आपल्या भारत देशाला प्राचीन वारसा लाभलेला आहे. भारतात अशी अनेक सुंदर आणि नयनरम्य ठिकाणे आहेत, जी पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक भारतात येत असतात. तसेच देशात अनेक पुरातन ठिकाणे आहेत ज्यांचा इतिहास फार रंजक आहे. प्रत्येक जागेचा आपला असा इतिहास हा असतोच. यातील काही शहरांचा किंवा ठिकाणांचा इतिहास फारच रंजक असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणच्या रंजक इतिहासाविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत. या शहराबाबतची रंजक गोष्ट म्हणजे या शहरात एकूण 52 दरवाजे आहेत. हे सर्व दरवाजे पार केल्यानंतरच तुम्हाला या शहरात प्रवेश मिळेल. त्यामुळेच या शहराला दारांचं शहर असे नाव मिळाले आहे.
भारतातील दारांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरामध्ये प्रवेश घेण्यासाठी 52 दरवाजे पार करावे लागतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे शहर नक्की आहे तरी कुठे? तर याचे उत्तर आहे औरंगाबाद. महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराला ‘दारांचं शहर’ म्हटले जाते. या शहराचा इतिहास सुमारे 500 वर्षे जुना आहे. या शहरातील दरवाजे आणि या जागेचा इतिहास संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे.
औरंगाबाद शहराचा इतिहास पाहिला तर तो एकूण 500 वर्षे जुना आहे. इथे छत्रपती शिवाजी महारांजांचे प्रसिद्ध संग्रहालय देखील आहे. या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेली शास्त्रे ठेवण्यात आली आहेत. तसेच त्या काळात वापरण्यात आलेले 500 वर्षे जुने कपडेही या संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. एवढेच काय तर येथे तुम्हाला मुघल शासक औरंगजेबने स्वतःच्या हाताने लिहिलेली कुराणाची प्रतही पाहायला मिळते. महाराष्ट्रातील औरंगाबाद हे शहर पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे ठिकाण आहे. येथे तुम्हाला अनेक निरनिराळे दरवाजे पाहायला मिळतील.