स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांच्या वापरामुळे त्वचा होईल चमकदार आणि तेजस्वी
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा खूप जास्त कोरडी होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम चेहऱ्यावर झाल्यानंतर त्वचा काहीशी टॅन आणि निस्तेज वाटू लागते. त्वचेची पोत खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी वारंवार स्किन ट्रीटमेंट, फेशिअल, क्लीनअप, स्किन केअर इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण तरीसुद्धा त्वचा सुंदर आणि उठावदार दिसत नाही. चेहऱ्यावर वाढलेले मुरूम, पिंपल्स किंवा त्वचेच्या इतर समस्या चेहऱ्यावरील ग्लो पूर्णपणे कमी करून टाकतात. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेला पोषण देण्याची खूप जास्त आवश्यकता असते.(फोटो सौजन्य – istock)
त्वचेमधील नैसर्गिक ओलावा कमी झाल्यानंतर चेहऱ्यावर बारीक रेषा आणि सुरकुत्या दिसू लागतात. याशिवाय मानसिक तणाव, थकवा आणि पोषक घटकांचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच भरपूर पाण्याचे सेवन आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ त्वचा कायमच हायड्रेट आणि चमकदार ठेवतात. घरगुती पदार्थांपासून बनवलेला फेसपॅक त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासोबतच डेड स्किन कमी करण्यास मदत करतो. घरगुती पदार्थांच्या वापरामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.
जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी दह्याचा वापर केला जातो. तसेच दुपारच्या जेवणात नियमित एक वाटी दही खाल्ल्यास शरीराला भरपूर पोषण मिळेल आणि खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतील. दह्यामध्ये असणारे लॅक्टिक ऍसिड त्वचेमध्ये वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी मदत करते. तसेच थंडीमुळे चेहऱ्यावर वाढलेले लालसरपणा आणि टॅनिंग घालवण्यासाठी दह्याचा वापर करावा. थकवा, टॅनिंग आणि त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी दह्याचा वापर करावा.
थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी, खोकला किंवा घशात वाढलेली खवखव दूर करण्यासाठी मधाचे सेवन केले जाते. याशिवाय रात्री झोपण्याआधी नियमित एक चमचा मध कोमट पाण्यासोबत खाल्ल्यास शरीरात उष्णता टिकवून राहते आणि वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. मधामध्ये नैसर्गिक ह्यूमेक्टंट गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे सैल झालेली त्वचा घट्ट होते. त्वचा दीर्घकाळ मऊ ठेवण्यासाठी मधाचा वापर करावा.
अळशीच्या बिया संपूर्ण शरीरासाठी अतिशय उत्तम मानल्या जातात. रोज सकाळी उठल्यानंतर एक चमचा अळशीच्या बियांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. तसेच यामध्ये असलेले ओमेगा फॅटी ऍसिड त्वचेचे रक्षण करते. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, काळे डाग आणि पिंपल्स इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अळशीच्या बियांपासून बनवलेले जेल चेहऱ्यावर लावावे.
रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर करा ‘या’ तेलाने मसाज, सकाळी उठल्यानंतर चेहरा दिसेल टवटवीत आणि फ्रेश
चंदनचा वापर अनेक वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. चंदनाचा लेप नियमित चेहऱ्यावर लावल्यास त्वचा खूप जास्त शांत होते आणि त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळतो. त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अतिशय महागड्या आणि कोणत्याही स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक आणि घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो आणि त्वचा सुंदर दिसते.






