Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IRCTC चे नवे टूर पॅकेज लाँच; 17,000 हून कमी पैशात करा अयोध्या, काशी आणि पुरीची सफर

IRCTC Tour Package : धार्मिक पर्यटनाने मन:शांती मिळते. तुम्हालाही देशातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांना भेट द्यायची असेल तर हे टूर पॅकेज तुमच्यासाठी खास ठरणार आहे. यात कमी खर्चासह भाविकांच्या खाण्या-पिण्याची आणि राहण्याचीही सोय केली जाईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 02, 2026 | 08:28 AM
IRCTC चे नवे टूर पॅकेज लाँच; 17,000 हून कमी पैशात करा अयोध्या, काशी आणि पुरीची सफर

IRCTC चे नवे टूर पॅकेज लाँच; 17,000 हून कमी पैशात करा अयोध्या, काशी आणि पुरीची सफर

Follow Us
Follow Us:
  • देशातील काही प्रसिद्ध धार्मिक स्थळांना भेट देण्याची विशेष संधी उपलब्ध झाली आहे.
  • प्रवाशांसाठी प्रवास, निवास आणि इतर सोयींची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.
  • मर्यादित जागा असल्याने इच्छुकांनी वेळेत नोंदणी करणे आवश्यक आहे.
तुम्हीही जर धार्मिक पर्यटन करण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. इंडियन रेल्वे टूरिजम काॅर्पोरेशन (IRCTC) तुमच्यासाठी एक खास टूर पॅकेज घेऊन आलं आहे. या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला कमी खर्चात उत्तम सेवांसह आयोध्या, प्रयागराज, वाराणसी आणि गया सारख्या धार्मिक स्थळांना भेट देण्याची सुवर्णसंधी मिळेल. हे तीनही क्षेत्र आपल्या धार्मिक महत्त्वासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. दरवर्षी मोठ्या श्रद्धेने इथे हजारो पर्यटक देवाच्या दर्शनासाठी येतात. अशात तुम्हीही धार्मिक पर्यटनाचा विचार केला असेल तर हे टूर पॅकेज तुमच्यासाठी खास ठरणार आहे. IRCTC द्वारे भारत गौरव स्पेशल टूरिस्ट ट्रेन’ने पर्यटकांना गंतव्यस्थानापर्यंत पोहचवण्यात येईल. चला या पॅकेजची काही सविस्तर माहिती जाणून घेऊया.

गोव्याला जाऊन कंटाळलात? मग यावेळी निवडा पदुचेरीचा पर्याय, फक्त मंदिर आणि बीच नाही इथे फिरण्यासाठी आहेत असंख्य ठिकाणे

कधी सुरु होईल यात्रा?

ही संपूर्ण यात्रा ९ ते १० दिवसांची असेल ज्यात तुम्हाला सर्व ठिकाणी मनसोक्तपणे फिरता येतील. ही स्पेशल ट्रेन ४ ऑगस्ट २०२६ ला सिकंदराबाद रेल्वे स्टेशनपासून सुरु होईल आणि इथून ती सर्व ठिकाणी जाईल.

कोणकोणत्या ठिकाणांना भेट देता येईल?

या पॅकेजच्या मदतीने भाविकांना देशातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांची सैर करण्यात येईल.

  • अयोध्या – रामाची जन्मभूमी म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण धार्मिक पर्यटनासाठी जगप्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला राम मंदिर, राम मंदिराव्यतिरिक्त अयोध्येत हनुमान गढी, कनक भवन, गुप्तार घाट, आणि सरयू नदीचे घाट यांसारख्या ठिकाणांना भेट देता येईल.
  • वाराणसी – उत्तर प्रदेशातील गंगा नदीच्या काठी वसलेले हे ठिकाण जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक मानले जाते. इथे तुम्हाला गंगा आरती, काशी विश्वनाथ मंदिर अशा धार्मिक स्थळांना भेट देता येईल. इथे तुम्ही बनारसी साड्या आणि पारंपारिक खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येईल.
  • गया – हे एक ऐतिहासिक आणि अत्यंत पवित्र शहर मानले जाते, जे बिहार राज्यात वसले आहे. पिंडदाणासाठी हे ठिकाण फार लोकप्रिय आहे. इथे तुम्ही प्रसिद्ध विष्णुपद मंदिराला भेट देऊ शकता.
खर्च आणि सुविधा काय असतील?

आपल्या यात्रेची ही बुकिंग तुम्ही तुमच्या बजेट आणि सोयीनुसार करु शकता. या टूर पॅकेजमध्ये यात्रेकरुंना आपल्या खाण्या-पिण्याची गरज करायची गरज लागणार आहे. हे एक ‘ऑल-इंक्लूसिव’ पॅकेज असणार आहे ज्यात तुमच्या राहण्याचीही सोय केली जाईल.प्रत्येक व्यक्तीनुसार खर्च खालीलप्रमाणे असेल:

  • इकोनॉमी (स्लीपर क्लास): १६,५०० रुपये
  • स्टॅंडर्ड (थर्ड एसी): २५,६०० रुपये
  • कंफर्ट (सेकंड एसी): ३३,४०० रुपये
Travel : पिसफुल डेस्टिनेशनच्या नावाने लोकप्रिय होत आहे हे ठिकाण; गर्दीपासून दूर… कुठे वसले आहे ते जाणून घ्या

बुकिंग कशी करावी?

तुम्हालाही जर या टूर पॅकेजचे बुकिंग करायचे असेल तर तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमच्या यात्रेची बुकिंग करु शकता. ऑनलाइन तिकिट बुकिंगसाठी irctctourism.com या वेब साईटला भेट द्या. ट्रेनमध्ये फक्त ७०२ सीट्स उपलब्ध असतील ज्यामुळे आपली बुकिंग वेळेत करा. यात स्लीपलसाठी १६० सीट्स तर थर्ड एसीसाठी ४९० सीट्स आणि सेकंड एसीसाठी ५२ सीट्स उपलब्ध असतील.

Web Title: Irctc bharat gaurav special train tour package for ayodhya varanasi prayagraj and gaya booking details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 08:28 AM

Topics:  

  • IRCTC Tour Package
  • Religious Places
  • travel news

संबंधित बातम्या

Travel Name : दिल्लीतील जंतर मंतर का आहे खास? येथील 4 स्तंभांचे रहस्य जाणून घ्या
1

Travel Name : दिल्लीतील जंतर मंतर का आहे खास? येथील 4 स्तंभांचे रहस्य जाणून घ्या

Sapt Badri Yatra : तुम्ही पाहिले आहेत का उत्तराखंडमधील सप्तबद्री? अशी प्लॅन करा यात्रा
2

Sapt Badri Yatra : तुम्ही पाहिले आहेत का उत्तराखंडमधील सप्तबद्री? अशी प्लॅन करा यात्रा

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या
3

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या
4

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.