Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांमध्ये वाढतेय रडारड, चिडचिडेपणाची समस्या; पालकांनी वेळीच घाला आवर

मुलांना समज आल्यापासून मोबाईल देऊ जाऊ लागला आहे. जेवताना, खेळताना अगदी लहान मुलांच्या हातात मोबाईल दिसतोय. पण याचे दुष्परिणाम पालकांनो भयानक आहेत, तुम्हाला माहीत आहेत का?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 18, 2025 | 02:57 PM
स्क्रिन टाइम वाढल्याने काय होतोय मुलांवर परिणाम (फोटो सौजन्य - iStock)

स्क्रिन टाइम वाढल्याने काय होतोय मुलांवर परिणाम (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • लहान मुलांमधील वाढता स्क्रिन टाईम
  • काय आहेत कारणं
  • पालकांनी स्क्रिन टाईम कसा करावा कमी 

हल्ली लहान मुलांमधील स्क्रिन टाईम वाढत आहे. धक्कादायक म्हणजे या साऱ्याचा त्यांचा मूड, झोप आणि भाषेच्या विकासावर परिणाम होत आहे. म्हणूनच, पालकांनी स्क्रिन टाईम कमी करणे ही काळाची गरज आहे. डॉ. प्रशांत लक्ष्मणराव रामटेककर, बालरोग आणि नवजात शिशु तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, लुल्लानगर, पुणे यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. 

आजच्या डिजीटल युगात स्क्रिन टाईम वाढला असून  टीव्ही, टॅब्लेट, फोन आणि डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेली खेळण्यांचा वापर वाढला आहे. अनेक पालकांसाठी ही उपकरणे मस्तीखोर मुलांना शांत करण्यासाठी तसेच त्यांना व्यस्त ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात . परंतु जास्त स्क्रीन एक्सपोजरचे दीर्घकालीन परिणाम समजून घेणे आवश्यक आहे. 

काय होतो परिणाम

जास्त स्क्रिन टाइम आता लहान मुलांमध्ये वारंवार मूड स्विंग्ज, उशिरा बोलणे, झोपेसंबंधी समस्या आणि समाजापासून दूर पळणे अशा समस्यांना कारणीभूत ठरते. मूल वाढत असताना निरुपद्रवी वाटणारे मनोरंजन हा चिंतेचा विषय बनू शकते. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार २ वर्षांखालील मुलांसाठी स्क्रीनपासून पूर्णपणे दूर ठेवणे आणि २-५ वयोगटातील मुलांचा स्क्रिनटाईम दिवसातून १ तासापेक्षा जास्त नसावा.

कोणत्या वयामध्ये किती स्क्रीनटाईम योग्य? चुकून पण करू नका ‘ही’ चूक

लहान मुलांवर होणारा डिजिटलाझेशनचा परिणाम– 

विविध अभ्यासांनुसार, स्क्रिनसमोर दिवसातून एक किंवा दोन तासांपेक्षा जास्त वेळ घालवणाऱ्या लहान मुलांना पुढील गोष्टींचा सामना करावा लागू शकतो:

  • विलंबित भाषा कौशल्ये: स्क्रिन टाइम वाढल्यास, वास्तविक जगातील संभाषणे कमी होतात, शब्दसंग्रह आणि भाषण विकास मंदावतो. मुलाला संभाषणे ठेवण्यात अडचण येऊ शकते
  • चिडचिडेपणा आणि राग: स्क्रिन टाइम संपल्यावर मुले जास्त चिडचिडी किंवा निराश होऊ शकतात, ज्यामुळे सतत मूड स्विंग आणि  स्वभावात आक्रमकता येते
  • झोपेत व्यत्यय: हे ज्ञात सत्य आहे की स्क्रिनमधून येणारा निळा प्रकाश मेलाटोनिनच्या पातळीवर परिणाम करतो, ज्यामुळे लहान मुलांना झोप येणे आणि गाढ झोप लागणे कठीण होते. म्हणून ते नेहमी चिडचिडेपणा करतात
  • एकाग्रता कमी होणे : वाचन किंवा खेळणे यासारख्या क्रियांमध्ये लक्ष केंद्रित न करु शकणे.  मुलांना गुंतविण्याकरिता गोष्ट, अंगाई किंवा कविता वाचणे यासारख्या इतर क्रिया करणे सुरू करा
  • समाजातील वावर कमी होणे: जास्त स्क्रिनटाईममुळे मौखिक संवाद कमी होत चालला आहे. मूल नेहमी फोनवर वेळ घालवू लागते आणि इतरांशी संवाद साधणे टाळते

‘स्‍क्रीन टाइम’ वाढल्याने ‘Brainfog’चा धोका!

लक्षणे कोणती 

अनेक पालकांना हे कळत नाही की सतत अस्वस्थ वाटणे, झोप न लागोने असणे किंवा स्क्रीन टाइमनंतर चिडचिडेपणा वाढणे यासारखी लक्षणे दिसून येतात. स्क्रीनचा वापर हा मुलांना शांत करण्यासाठी किंवा कौतुकासाठी केला जात असल्याने, मुलं  बहुतेकदा डिजिटल डिव्हाइसवरच अवलंबून राहणे पसंद करतात.

लहान मुलांमध्ये स्क्रीन टाइम व्यवस्थापित करण्यासाठी टिप्स: 

  • स्क्रिन टाइम मर्यादित करा: लहान मुलांसाठी दररोज एक तासाचा स्क्रिन टाइम पुरेसा आहे. बेडरूम, डायनिंग टेबल आणि कौटुंबिक वेळेत पालकांनी देखील स्क्रिनचा वापर करणे टाळा
  • पालकांनी रील स्क्रोल करण्याऐवजी त्यांच्या मुलांसोबत शैक्षणिक खेळ खेळावे
  • सुट्टीच्या दिवशी मुलांसोबत मैदानी खेळ खेळ खेळावे. नृत्य, संगीत, बागकाम, चित्रकला आणि मुलांसोबत कोडे सोडवणे यासारख्या क्रिया करा
  • पालकांनी त्यांच्या मुलाभोवती असताना त्यांचा स्क्रीन वापर मर्यादित करणे गरजेचे आहे. असे केल्याने तुम्हाला मुलाशी चांगले संबंध प्रस्थापित करता येतील
  • मुलाला इतरांशी संवाद साधण्यास प्रोत्साहित करा. स्क्रीनचा वापर कमी करणे आणि मुलांचे जीवनमान सुधारणे ही काळाची गरज असून यात पालकांची भूमिका महत्त्वाची आहे

Web Title: Increasing screen time is the problem of irritability and anger in children parents should curb it in time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • lifestyle news
  • parenting tips

संबंधित बातम्या

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय
1

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria
2

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria

Gardening Tips: आता बाजारातून महागडे टॉमेटो विकत घ्यायची गरज नाही, घरीच पिकवा ‘लालचुटूक’ Tomato
3

Gardening Tips: आता बाजारातून महागडे टॉमेटो विकत घ्यायची गरज नाही, घरीच पिकवा ‘लालचुटूक’ Tomato

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!
4

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.