Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तोंडाला सुटेल पाणी! जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कैरीचा मेथांबा, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ

कच्ची कैरी सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडते. त्यामुळे कैरीपासून तुम्ही पारंपरिक पद्धतीने मेथांबा बनवू शकता. हा पदार्थ जेवणात तोंडी लावण्यासाठी अतिशय उत्तम आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 29, 2026 | 08:00 AM
तोंडाला सुटेल पाणी! जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कैरीचा मेथांबा, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ

तोंडाला सुटेल पाणी! जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कैरीचा मेथांबा, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक घरात वाळवणाचे पदार्थ बनवले जातात. लोणचं, पापड, कुरडया, विविध प्रकारचे मसाले इत्यादी गोष्टी आवर्जून बनवल्या जातात. या पदार्थांशिवाय जेवणाला मजेदार चव येत नाही. कच्च्या कैरीचा वापर करून अनेक वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवले जातात. चटण्या, लोणचं, कैरीचे सरबत यांच्यासह कैरीचा मुरंबा सुद्धा बनवला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये कैरीचा मेथांबा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मेथी दाणे, कच्ची कैरी आणि इतर मसाल्यांचा वापर करून बनवलेला मेथांबा चवीला अतिशय सुंदर लागतो. मेथांबा तुम्ही गरमागरम चपाती, भाकरी किंवा वरण भातासोबत सुद्धा खाऊ शकता. यामुळे जेवणाची रंगातदार चव वाढेल आणि चार घास जेवण जास्त जाईल, कच्च्या कैरीपासून बनवलेला मेथांबा आठवडाभर व्यवस्थित टिकून राहतो. पदार्थाला पाणी किंवा घाणीचे हात न लावल्यास महिनाभरापेक्षा जास्त वेळ मेथांबा टिकून राहतो. चला तर जाणून घेऊया मेथांबा बनवण्याची पारंपरिक रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : लहान मुलं सारखी पिझ्झाचा हट्ट करतायेत? मग विकतचा नको, घरीच बनवा हेल्दी ‘रव्याचा पिझ्झा’

साहित्य:

  • कच्ची कैरी
  • मेथी दाणे
  • मीठ
  • लाल तिखट
  • हळद
  • मोहरी
  • हिंग
  • गूळ
जेवणाची रंगत वाढवणारा टेस्टी पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत हिरव्या मिरचीचे लोणचं, नोट करा रेसिपी

कृती:

  • कच्च्या कैरीचा मेथांबा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कच्ची कैरी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याच्या वरील साल काढून कैरीचे मध्यम आकारात तुकडे करून घ्या. त्यानंतर कैरी पाण्यात ठेवा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि हिंग घालून भाजा. त्यानंतर त्यात मेथी दाणे घालून लाल होईपर्यंत भाजा.
  • कढई खालील गॅस बंद करून त्यात हळद, लाल तिखट आणि कच्च्या कैरीचे तुकडे घालून मिक्स करा आणि पुन्हा गॅस चालू करा. यामुळे लाल तिखट जळून जाणार नाही.
  • कैरीला एक वाफ आल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार गूळ आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा आणि काहीवेळ शिजवून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला कच्च्या कैरीचा मेथांबा.

Web Title: Instantly make kairi methamba to be taken orally with meals take note of the traditional ingredients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • raw mango

संबंधित बातम्या

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
1

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
2

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
3

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ
4

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.