वजन वाढण्याची चिंता कायमची मिटेल! 'हे' चमचमीत स्ट्रीट फूड शरीराला ठेवतात कायमच हेल्दी, मिळेल गिल्ट-फ्री खाण्याचा आनंद
वजन वाढण्याची कारणे?
कोणते स्ट्रीट फूड खाल्ल्यास वजन नियंत्रणात राहील?
आहारात कोणते पदार्थ खाऊ नये?
बऱ्याचदा वजन वाढेल या भीतीने तिखट, तेलकट आणि स्ट्रीट फूड खाण्याचे टाळले जाते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात अनेक बदल केले जातात. कधी डाएट केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध सप्लिमेंट्सचे करून वजन कमी केले जाते. पण तरीसुद्धा मित्रमैत्रिणींसोबत कुठेही बाहेर फिरायला गेल्यानंतर किंवा भूक लागल्यानंतर विकतचे पदार्थ आणून हमखास खाल्लेले जातात. तळलेले वडे, समोसे किंवा चीज, पिझ्झा, बर्गर इत्यादी विविध चविष्ट पदार्थ आवडीने खाल्ले जातात. त्यामुळे चमचमीत पदार्थांपासून जिभेवर ताबा ठेवणे फार अवघड होऊन जाते. वजन वाढल्यानंतर ते कमी करताना खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. आवडत्या पदार्थांचे सेवन न करता कित्येक महिने काढावे लागतात. पण बाजारात केवळ तिखट आणि तेलकट पदार्थासोबतच इतर पौष्टिक आणि दीर्घकाळ पोट भरलेले राहील असे पदार्थ सुद्धा सहज मिळतात.(फोटो सौजन्य – istock)
रात्री खाल्लेल्या अन्नाचं शरारीत विष बनतंय का? जेवणाची वेळ आणि पचनामागील सायन्स जाणून घ्या
बाहेर फिरायला गेल्यानंतर कायमच फ्रँकी किंवा पिझ्झा, बर्गर खाण्याऐवजी तुम्ही इतर वेगवेगळ्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकतात. हे पदार्थ शरीराचे वजन न वाढवता कायमच हेल्दी राहण्यास मदत करतात. डाईट करताना केवळ हेल्दी, बेचव आणि उकडलेल्या भाज्यांचे सेवन न करता इतरही पौष्टिक पदार्थ तुम्ही खाऊ शकता. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतील. हे स्ट्रीट फूड खाल्ल्यास वजन वाढण्याची भीती कायमची तुमच्या मनातून निघून जाईल आणि गिल्ट-फ्री पदार्थ खाण्याचा आनंद तुम्हाला मिळेल.
कुठेही बाहेर फिरायला गेल्यानंतर प्रवास करून भूक लागल्यास भाजलेले चणे तुम्ही खाऊ शकता. भाजलेल्या कहाण्यांमध्ये कांदा, टोमॅटो आणि लिंबू तयार केलेले चणा चाट चवीला अतिशय सुंदर लागते आणि पोट सुद्धा भरलेले राहते. चणा चाट हा लो-कॅलरी नाश्ता आहे. यामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते आणि पचनक्रिया मजबूत राहण्यास मदत होते.
संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर उकडलेल्या शेंगदाण्यांपासून बनवलेले चाट खावे. उकडलेले शेंगदाणे, कोथिंबीर , मिरची आणि लिंबू, कांदा, टोमॅटो घालून तयार केलेले चाट चवीला अतिशय सुंदर लागते. शेंगदाणे शरीरासाठी निरोगी फॅट्स आहेत, यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही शेंगदाण्याचे चाट खाऊ शकता.
मक्याचे भाजलेले कणीस बाजारात कायमच उपलब्ध असते. याशिवाय मक्याच्या दाण्यांपासून बनवलेले चाट सुद्धा चवीला अतिशय सुंदर लागते. यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि फायबर खूप जास्त प्रमाणात आढळून येते. भाजलेल्या मक्याच्या कणिसावर लिंबाचा रस, लाल तिखट आणि चीज लावून खाल्ल्यास चवीसोबतच स्ट्रीट फूड खाण्याचा आनंद सुद्धा मिळेल.
बाहेर फिरायला गेल्यानंतर प्रत्येकाला चायनीज खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही व्हेजिटेबल मोमोजची निवड करू शकता. पण मोमोज खाताना त्यात कमीत कमी मैदा असेल याची काळजी घ्यावी. याशिवाय गरमागरम स्ट्रीट फूड खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही शेवपुरी किंवा रगडा इत्यादी तिखट आणि चविष्ट पदार्थांची निवड करू शकता.
Ans: सर्वच स्ट्रीट फूड वजन वाढवत नाही. जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ वजन वाढवतात, पण हेल्दी पर्याय निवडल्यास समस्या होत नाही.
Ans: हो, पण प्रमाणात आणि हेल्दी पर्याय निवडून खाल्ले तर वजन नियंत्रणात राहू शकते.
Ans: कमी तेल, ताजे साहित्य, उकडलेले किंवा भाजलेले पदार्थ आणि स्वच्छतेकडे लक्ष देणे महत्त्वाचे.






