फायबरयुक्त पदार्थांचे सेवन वाढवा, जसे की फळे, भाज्या, शेंगा आणि धान्ये.
Ans: आठवड्यातून तीनपेक्षा कमी आतड्याची हालचाल होणे हे बद्धकोष्ठतेचे लक्षण आहे.