Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवळ तेल तूप नाहीतर, दैनंदिन आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास वाढतो हृदयाच्या आजारांचा धोका! चुकीच्या सवयी वाढवतील गंभीर आजार

दैनंदिन आहारात सतत तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे वेळीच चुकीच्या पदार्थांचे सेवन करणे थांबवावे, अन्यथा हार्ट अटॅक किंवा इतर आजारांची लागण होऊ शकते. हे पदार्थ हृदयासाठी ठरतात घातक.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 18, 2026 | 08:00 AM
केवळ तेल तूप नाहीतर, दैनंदिन आहारात 'या' पदार्थांचे सेवन केल्यास वाढतो हृदयाच्या आजारांचा धोका!

केवळ तेल तूप नाहीतर, दैनंदिन आहारात 'या' पदार्थांचे सेवन केल्यास वाढतो हृदयाच्या आजारांचा धोका!

Follow Us
Follow Us:

हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे?
आहारात कोणते पदार्थ खाल्ल्यास हार्ट अटॅक येऊ शकतो?
हृदयाचे आरोग्य कशामुळे बिघडते?

दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, कमी पाण्याचे सेवन, शारीरिक घटकांचा अभाव आणि सतत जंक फूड खाल्ल्यामुळे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. आहारात होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. त्यामुळे आहारात सहज पचन होणाऱ्या आणि कमी तेलकट, तिखट पदार्थांचा समावेश करणे फार आवश्यक आहे. पण कामाच्या धावपळीमध्ये जेवण बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच जंक फूड किंवा विकतच्या पदार्थांचे सेवन करतात. चमचमीत आणि टेस्टी पदार्थ खाण्याची एकदा सवय झाल्यानंतर ती लवकर सुटत नाही. त्यामुळे विकतच्या पदार्थांचे कमीत कमी सेवन करावे.(फोटो सौजन्य – istock)

Blurred Vision: अचानक अंधुक दिसू लागलंय? दुर्लक्ष करू नका; गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

सतत तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक किंवा हृद्यासंबंधित इतर आजार होण्याची जास्त शक्यता असते. तेल किंवा तुपाचे सेवन केल्यामुळे हृदयसंबंधित आजार वाढतात, असे सगळ्यांना कायमच वाटते, पण हा एक गैरसमज आहे. आज आम्ही तुम्हाला दैनंदिन आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यास हृदयाच्या आजारांचा धोका वाढतो, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. वेळीच लक्ष न दिल्यास हार्ट अटॅक किंवा हृदयाच्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे.

प्रोसेस्ड आणि पॅकेज्ड पदार्थ:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चिप्स, स्नॅक्स, नूडल्स, फ्रोजन स्नॅक्स आणि विविध पॅकेज्ड पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पण या पदार्थांमध्ये सोडियम, ट्रान्स फॅट आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज इत्यादी हानिकारक गोष्टींचा वापर केला जातो. त्यामुळे या पदार्थांचे वारंवार सेवन केल्यास हृदय आणि शरीरसंबंधित आजारांचा धोका वाढून आरोग्य बिघडू शकते.

जास्त साखर असलेले पेय:

सॉफ्ट ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस, एनर्जी ड्रिंक्स आणि साखरयुक्त मिठाईचे जास्त सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर सुरुवातीला अतिशय सामान्य वाटणारी लक्षणे दिसून येतात, पण कालांतराने लक्षणे वाढून आरोग्य बिघडते. अतिप्रमाणात गोड खाल्ल्यामुळे वजन वाढू शकते. तसेच कालांतराने हृदयविकाराचा झटका येण्याची जास्त शक्यता असते.

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? नो डाएटिंग, नो जिम; फक्त रोज करा ‘ही’ ६ कामे

जास्त मीठ असलेले पदार्थ:

जेवणासोबत लोणचे, पापड, रेडी-टू-ईट पदार्थ आणि अनेक पॅकेज्ड स्नॅक्स खाण्याची सवय असते. पण या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. बेकन, सॉसेज आणि प्रोसेस्ड मांस नेहमी खाल्ल्यास सॅच्युरेटेड फॅट आणि सोडियमची पातळी झपाट्याने वाढू शकते. तेलात तयार केलेले स्नॅक्स, काही बेकरी पदार्थ आणि डीप-फ्राइड फास्ट फूड्स खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो. त्यामुळे आहारात कायमच पालेभाज्या आणि डाळी, कडधान्ये, सुका मेवा, फळे इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हृदयाच्या आजारांचा धोका वाढवणारे पदार्थ कोणते आहेत?

    Ans: प्रक्रिया केलेले (Processed) पदार्थ, जास्त मीठ असलेले पदार्थ, साखरयुक्त पेये, ट्रान्स फॅट असलेले स्नॅक्स, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स आणि जास्त प्रमाणातील लाल मांस यांचे अतिसेवन धोका वाढवू शकते.

  • Que: केवळ तेल आणि तूपच हृदयासाठी हानिकारक असतात का?

    Ans: नाही. तेल आणि तूप याशिवाय अति साखर, जास्त मीठ, प्रक्रिया केलेले अन्न आणि ट्रान्स फॅटयुक्त पदार्थही हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात.

  • Que: हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात काय समाविष्ट करावे?

    Ans: हिरव्या पालेभाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, सुकामेवा, बिया आणि ओमेगा-३युक्त पदार्थांचा समावेश करावा.

Web Title: It is not just oil and ghee consuming these foods in your daily diet increases the risk of heart disease

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Food Safety
  • Health Care Tips
  • heart attack

संबंधित बातम्या

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश
1

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
2

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

‘या’ सॅलडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कायमच राहाल हेल्दी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला मिळेल ऊर्जा
3

‘या’ सॅलडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कायमच राहाल हेल्दी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला मिळेल ऊर्जा

Heart Attack: गॅस-अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्ष करू नका! महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी; ‘हे’ संकेत ओळखा
4

Heart Attack: गॅस-अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्ष करू नका! महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी; ‘हे’ संकेत ओळखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.