Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खवळलेलं पित्त कायमचे होईल शांत! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास कधीच होणार नाही अ‍ॅसिडिटी, मिळेल आराम

आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे अ‍ॅसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे स्वयंपाक घरातील या पदार्थांचे सेवन केल्यास आतडे स्वच्छ राहतात आणि पचनाच्या कोणत्याही समस्या अजिबात उद्भवत नाहीत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 08, 2026 | 08:39 AM
खवळलेलं पित्त कायमचे होईल शांत! स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचे सेवन केल्यास कधीच होणार नाही अ‍ॅसिडिटी, मिळेल आराम

खवळलेलं पित्त कायमचे होईल शांत! स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचे सेवन केल्यास कधीच होणार नाही अ‍ॅसिडिटी, मिळेल आराम

Follow Us
Follow Us:

अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी उपाय?
आतडे स्वच्छ करण्यासाठी उपाय?
स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचे सेवन करावे?

दैनंदिन जीवनशैली विस्खलित झाल्यानंतर पचनसंस्थेवर अनेक गंभीर परिणाम दिसून येतात. संपूर्ण शरीराचे केंद्रबिंदू पचनसंस्था आहे. त्यामुळे पचनक्रिया कायमच निरोगी असणे फार आवश्यक आहे. पण हल्लीच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे बऱ्याचदा पचनाच्या असंख्य समस्या उद्भवू लागतात. कधी गॅस, अपचन तर कधी शरीरात वाढलेल्या अ‍ॅसिडिटीमुळे उलट्या, मळमळ आणि डोकेदुखी होण्याची जास्त शक्यता असते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी अनेक लोक बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या गोळ्या औषधांचे सेवन करतात. पण तरीसुद्धा फारसा बदल दिसून येत नाही. त्यामुळे दैनंदिन आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला वारंवार उद्भवणाऱ्या पचनाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

बद्धकोष्ठतेपासून आराम हवा? पचन सुधारण्यासाठी AIIMS तज्ज्ञांचा सल्ला; हे 5 सुपरफुड्स खाताच काही मिनिटांत सर्व घाण निघेल बाहेर

भारतात असंख्य मसाल्यांचे सेवन केले जाते. मसाल्यांचा वापर केवळ जेवण बनवण्यसाठीच नाहीतर औषधासाठी सुद्धा केला जातो. हळद, आले, बडीशेप, जिरे आणि धणे इत्यादी मसाले केवळ जेवणाची चवच वाढवत नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहेत. या मसाल्यांमध्ये असलेले नैसर्गिक एंझाइम्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आतड्यांमध्ये आलेली सूज कमी करण्यासाठी मदत करतात. याशिवाय आतड्यांमध्ये चांगले जिवाणू वाढवण्यासाठी मदत करतात. बऱ्याचदा पोटात वेदना किंवा अपचन झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण सतत खाल्लेल्या गोळ्यांमुळे किडनीचे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते.

हळद आणि आल्याचा वापर:

जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना हळद आणि आल्याचा वापर केला जातो. हळदीमुळे पदार्थाचा रंग वाढतो आणि चव सुधारते. तर आल्याच्या वापरामुळे जेवणाची चव वाढते. हळदीमध्ये असलेले गुणकारी कर्क्युमिन नावाचा घटक आतड्यांमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी मदत करतो. याशिवाय रोज रात्री एक ग्लासभर कोमट दूध घेऊन त्यात चिमूटभर हळद मिक्स करून प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील आणि आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल. जेवणानंतर आल्याचा तुकडा किंवा आल्याचे पाणी प्यायल्यास शरीरात वाढलेली अ‍ॅसिडिटी कमी होण्यास मदत होईल.

बडीशेप आणि जिरे:

जेवणानंतर आपल्यातील अनेकांना बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेप खाल्ल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होते. बडीशेप खाल्ल्यामुळे आतड्यांच्या स्नायूंना आतून आराम मिळतो. तर जिऱ्याचा पाण्यामुळे आतड्यांमध्ये अडकलेला गॅस बाहेर पडून जातो. शरीरातील पाचक एंझाइम्स सक्रिय करण्यासाठी आणि खाल्लेले अन्नपदार्थ पचन करण्यासाठी जिऱ्याचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी जिरं आणि बडीशेपचे पाणी प्यायल्यास आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल.

महिनाभरात कमी होईल पोट मांड्यावर वाढलेले वजन! सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात मिक्स करा ‘हा’ चिमूटभर पदार्थ

पुदिन्याचे सेवन:

पोटातील स्नायूंना शिथिल करण्यासाठी आणि पोटदुखीवर त्वरित आराम मिळवून देण्यासाठी पुदिन्याचे सेवन करावे. पुदिना खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर पुदिन्याचे पाने चावून खाल्ल्यास आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल. आरोग्यासंबंधित गंभीर आजारांवर रामबाण पदार्थ म्हणजे लसूण. लसूण खाल्ल्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते आणि पोटाचे आरोग्य सुधारते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पचनक्रिया म्हणजे काय?

    Ans: पचन ही अन्न रेणूंचे लहान, पाण्यात विरघळणाऱ्या घटकांमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया आहे, ज्यामुळे शरीर पोषण शोषून घेऊ शकते.

  • Que: अपचनाची मुख्य कारणे कोणती?

    Ans: जलद खाणे, जास्त चरबीयुक्त किंवा मसालेदार पदार्थ, ताणतणाव, कॉफी, अल्कोहोल आणि कमी फायबरयुक्त आहार यामुळे अपचन होते.

  • Que: पचनाच्या समस्येची लक्षणे कोणती?

    Ans: पोटदुखी, उलट्या, मळमळ, पोटफुगी (गॅस), छातीत जळजळ आणि बद्धकोष्ठता ही पचन समस्यांची प्रमुख लक्षणे आहेत.

Web Title: The angry pitta will be calm forever consuming these foods from the kitchen will never cause acidity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 08:39 AM

Topics:  

  • acidity
  • constipation home remedies
  • Digestion Problem
  • gut health

संबंधित बातम्या

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
1

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

आंबट ढेकर आणि पित्ताच्या त्रासाने हैराण झाला आहात? Acidity च्या वाढत्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
2

आंबट ढेकर आणि पित्ताच्या त्रासाने हैराण झाला आहात? Acidity च्या वाढत्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन
3

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन

तिखट- मसालेदार पदार्थ जास्त खाता? मग शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम, वाढतील पचनाच्या समस्या
4

तिखट- मसालेदार पदार्थ जास्त खाता? मग शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम, वाढतील पचनाच्या समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.