Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iodine Deficiency: आयोडीनची कमतरता ठरू शकते धोकादायक! शरीरावर होतात ‘हे’ गंभीर परिणाम

Iodine Deficiency Causes: आयोडीन हे शरीरासाठी आवश्यक सूक्ष्म खनिज असून ते थायरॉईड ग्रंथीचे कार्य आणि हार्मोन्सचे संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरात आयोडीनची कमतरता असल्यास ताय परिणाम होतो, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 07, 2026 | 08:56 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • आयोडीनची कमतरता ठरू शकते धोकादायक
  • शरीरावर होतात ‘हे’ गंभीर परिणाम
  • आयोडीनची कमतरता का धोकादायक ठरते?

निरोगी शरीरासाठी प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांप्रमाणेच आयोडीन हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीराला त्याची गरज कमी प्रमाणात असली तरी थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आयोडीन आवश्यक असते. शरीरात आयोडीनची कमतरता निर्माण झाल्यास थायरॉईड हार्मोन्सचे उत्पादन कमी होते, ज्याचा परिणाम चयापचय, ऊर्जा, मेंदूचा विकास आणि संपूर्ण आरोग्यावर होऊ शकतो. विशेषतः गर्भवती महिला, लहान मुले आणि स्तनपान करणाऱ्या मातांनी आयोडीनच्या सेवनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

Mouth Ulcer: वारंवार तोंड येतेय का? दुर्लक्ष करू नका; ‘या’ ५ गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

आयोडीनची कमतरता का धोकादायक ठरते?

आयोडीन हे थायरॉईड हार्मोन्स तयार करण्यासाठी आवश्यक घटक आहे. हे हार्मोन्स शरीराचा चयापचय, वाढ, पेशींची कार्यक्षमता आणि मेंदूच्या विकासाचे नियमन करतात. आयोडीनची कमतरता दीर्घकाळ राहिल्यास थायरॉईड ग्रंथीवर ताण येऊन विविध आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

आयोडीनच्या कमतरतेची प्रमुख लक्षणे

  • सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे.
  • गळ्याजवळ थायरॉईड ग्रंथी सुजणे (गॉइटर).
  • वजन अचानक वाढणे.
  • त्वचा कोरडी पडणे आणि केस गळणे.
  • सतत थंडी वाजणे.
  • एकाग्रता कमी होणे आणि स्मरणशक्तीवर परिणाम होणे.
  • मुलांमध्ये बौद्धिक विकासावर परिणाम होण्याचा धोका.

आयोडीनची कमतरता असल्यास काय करावे?

आयोडीनच्या कमतरतेची लक्षणे दिसत असल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आवश्यक असल्यास थायरॉईडची तपासणी आणि इतर रक्तचाचण्या करून घ्या .तसेच, वैद्यकीय सल्ल्यानुसार आहारात आवश्यक बदल करा. आयोडीनयुक्त पदार्थांचे संतुलित सेवन करा.

कोणाला अधिक धोका असतो?

गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता, लहान मुले आणि आयोडीनयुक्त अन्नाचे कमी सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये कमतरतेचा धोका अधिक असतो. गर्भधारणेदरम्यान आयोडीनची कमतरता राहिल्यास बाळाच्या मेंदूच्या विकासावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

आयोडीनची कमतरता कशी टाळावी?

आयोडीनयुक्त मीठ नियमित वापरणे हा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. याशिवाय दूध, दही, अंडी, मासे, समुद्री अन्न आणि काही दुग्धजन्य पदार्थांमधूनही आयोडीन मिळते. संतुलित आहारासोबत आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक आहार घ्यावा. स्वतःहून आयोडीनची औषधे किंवा सप्लिमेंट्स घेणे टाळावे, कारण जास्त प्रमाणातील आयोडीनही थायरॉईडसाठी हानिकारक ठरू शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Analogue Paneer: तुम्हीही खात नाही ना बनावट पनीर? कसे तयार होते; आरोग्यासाठी किती धोकादायक

Web Title: Iodine deficiency causes symptoms effects thyroid health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 08:56 PM

Topics:  

  • health care news
  • healthy food
  • thyroid care

संबंधित बातम्या

Washim News: गणेश मंडळातून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; मोफत आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार
1

Washim News: गणेश मंडळातून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; मोफत आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

Jeera Water: वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी खरंच उपयोगी? रोज पिण्याआधी जाणून घ्या फायदे-तोटे
2

Jeera Water: वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी खरंच उपयोगी? रोज पिण्याआधी जाणून घ्या फायदे-तोटे

HPV Vaccination: HPV लसीकरणासाठी योग्य वय का महत्त्वाचे आहे? तज्ज्ञांचा सल्ला
3

HPV Vaccination: HPV लसीकरणासाठी योग्य वय का महत्त्वाचे आहे? तज्ज्ञांचा सल्ला

Jalgaon News: सेवेचा हात, आनंदाची साथ! विशेष मुलांसोबत साजरा केला सामाजिक बांधिलकीचा दिवस
4

Jalgaon News: सेवेचा हात, आनंदाची साथ! विशेष मुलांसोबत साजरा केला सामाजिक बांधिलकीचा दिवस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.