स्मार्टफोनचा वाढलेला वापर, कामानिमित्त संगणक, लॅपटॉपसमोर तासन तास घालवला जाणारा वेळ… ओटीटी, सिनेमागृहात मनोरंजनासाठी दिलेला वेळ… अशा विविध कारणांनी तरुणाईचा ‘स्क्रीन टाइम’ वाढलेला आहे. त्याचे दुष्परिणाम समोर येऊ लागले असून, मेंदूशी निगडित ‘ब्रेन फॉग’ हा आजार होण्याचा धोका वाढला आहे. मेंदू थकल्याने आरोग्यविषयक समस्या वाढत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे
कोरोना महामारीच्या काळापासून संपूर्ण जग ऑनलाइन व्यासपीठावर आले आहे. कार्यालयीन बैठकींपासून, तर शिकवणीचे वर्ग ऑनलाइन भरवले होते. साधारणतः गेल्या दोन वर्षांमध्ये त्यामुळे ‘स्क्रीन टाइम’ प्रचंड वाढलेला आहे.
‘ब्रेन फॉग’ची गंभीर लक्षणे
‘ब्रेन फॉग’ची विविध लक्षणे आढळतात. त्यामध्ये विस्मरण होणे, चिडचिड वाढणे, विचार करण्याची शक्ती कमी होणे, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे, आत्मविश्वास कमी होणे, मानसिक स्थैर्य नसणे, सतत तणावात असणे, अस्थिर झोप व निद्रानाश, चक्कर येणे, कामातील एकाग्रता कमी होणे, याचा समावेश होतो. ‘ब्रेग फॉग’ होण्याच्या कारणांमध्ये उशिरापर्यंत जागरण, तणाव, मेंदूचा थकवा, हार्मोन्समधील बदल, व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता, मेनोपॉझ, कर्करोग आणि मधुमेहावरील औषध याचा समावेश आहे.
घ्यावयाची काळजी