फोटो सौजन्य - एआय (ChatGPT)
भारत हा विविध परंपरांनी नटलेला देश आहे. वेगवेगळे सण, लग्नकार्य, विधी, रूढी-परंपरा भारताच्या वेगवेगळ्या भागात विविध पद्धतींनी साजर्या केल्या जातात. महाराष्ट्रातही अशा बऱ्याच परंपरा आहेत, ज्या महाराष्ट्रातीलचं वेगवेगळ्या भागात नाविन्यपूर्ण रीतीने पूर्ण केल्या जातात. लग्नकार्यामध्ये अशा बऱ्याच विधी असतात, ज्या त्या त्या भागाच्या आलेल्या चालीरीतींप्रमाणे पार पडल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे नवीन जोडप्याच्या गृह्प्रवेशावेळेची ‘माप ओलांडण्याची’ परंपरा.
महाराष्ट्रातील काही भागांमध्ये, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागात १९८०-९० च्या दशकापर्यंत (आणि काही ठिकाणी आजही) “माप ओलांडणे” या विधीचे वेगवेगळे प्रकार प्रचलित होते. आज सर्वसाधारणपणे नववधू सासरी प्रवेश करताना तांदळाने भरलेले माप ओलांडते; असे असले तरी पूर्वी काही कुटुंबांत नवरदेवानेही माप ओलांडण्याची प्रथा होती. या प्रथेमागील विचार आज आपण समजून घेऊयात,
Delay In Marriage Remedies: लग्नाला का होतोय उशीर? ज्योतिषांनी दिले कारण, उपाय करून पहाच
यामागील संकल्पना थोडी वेगळी होती. विवाहानंतर नवरीला घेऊन जेव्हा वर प्रथमच आपल्या घरी येत असे, तेव्हा घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले धान्याने भरलेले माप वराने प्रथम ओलांडावे आणि त्यानंतर वधूने ते सांडलेले माप भरावे आणि प्रवेश करावा, अशी पद्धत काही ठिकाणी होती. धान्याने भरलेले माप हे घरातील समृद्धी, अन्नसंपन्नता आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाई. वराने,नवरदेवाने ते ओलांडणे म्हणजे घराच्या जबाबदाऱ्या स्वीकारणे, कुटुंबाचे पालनपोषण करण्याची तयारी आणि गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याचे प्रतीक मानले जायचे.
ही प्रथा विशेषतः त्या काळात अधिक दिसत असायची जेव्हा संयुक्त कुटुंब पद्धती जास्त होती. नवरा मुलगा हा कुटुंबाचा भावी कर्ता पुरुष मानला जात असल्याने त्याच्या गृहप्रवेशालाही धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व दिल जायचं. नंतरच्या काळात विवाहसंस्कार वेगवेगळ्या बाजूंनी प्रभावित होत गेले आणि नववधूच्या गृहप्रवेशातील “माप ओलांडणे” हा भागच अधिक प्रसिद्ध झाला.
Redi Ganpati: कोकणातील दोन भुजा असलेला रेडीचा गणपती, काय आहेत या मूर्तीची वैशिष्ट्ये जाणून घ्या
लोकसाहित्य आणि कौटुंबिक परंपरांमध्ये माप ओलांडणे हे केवळ गृहप्रवेशाचे कृत्य नसून समृद्धी, शुभारंभ आणि नव्या आयुष्याच्या स्वीकाराचे प्रतीक मानले गेले आहे. त्यामुळे काही जुन्या छायाचित्रांमध्ये किंवा १९८०-९० च्या दशकातील लग्नांच्या अल्बममध्ये नवरदेव माप ओलांडतानाचे दृश्य आजही बघायला मिळतील. ही प्रथा संपूर्ण महाराष्ट्रात सारखी नव्हती. प्रत्येक भागातील रितीरिवाज, कुटुंबाच्या परंपरा आणि स्थानिक संस्कृतीनुसार तिच्या पद्धती बदलत असत.






