Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीराच्या ‘या’ भागांमध्ये खाज किंवा जळजळ झाल्यास उद्भवू शकतात आरोग्यासंबंधित गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध

शरीराच्या अवयवांवर खाज आल्यानंतर अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मात्र असे केल्यामुळे शरीरातील आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या अवयवांवर खाज आल्यानंतर शरीरात कोणते आजार होऊ शकतात, याबद्दल सांगणार

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 10, 2024 | 01:45 PM
खाज किंवा जळजळ झाल्यास उद्भवू शकतात आरोग्यासंबंधित गंभीर समस्या

खाज किंवा जळजळ झाल्यास उद्भवू शकतात आरोग्यासंबंधित गंभीर समस्या

Follow Us
Close
Follow Us:

वाढत्या वयानुसार शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता योग्य ती काळजी घेत जीवन जगणे आवश्यक आहे. शरीरामध्ये कोणताही आजार झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र कालातंराने हळूहळू आरोग्यासंबंधित अनेक समस्या जाणवण्यास सुरुवात होते. कोणताही आजार झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये थकवा जाणवणे, खाण्यापिण्याची इच्छा न होणे, आवाजात बदल, पोटात बदल, त्वचेचा रंग बदलणे, छातीत दुखणे किंवा दाब, झोपेचा त्रास, वजन वाढणे, पायांवर सूज येणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. मात्र या लक्षणांकडे काहीवेळा दुर्लक्ष केले जाते. असे केल्यामुळे शरीरात झालेला आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी लक्ष देऊन आरोग्याची नीट काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य-istock)

स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

शरीरात बदल होऊ लागल्यानंतर प्रामुख्याने जाणवू लागणारी समस्या म्हणजे अंगाला खाज येणे. अंगाला खाज येऊ लागल्यानंतर अनेकदा दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. शरीराच्या ठराविक भागांमध्ये सतत खाज येण्यास सुरुवात झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष देऊन मोठे आजारांपासून शरीराचं बचाव करावा. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीराच्या कोणत्या अवयवांवर खाज आल्यानंतर दुर्लक्ष करू नये, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

पोटाला खाज येणे:

अनेकदा पोटाला खाज आल्यानंतर काही लोक दुर्लक्ष करतात. मात्र असे केल्यामुळे आरोग्य आणखीन बिघडण्याची शक्यता असते. पोटाला खाज आल्यानंतर यकृत किंवा पित्त मूत्राशयाशी संबंधित आजार असण्याची शक्यता असते. हिपॅटायटीस, पित्ताशयातील खडे किंवा इतर यकृत रोगांमुळे पोटावर खाज येते. पोटावर खाज येण्यास सुरुवात झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.

हात आणि पायांना खाज येणे:

हात पायांना खाज येणे हे त्वचेसंबंधित समस्यांचे लक्षणं असू शकते. बुरशीजन्य संसर्ग झाल्यानंतर हातापायांच्या बोटांना आणि त्वचेवर खाज येऊ लागते. त्वचेवर खाज आल्यानंतर सूज, चिडचिड किंवा लालसरपणा ही लक्षणे दिसू लागतात. त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.

स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

त्वचेला खाज येणे:

त्वचेला खाज येणे हे जळजळ, ऍलर्जी किंवा एक्जिमा, सोरायसिस इत्यादी गंभीर आजाराचे लक्षण असण्याची शक्यता असते. तसेच यकृत किंवा मूत्रपिंडाच्या आजारांसारख्या अंतर्गत समस्यांमुळे त्वचेवर खाज येते. त्वचेवर खाज येण्यास सुरुवात झाल्यानंतर त्वचा लाल होऊन जाते. अंगाला खाज सुटण्यास सुरुवात झाल्यानंतर योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Itching or inflammation in these parts of the body can cause serious health problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 01:45 PM

Topics:  

  • Skin disease
  • skin problem

संबंधित बातम्या

भेंडीच्या भाजीसोबत चुकूनही करू नका या पदार्थांचे सेवन, किडनीस्टोन आणि त्वचारोगाचा वाढेल गंभीर धोका
1

भेंडीच्या भाजीसोबत चुकूनही करू नका या पदार्थांचे सेवन, किडनीस्टोन आणि त्वचारोगाचा वाढेल गंभीर धोका

वाढत्या पाऱ्यासह प्रदूषणाचा दुहेरी फटका! श्वसनविकार आणि Skin Allergy पासून कसं वाचायचं? तज्ज्ञांचा सल्ला
2

वाढत्या पाऱ्यासह प्रदूषणाचा दुहेरी फटका! श्वसनविकार आणि Skin Allergy पासून कसं वाचायचं? तज्ज्ञांचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.