Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वजन काटा कधीच हलत नाही? मग जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी वेगवेगळे सप्लिमेंट्स घेतले जातात. पण त्याऐवजी योग्य डाएट फॉलो करून वाढलेले वजन कमी करावे. चला तर जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 22, 2026 | 08:20 AM
वजन काटा कधीच हलत नाही? मग जीवनशैलीत करा 'हे' बदल, पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी

वजन काटा कधीच हलत नाही? मग जीवनशैलीत करा 'हे' बदल, पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी

Follow Us
Follow Us:

वजन वाढण्याची कारणे?
वजन कमी करण्यासाठी डाएट?
लठ्ठपणा कशामुळे वाढतो?

भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये लठ्ठपणा आणि वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर शरीरावर अनावश्यक चरबीचा घेर वाढू लागतो. पोट, हात आणि मांड्यावर चरबीचा वाढू लागतो. शरीराचा आकार बदलल्यानंतर महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी तासनतास उपाशी राहणे, व्यायाम, सप्लिमेंट्स तर काहीवेळा वेगवेगळ्या गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण चुकीच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी किडनीच्या आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. त्यामुळे कोणत्याही गोळ्या आणि सप्लिमेंट्स घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे. आहारात बदल करून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. एक ठराविक वजन आल्यानंतर पुढे काही केले तरीसुद्धा वजन कमी होत नाही.(फोटो सौजन्य – istock)

World Brain Day 2026: तणाव, स्क्रीनचा वाढता वापर आणि बैठी जीवनशैलीच्या युगात मेंदूच्या आरोग्याचे संरक्षण

वजन अडकण्यामागे कॅलरीज मुख्य कारण आहे. शरीरात वाढलेल्या जास्त कॅलरीज वजनावर परिणाम करतात. त्यामुळे दिवसाला साधारण १,५०० कॅलरी आणि १०० ग्रॅम प्रोटीन देणारा डाएट फॉलो करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे बदल केल्यास झपाट्याने चरबीचा थेर कमी होईल आणि तुम्ही स्लिम दिसाल. वजन कमी करताना तासनतास उपाशी किंवा न खातापिता राहणे फार चुकीचे आहे. यामुळे शरीराला इतर आजारांची लागण होऊ शकते.

वजन कमी करण्यासाठी जीवनशैलीत करा ‘हे’ बदल:

दिवसाची सुरुवात करताना शरीर हायड्रेट ठेवणे फार आवश्यक आहे. वाढलेल्या वजनामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. त्यामुळे उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यावा. याशिवाय पाण्यात तुम्ही चिया सीड्स किंवा इतर मसाले सुद्धा टाकू शकता. यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा थर कमी होण्यासोबतच आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल. रात्रभर भिजवलेले जिऱ्याचे पाणी प्यायल्यास पचनक्रिया मजबूत राहण्यास मदत होईल.

सकाळच्या नाश्त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश करावा. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते आणि आरोग्य सुधारते. नियमित अंडी, अंड्याचा पांढरा भाग, ब्राउन ब्रेड स्लाइस, बेसन चिला किंवा भाज्यांचा समावेश करावा. यामुळे आरोग्य सुधारते आणि शरीराला खूप जास्त फायदे होतात. तसेच मधल्या वेळी भूक लागल्यानंतर बदाम, एक ग्लास ताक किंवा सफरचंद खावे. यामुळे शरीरात ऊर्जा कायमच टिकून राहते आणि थकवा, अशक्तपणा जाणवत नाही.

दुपारच्या जेवणात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि प्रोटीनयुक्त पदार्थ असलेल्या पदार्थाचे सेवन करावा. याशिवाय सोयाबीन, चपाती आणि भरपूर सॅलड खावे. शिजवलेला राजमा, पनीर. सॅलड इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी, ब्राउन ब्रेडचा सँडविच, दुधात शिजवलेले ओट्स किंवा मखाणे इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.

Health Update: १० पैकी ९ भारतीयांचे कोलेस्ट्रॉल खराब! आयसीएमआरच्या अहवालातून धक्कादायक निष्कर्ष समोर

रात्रीच्या जेवणात पनीर भूर्जी, भाज्या, दही किंवा सोया चंक्स इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. झोपण्याआधी नियमित कोमट दुधात हळद मिक्स करून प्यावी. हळदीचे दूध प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते. हा डाएट नियमित फॉलो केल्यास वजन कमी होण्यासोबतच शरीराला भरमसाट फायदे होतात. याशिवाय रोज किमान ८ हजार ते १० हजार पावले चालणे आवश्यक आहे. आठवड्यातून ३ ते ४ दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करावे. दिवसभरात नियमित ३ ते ४ लिटर पाणी प्यावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वजन काटा कमी होत नसेल तर त्यामागची कारणे कोणती असू शकतात?

    Ans: अयोग्य आहार, कमी शारीरिक हालचाल, अपुरी झोप, ताणतणाव, हार्मोनल बदल आणि वजन कमी झाल्यानंतर आलेला 'वेट लॉस प्लेटू' ही प्रमुख कारणे असू शकतात.

  • Que: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी कोणते बदल करावेत?

    Ans: संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा, साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा, पुरेसे पाणी प्या आणि दररोज ७–८ तासांची झोप घ्या.

  • Que: फक्त चालण्याने पोटावरील चरबी कमी होते का?

    Ans: नियमित वेगाने चालणे फायदेशीर ठरते. मात्र, त्यासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ आणि संतुलित आहार घेतल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात.

Web Title: Is the scale refusing to budge then make these lifestyle changes and the excess fat around your belly will reduce rapidly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 08:20 AM

Topics:  

  • healthy food
  • Weight loss
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

World Junkfood Day : चटकदार चवीची मोठी किंमत! जंक फूडची सवय ठरतेय आरोग्यासाठी घातक, तज्ज्ञांचा सावधानतेचा इशारा
1

World Junkfood Day : चटकदार चवीची मोठी किंमत! जंक फूडची सवय ठरतेय आरोग्यासाठी घातक, तज्ज्ञांचा सावधानतेचा इशारा

Health Tips: चवीच्या नादात जास्त मीठ खाताय? आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक; जाणून घ्या योग्य प्रमाण
2

Health Tips: चवीच्या नादात जास्त मीठ खाताय? आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक; जाणून घ्या योग्य प्रमाण

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? नो डाएटिंग, नो जिम; फक्त रोज करा ‘ही’ ६ कामे
3

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? नो डाएटिंग, नो जिम; फक्त रोज करा ‘ही’ ६ कामे

तळलेले तिखट पदार्थ खाण्याऐवजी पावसाळ्यात घरी बनवा ‘हे’ गरमागरम पौष्टिक सूप, सर्दी खोकल्यापासून राहाल लांब
4

तळलेले तिखट पदार्थ खाण्याऐवजी पावसाळ्यात घरी बनवा ‘हे’ गरमागरम पौष्टिक सूप, सर्दी खोकल्यापासून राहाल लांब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.