Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडीमुळे त्वचा खूप जास्त कोरडी पडली आहे? मग चमचाभर तुपाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, सुरकुत्या- डार्क सर्कल होतील नष्ट

रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर तुपाने मसाज केल्यास त्वचेच्या रक्तवाहिन्या सक्रिय होतील आणि त्वचा अतिशय सुंदर दिसेल. तुपामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा हायड्रेट ठेवतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 01, 2025 | 09:53 AM
थंडीमुळे त्वचा खूप जास्त कोरडी पडली आहे? मग चमचाभर तुपाचा 'या' पद्धतीने करा वापर

थंडीमुळे त्वचा खूप जास्त कोरडी पडली आहे? मग चमचाभर तुपाचा 'या' पद्धतीने करा वापर

Follow Us
Close
Follow Us:

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचा खूप जास्त कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. याशिवाय त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधरण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. थंड वातावरणात त्वचेमधील ओलावा कमी होऊन जातो आणि त्वचा सुकल्यासारखी निस्तेज दिसू लागते. रखरखीत, ओढल्यासारखी त्वचा झाल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करून त्वचेची गुणवत्ता सुधारतात. पण वारंवार क्रीम्स, सीरम, नाईट क्रीम्स लावल्यामुळे त्वचेमध्ये फारसा फरक दिसून येत नाही. काहीवेळा त्वचा खूप जास्त खराब होऊन जाते. थंडीत चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीमचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)

चेहऱ्यावर हवा आहे पार्लरसारखा ग्लो? मग २० रुपयांच्या पपईचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल चमकदार

त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी तुपाचा वापर करावा. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले तूप त्वचा अधिक सुंदर आणि उजळदार करते. थंडीत त्वचेला बाहेर पोषण देण्यापेक्षा आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. तुपामध्ये जीवनसत्त्वे ए, डी, ई, ओमेगा-३ आणि ओमेगा-९ फॅटी ऍसिड इत्यादी अनेक घटक आढळून येतात. सकाळी उठल्यानंतर चमचाभर तुपाचे सेवन केल्यास शरीर आतून हायड्रेट राहते आणि त्वचेच्या समस्येंपासून आराम मिळतो. त्वचेला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी तुपाचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला चमचाभर तुपाचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

कोरड्या त्वचेवर ‘या’ पद्धतीने लावा तूप:

थंडीच्या दिवसांमध्ये कोरडी पडलेली त्वचा पुन्हा नव्याने चमकदार करण्यासाठी तुपाचा वापर करावा. तुपामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा आतून हायड्रेट आणि सुंदर ठेवतात. याशिवाय त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी तूप फायदेशीर आहे. कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी नाईट क्रीम म्हणून तुपाचा वापर करावा. तूप चेहऱ्यावर लावण्याआधी त्वचा स्वच्छ करून घ्या. त्यानंतर कॉटनच्या कपड्याने त्वचा व्यवस्थित कोरडी करा. त्यानंतर हातांवर तूप घेऊन त्वचेवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल आणि त्वचा अतिशय चमकदार होईल. याशिवाय त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी चमचाभर तूप नियमित सेवन करावे.

हिवाळ्यात कोरड्या त्वचेला द्या नैसर्गिक ओलावा! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे त्वचा होईल चमकदार आणि तेजस्वी

थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा हलक्या हाताने मसाज करणे अतिशय महत्वाचे आहे. यामुळे थंडीत आकुंचन पावलेल्या नसा मोकळ्या होतील. तसेच तेलकट त्वचा असलेल्या महिलांनी चेहऱ्यावर तूप लावू नये. तूप त्वचेवर लावण्याऐवजी चमचाभर तुपाचे सेवन करावे. वेदनशील, ड्राय, पिग्मेंटेशन, डार्क सर्कल आणि एजिंग स्किन तूप वरदान मानले जाते. बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती आणि आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या तुपाचा वापर करावा.

Web Title: Is the cold too dry for your skin then use a spoonful of ghee in this way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 09:53 AM

Topics:  

  • Benefits of Ghee
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

महागड्या- केमिकल युक्त कंडिशनरचा वापर करण्याऐवजी १० रुपयांमध्ये घरीच बनवा नॅचरल हेअर मास्क, केस होतील मुलायम
1

महागड्या- केमिकल युक्त कंडिशनरचा वापर करण्याऐवजी १० रुपयांमध्ये घरीच बनवा नॅचरल हेअर मास्क, केस होतील मुलायम

Skin Care Tips: महागडा पील ऑफ मास्क लावणे कायमचे जा विसरून! ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल मास्क
2

Skin Care Tips: महागडा पील ऑफ मास्क लावणे कायमचे जा विसरून! ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल मास्क

गॅस – ब्लोटिंगमुळे पोटात कायमच वेदना होतात? जेवणाआधी करा ‘या पदार्थांचे सेवन, अपचनाच्या त्रासापासून मिळेल सुटका
3

गॅस – ब्लोटिंगमुळे पोटात कायमच वेदना होतात? जेवणाआधी करा ‘या पदार्थांचे सेवन, अपचनाच्या त्रासापासून मिळेल सुटका

केस खूप जास्त पातळ झाले आहेत? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांच्या समस्या होतील कायमच्या गायब
4

केस खूप जास्त पातळ झाले आहेत? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांच्या समस्या होतील कायमच्या गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.