Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासिक पाळीतील हेवी ब्लीडिंगमुळे लोहाची कमतरता निर्माण झाली आहे? थकवा कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते. ही कमतरता भरून काढण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 03, 2026 | 08:42 AM
मासिक पाळीतील हेवी ब्लीडिंगमुळे लोहाची कमतरता निर्माण झाली आहे? थकवा कमी करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

मासिक पाळीतील हेवी ब्लीडिंगमुळे लोहाची कमतरता निर्माण झाली आहे? थकवा कमी करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Follow Us
Follow Us:

लोहाच्या कमतरतेची गंभीर लक्षणे कोणती?
मासिक पाळीच्या चक्रात बदल कशामुळे होतो?
लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी काय खावे?

सर्वच महिलांना महिन्यातील ४ ते ५ दिवस मासिक पाळी येते. मासिक पाळी येणे ही शरीरातील नैसर्गिक क्रिया आहे. पाळी येण्याच्या काही दिवस आधी शरीरात अनेक बदल दिसून येतात. कंबर दुखणे, पोटात वेदना होणे, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे इत्यादी अनेक त्रासांना समोर जावे लागते. हेवी ब्लीडींग झाल्यामुळे महिलांना शरीरसंबंधित असंख्य समस्या उद्भवू लागतात. जास्त ब्लीडींग झाल्यामुळे शरीर आतून पोखरले जाते आणि शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि खूप जास्त थकवा वाढतो. त्यामुळे आहारात बदल करून शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून काढणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

वजन वाढण्याची चिंता कायमची मिटेल! ‘हे’ चमचमीत स्ट्रीट फूड शरीराला ठेवतात कायमच हेल्दी, मिळेल गिल्ट-फ्री खाण्याचा आनंद

अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे लोहाची कमतरता का निर्माण होते?

दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळी दरम्यान गर्भाशयाच्या आतील थरला (एंडोमेट्रियम) गर्भधारणा झाली नाही तर, तुटून शरीराबाहेर पडतो. ३ ते ५ दिवसांच्या कालावधीमध्ये रक्तस्रावाच्या स्वरूपात बाहेर पडून जाते. या दिवसांमध्ये सामान्यतः ३० ते ८० मिलीलीटर इतका रक्तस्राव महिलांच्या शरीरातून होतो. पण काही महिलांमध्ये ८० मिलीलीटर पेक्षा जास्त रक्तस्त्राव झाल्यानंतर शरीरसंबंधित समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. या स्थितीला हेवी ब्लीडींग असे म्हंटले जाते. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे शरीरातील लोहाची पातळी झपाट्याने कमी होऊन जाते आणि ज्यामुळे रक्ताल्पता किंवा ॲनिमियासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

लोहाच्या कमतरतेची गंभीर लक्षणे कोणती:

  • शरीरात सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे
  • धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे.
  • चक्कर येणे
  • केस गळणे
  • चेहरा फिका पडणे
Rising Heat Problem: वाढत्या उन्हामुळे पुण्यात मुतखडा आणि मूत्रमार्गातील संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ

लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी कोणते पदार्थ खावेत:

मासिक पाळी दरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते. अशा महिलांनी शरीराची विशेष काळजी घेणे फार आवश्यक आहे. ‘आयरन-फॉलिक ॲसिड’ इत्यादी गोळ्यांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे. या गोळ्या लोहाची पातळी वाढवण्यास मदत करतात. रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात नेहमीच पालेभाज्या आणि इतर हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. तसेच आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बीट आणि गाजराचा रस प्यावा. डाळिंबाचे सेवन केल्यामुळे रक्त वाढण्यासोबतच रक्त शुद्ध होण्यास सुद्धा मदत होते. रोजच्या जेवणात डाळी, राजमा आणि चणे इत्यादी कढधान्याचे सेवन करावे. यामुळे शरीरात वाढलेला थकवा कमी होण्यास मदत होईल. चहा कॉफी बनवताना त्यात साखरेऐवजी गुळाचा वापर करावा. गुळाच्या सेवनामुळे शरीरात लोहाची पातळी वाढते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव का होतो?

    Ans: हार्मोन्समध्ये असंतुलन, गर्भाशयातील समस्या (फायब्रॉइड्स), थायरॉईड किंवा काही औषधांच्या परिणामामुळे जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो.

  • Que: जास्त ब्लीडिंगमुळे लोहाची कमतरता कशी होते?

    Ans: जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने शरीरातील लोह (Iron) कमी होते, ज्यामुळे अॅनिमिया होण्याचा धोका वाढतो.

  • Que: लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?

    Ans: पालक, मेथी, बीट, डाळी, खजूर, किसमिस, डाळिंब, अंडी आणि मांस यांसारखे आयर्नयुक्त पदार्थ खावेत.

Web Title: Is heavy menstrual bleeding caused by iron deficiency include these foods in your diet to reduce fatigue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy food
  • period

संबंधित बातम्या

पुदिन्याची पाने ठरतील आरोग्यासाठी वरदान! अपचन आणि पोट फुगण्याच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका
1

पुदिन्याची पाने ठरतील आरोग्यासाठी वरदान! अपचन आणि पोट फुगण्याच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

Health Update: मुंबईत टीएव्हीआर प्रक्रियांमध्ये २५% वाढ! विकसित आणि तंत्रज्ञान-आधारित कार्डियाक केअर इको सिस्टीमपैकी एक
2

Health Update: मुंबईत टीएव्हीआर प्रक्रियांमध्ये २५% वाढ! विकसित आणि तंत्रज्ञान-आधारित कार्डियाक केअर इको सिस्टीमपैकी एक

पावसाळ्यात सर्दी खोकला टाळण्यासाठी आहारात अजिबात करू नका ‘या’ पदार्थांचा समावेश, अन्यथा उद्भवतील पोटाच्या गंभीर समस्या
3

पावसाळ्यात सर्दी खोकला टाळण्यासाठी आहारात अजिबात करू नका ‘या’ पदार्थांचा समावेश, अन्यथा उद्भवतील पोटाच्या गंभीर समस्या

Menstrual Cycle: Sickle Cell Disease असलेल्या महिलांसाठी मासिक पाळीचा काळ अधिक आव्हानात्मक का ठरू शकतो?
4

Menstrual Cycle: Sickle Cell Disease असलेल्या महिलांसाठी मासिक पाळीचा काळ अधिक आव्हानात्मक का ठरू शकतो?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.