Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

International Trip : 40,000 रुपयांत पूर्ण होईल आंतरराष्ट्रीय प्रवास, हे 6 देश काम खर्चात देतील अविस्मरणीय अनुभव

४०,००० रुपयांच्या आत परदेश फिरायचंय?  जगात असे काही सहा सुंदर देश आहेत जिथे कमी खर्चात निसर्ग, संस्कृती आणि समुद्रकिनाऱ्यांचा अविस्मरणीय अनुभव घेता येतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 24, 2025 | 09:46 AM
International Trip : 40,000 रुपयांत पूर्ण होईल आंतरराष्ट्रीय प्रवास, हे 6 देश काम खर्चात देतील अविस्मरणीय अनुभव

International Trip : 40,000 रुपयांत पूर्ण होईल आंतरराष्ट्रीय प्रवास, हे 6 देश काम खर्चात देतील अविस्मरणीय अनुभव

Follow Us
Close
Follow Us:
  • योग्य प्लॅनिंग आणि स्वस्त फ्लाइट्सने ४०,000 रुपयांमध्ये परदेश प्रवास शक्य आहे.
  • नेपाळ, श्रीलंका, थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि मलेशिया बजेट ट्रॅव्हलर्ससाठी उत्तम.
  • निसर्ग, बीच, संस्कृती, लोकल फूड आणि किफायतशीर स्टे यामुळे अनुभव परवडणारा आणि संस्मरणीय होतो.
परदेशात फिरण्याचं स्वप्न अनेक जण पाहतात, पण बजेट पाहून प्लॅन पुढे ढकलावा लागतो. मात्र, थोडी योग्य प्लॅनिंग, स्वस्त फ्लाइट्स आणि बजेट-फ्रेंडली निवासाचा पर्याय निवडला, तर तुम्ही देखील परदेश सफर सहज करू शकता. जगात असे अनेक देश आहेत, जिथे कमी खर्चात निसर्ग, संस्कृती, समुद्रकिनारे आणि स्वादिष्ट अन्नाचा अनुभव घेता येतो. खाली दिलेले हे ६ देश तुमचा खर्चही वाचवतात आणि अनुभवही अद्भुत देतात.

देवालाही थंडी वाजते….पुण्यातील या मंदिरात हिवाळ्यात गणपतीला घातले जातात कपडे, गोंडस रूप पाहूनच मन मोहित होईल

नेपाळ 

जर तुम्हाला हिमालयाचं सौंदर्य, गर्द हिरवाई आणि शांत वातावरण आवडत असेल, तर नेपाळ तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. काठमांडूचे प्राचीन मंदिरे, भक्तपूर आणि पाटनची सांस्कृतिक वारसा स्थळे, तसेच पोखरातील शांत तलाव…हे सर्व पाहताना तुमचा प्रवास खरोखरच खास बनतो. भारतातून बस, ट्रेन किंवा स्वस्त फ्लाइट्सने नेपाळमध्ये सहज पोहोचता येते. स्थानिक वाहतूकही खूप किफायतशीर असल्याने हा देश बजेट ट्रॅव्हलर्ससाठी परफेक्ट आहे.

श्रीलंका 

भारताच्या जवळ असल्यामुळे श्रीलंकेचे पर्यटन खर्च तुलनेने कमी पडतात. कोलंबोतील आधुनिक जीवन, गॉलचा ऐतिहासिक किल्ला, नुवारा एलियातील चहाचे हिरवेगार मळे आणि स्वच्छ सुवर्ण समुद्रकिनारे—हे सर्व अनुभवताना तुमचा दिवस रंगून जातो. किनाऱ्यालगतची ट्रेन राइड, ताजं सी-फूड आणि शांत वातावरणामुळे श्रीलंका बजेटमध्ये सुंदर सुट्टीसाठी योग्य गंतव्य ठरते.

थायलंड 

बँकॉकची गर्दीने भरलेली पण आकर्षक बाजारपेठ, पटायाची नाईटलाइफ आणि फुकेट-क्राबीचे अप्रतिम बीच थायलंडमध्ये तुम्हाला सर्व काही वाजवी दरांत मिळते. स्वस्त शॉपिंग, टेस्टी स्ट्रीट फूड आणि बजेट निवासामुळे भारतीय पर्यटकांची ही पहिली पसंती ठरते.

व्हिएतनाम

अलीकडे भारतीय पर्यटकांमध्ये व्हिएतनाम खूप लोकप्रिय झाला आहे. हनोईच्या जुन्या गल्ली, हो ची मिन्ह सिटीचा आधुनिक स्पर्श आणि हा लॉंग बेसारखा जगप्रसिद्ध क्रूझ अनुभव या देशाला खास बनवतो. स्थानिक खर्च भारतापेक्षा कमी असल्याने प्रवास अधिक परवडतो.

इंडोनेशिया

इंडोनेशियामध्ये बाली प्रसिद्ध असले तरी इतर अनेक बेटेही तितकीच सुंदर आहेत. पायर्‍यांसारखे दिसणारे भातशेतीचे नजारे, धबधबे, शांत बीच, बजेट रिसॉर्ट्स आणि स्थानिक ‘वारुंग’मध्ये मिळणारे परवडणारे खाद्य, यामुळे हा देश साहस आणि निसर्गप्रेमी दोघांसाठी आदर्श आहे.

थंडीच्या दिवसांत या 3 धार्मिक स्थळांची यात्रा ठरते सुखकर; निसर्ग आणि अध्यात्माचा अद्भुत मेळ

मलेशिया 

क्वालालंपूरच्या गगनचुंबी इमारती, पेट्रोनास टॉवर्स, जेंटिंग हायलँड्स आणि लंगकावीचे मनमोहक किनारे मलेशिया विविध अनुभवांनी परिपूर्ण आहे. स्वस्त फ्लाइट्स आणि किफायती अन्न-निवासामुळे हा देश आरामदायी आणि बजेट-फ्रेंडली ठरतो. योग्य वेळी बुकिंग, हलकं पॅकिंग आणि किफायतशीर निवास यामुळे हे सर्व देश तुम्हाला ४०,००० रुपयांच्या आत एका संस्मरणीय इंटरनॅशनल ट्रिपचा अनुभव देऊ शकतात.

Web Title: International travel will be completed for 40000rs these 6 countries should be included in your list travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 09:46 AM

Topics:  

  • tourism
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

थंडीच्या दिवसांत या 3 धार्मिक स्थळांची यात्रा ठरते सुखकर; निसर्ग आणि अध्यात्माचा अद्भुत मेळ
1

थंडीच्या दिवसांत या 3 धार्मिक स्थळांची यात्रा ठरते सुखकर; निसर्ग आणि अध्यात्माचा अद्भुत मेळ

देवालाही थंडी वाजते….पुण्यातील या मंदिरात  हिवाळ्यात गणपतीला घातले जातात कपडे, गोंडस रूप पाहूनच मन मोहित होईल
2

देवालाही थंडी वाजते….पुण्यातील या मंदिरात हिवाळ्यात गणपतीला घातले जातात कपडे, गोंडस रूप पाहूनच मन मोहित होईल

SBI Card Listicle: दिमाखात पर्यटन करा आणि स्मार्ट शॉपिंग करा! एसबीआय कार्डचे टॉप-७ पर्याय, जाणून घ्या कोणासाठी कोणते कार्ड बेस्ट
3

SBI Card Listicle: दिमाखात पर्यटन करा आणि स्मार्ट शॉपिंग करा! एसबीआय कार्डचे टॉप-७ पर्याय, जाणून घ्या कोणासाठी कोणते कार्ड बेस्ट

Destination Wedding साठी भारतातील ही 5 ठिकाणे आहेत ड्रीम लोकेशन, इथे लग्न कराल तर आयुष्यभर लक्षात ठेवाल सोहळा
4

Destination Wedding साठी भारतातील ही 5 ठिकाणे आहेत ड्रीम लोकेशन, इथे लग्न कराल तर आयुष्यभर लक्षात ठेवाल सोहळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.