Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US Peace Talks : पाकिस्तानच्या या लग्झरी हॉटेलमध्ये पार पडली इराण अमेरिकेची बैठक, जाणून घ्या इथे काय आहे खास…

Pakistan 5 Star Hotel : पाकिस्तानच्या एका आलिशान ५ तारांकित हाॅटेलमध्ये इराण आणि अमेरिकेची महत्त्वपूर्ण राजनैतिक बैठक पार पडली. चला हाॅटेलमध्ये नक्की काय खास आहे ते जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 12, 2026 | 09:00 AM
Iran-US Peace : पाकिस्तानच्या या लग्झरी हॉटेलमध्ये पार पडली इराण अमेरिकेची बैठक, जाणून घ्या इथे काय आहे खास...

Iran-US Peace : पाकिस्तानच्या या लग्झरी हॉटेलमध्ये पार पडली इराण अमेरिकेची बैठक, जाणून घ्या इथे काय आहे खास...

Follow Us
Follow Us:
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
  • उच्च सुरक्षा आणि आलिशान ठिकाणामुळे एका खास स्थळाची निवड.
  • दोन्ही देशांमध्ये पुढील निर्णयासाठी चर्चा पार पडली.
इराण आणि अमेरिकेत सुरु असलेल्या युद्धाने संपूर्ण जगाच्या समस्या वाढवून ठेवल्या होत्या. याचा सर्वात मोठा परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाल्याचे दिसून आले. अशातच आता या युद्धाला काही काळ स्थगिती देण्यात आली असून पाकिस्तानमध्ये यासंबंधित एक बैठक ठेवण्यात आली आहे. अमेरिका आणि इराणचे पंतप्रधान पाकिस्तानात एकत्र येऊन पुढे नक्की करायचं आहे यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेतील. ही ऐतिहासिक राजनैतिक बैठक इस्लामाबादच्या सेरेना हाॅटेलमध्ये पार पडणार आहे. हे पाकिस्तानचे एक प्रीमियम ५ स्टार हाॅटेल असल्याचे म्हटले जाते. तर या बैठकीत पाकिस्तान देखील मध्यस्थाची भूमिका बजावणार असल्याचे सांगितले जात आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेले वैर संपवण्यासाठी येथे एक आराखडा तयार केला जाऊ शकतो.

भक्तांसाठी आनंदाची बातमी! लवकरच खुले होणार बद्रीनाथ धामचे कपाट… या दिवसापासून घेता येणार दर्शन

हाॅटेलकडे सर्वांचे लक्ष

आता पाकिस्तानातील कोणत्या हाॅटेलमध्ये अमेरिका आणि इराणची ही महत्त्वपूर्ण बैठक बसणार आहे हे जाणून घेण्यासाठी लोक अधिक आतुर झाले आहेत. सेरेना हाॅटेलकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले असून या हाॅटेलमध्ये काय खास आहे ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. परदेशी शिष्टमंडळांच्या निवासासाठी आणि संभाव्यतः वाटाघाटींचे मुख्य ठिकाण बनण्यासाठी, हे आलिशान हॉटेल आता पाकिस्तानी सरकारने ताब्यात घेतले आहे. दरम्यान १० एप्रिललाच दोन्ही देशांचे पंतप्रधान पाकिस्तानात दाखल झाले होते. ११ एप्रिल २०२६ रोजी त्यांची बैठक पार पडली आणि त्याच दिवशी चर्चा संपवून एक करार देखील करण्यात आला.

माहितीनुसार, या बैठकीसाठी सेरेना हाॅटेलमधील सर्व प्रवाशांना हाॅटेल रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. हॉटेलच्या वेबसाइटनुसार , सेरेना हॉटेल इस्लामाबादमध्ये एकूण ३३६ खोल्या आणि ५२ स्वीट्स असून ते आलिशान निवासाचा अनुभव देते. प्रत्येक खोलीची रचना पाकिस्तानचा समृद्ध वारसा दर्शवेल अशी केली आहे. इथे पारंपारिक मूरिश कला आणि आधुनिक सुविधांचा अनोखा मिलाफ पाहता येतो. खास फर्निचर, आरामदायी बिछाना आणि हाताने विणलेले गालिचे, त्याचबरोबर संगमरवरी नक्षीकाम यांंमुळे हाॅटेलचा सुंदरता डोळ्यात टिपण्यासारखी बनते. हे हाॅटेल १४ एकर परिसराक पससरे असून एका सुंदर बागेच्या मधोमध त्याला बांधण्यात आले आहे. इथून टेकड्या आणि शांत तलावाचे दृष्या पाहता येते.

सुरक्षित आहे वास्तू

या हाॅटेलची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे हाॅटेल एका सुरक्षित आणि शांत परिसरात वसलेले आहे. हेच कारण आहे की बहुतेक उच्चस्तरीय बैठका आणि संवेदनशील राजनैतिक वाटाघाटींसाठी या हाॅटेलला एका उत्तम ठिकाण मानले जाते. राजनयिक, आंतरराष्ट्रीय पाहुणे आणि सरकारी प्रतिनिधीमंडळे अनेकदा येथे मुक्काम करतात. हे हॉटेल सुंदर बागांच्या मधोमध वसलेले असून, त्याची रचना ७.५ पेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप सहन करण्याच्या दृष्टीने केली आहे. हाॅटेलची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण असून महत्त्वाच्या वाटाघाटींसाठी इथे खास प्रेसिडेशियल स्वीट्स आणि एक्झिक्युटिव्ह लाउंज तयार करण्यात आले आहेत.

बजेटमध्ये ट्रिप होईल पूर्ण! फक्त 10,000 रुपयांत फिरता येतात भारतातील ही ठिकाणे

खाण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध

हाॅटेलच्या वेबसाइटनुसार, इथे डायनिंगचे सहा वेगवगळे पर्याय उपलब्ध आहेत –

राकापोशी: राकापोशी हे एक सुंदर पेस्ट्री शॉप आणि कॅफे आहे. इथे हाॅट ड्रींक्स, स्नॅक्स आणि थंड पेयांचा आनंद घेता येतो.
जमाना: जमाना हे एक आलिशान ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट आहे, जिथे सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, हाय टी आणि रात्रीच्या जेवणासाठी मोठे बुफे बसवले जाते.
दावत: दावत एक प्रीमीयम फाईन डाईन रेस्टाॅरंट आहे जिथे अस्सल पाकिस्तानी पदार्थांचा आस्वाद घेता येतो.
बारादरी: बारादरी हे एक पारंपरिक पाकिस्तानी बार्बेक्यू रेस्टॉरंट आहे. इथे तुम्ही चवदार तंदुरमध्ये भाजलेल्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
अल मघरेब: इथे तुम्हाला मध्य पूर्वेतील वातावरणाचा अनुभव घेता येईल. हे रेस्टॉरंट मध्य-पूर्वेकडील आणि अरबी खाद्यसंस्कृतीचे विविध मिश्रण सादर करते.
वाइल्ड राइस: इथे तुम्हाला आग्नेय आशिया आणि इस्लामाबादची चव चाखता येते. इंडोनेशियन, जपानी आणि चायनीज पदार्थ इथली खासियत आहे.

Web Title: Iran us meeting held at pakistan serena hotel know special here travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • hotel
  • Iran Vs America
  • travel news

संबंधित बातम्या

Sapt Badri Yatra : तुम्ही पाहिले आहेत का उत्तराखंडमधील सप्तबद्री? अशी प्लॅन करा यात्रा
1

Sapt Badri Yatra : तुम्ही पाहिले आहेत का उत्तराखंडमधील सप्तबद्री? अशी प्लॅन करा यात्रा

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या
2

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या
3

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या

Travel News : जगातील सर्वात अनोखा एअरपोर्ट, इथे समुद्रकिनाऱ्यावर लँड करते फ्लाईट
4

Travel News : जगातील सर्वात अनोखा एअरपोर्ट, इथे समुद्रकिनाऱ्यावर लँड करते फ्लाईट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.