Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या पाऱ्यासह प्रदूषणाचा दुहेरी फटका! श्वसनविकार आणि Skin Allergy पासून कसं वाचायचं? तज्ज्ञांचा सल्ला

गरम हवा आणि प्रदूषणातील सूक्ष्म कण फुफ्फुसांमध्ये जळजळ निर्माण करतात, ज्यामुळे दमा, खोकला, छातीत घरघर होणे आणि दम लागणे यासारखी लक्षणं दिसून येतात. याबाबत विशेष मार्गदर्शन त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शरीफा चौसे यांनी केलं आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 08, 2026 | 04:17 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • वायुप्रदूषणही नागरिकांच्या आरोग्यास घातक
  • हवामान आणि प्रदूषण एकत्रित घातक
  • लोकांनी अधिक सतर्क असणं गरजेचं
Heat Pollution Health Risks : सध्या वाढत्या उष्णतेसह शहरांमध्ये वाढणारे वायुप्रदूषणही नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते, उष्ण हवामान आणि प्रदूषण यांचा एकत्रित परिणाम श्वसनविकारांसोबतच त्वचारोगांनाही कारणीभूत ठरत आहे. विशेषतः लहान मुले, वयोवृद्ध आणि आधीपासून अॅलर्जी किंवा दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींना याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. गरम हवा आणि प्रदूषणातील सूक्ष्म कण फुफ्फुसांमध्ये जळजळ निर्माण करतात, ज्यामुळे दमा, खोकला, छातीत घरघर होणे आणि दम लागणे यासारखी लक्षणं दिसून येतात. याबाबत विशेष मार्गदर्शन त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शरीफा चौसे यांनी केलं आहे.

गॅस किंवा पाळीचा त्रास समजून दुर्लक्ष करणाऱ्या वेदना असू शकतात कँसरचा धोका, डॉक्टरांचा महिलांना इशारा

अधिक तीव्र होऊ शकतो त्रास

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हवेत असलेले सूक्ष्म धूलिकण(PM2.5, PM10), धूर, रासायनिक घटक आणि वाहनांमधून निघणारे वायू हे श्वसनमार्गाच्या समस्येस आमंत्रण देतात. यामुळे दमा असलेल्या रुग्णांमध्ये खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत जडपणा अशा लक्षणांमध्ये वाढ दिसून येते. उष्णतेमुळे हवेत ओलावा आणि प्रदूषकांचे प्रमाण वाढल्याने हा त्रास अधिक तीव्र होऊ शकतो.

प्रदूषणाचा परिणाम त्वचेवरही

प्रदूषणाचा परिणाम एखाद्याच्या त्वचेवरही होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे, त्यामुळे घरातील वातावर थंड राखण्यासाठी एसी, कुलरचा आधार घेतला जातो. मातेर अशावेळी बाहेरच्या व घराच्या आतील वातावरणातील झालेल्या बदलांमुळे जंतुसंसर्गाचा त्रास वाढत जातो. हवेत असलेले विषारी कण त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये जाऊन अडथळा निर्माण करतात. यामुळे मुरुम येणे, त्वचेवर रॅशेस येणे, त्वचेची जळजळ वाढणे, खाज येणे आणि अॅलर्जीसारखे त्रास वाढू शकतात. उष्णतेमुळे घामाचे प्रमाण वाढते, आणि त्यात प्रदूषणामुळे त्वचेवर बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता अधिक असते. उष्णता, घाम आणि धुळीमुळे नायटा, गजकर्ण, त्वचेची ऍलर्जी, पुरळ उठणे आणि खाज सुटणे या समस्या वाढतात. अति उष्णतेमुळे देखील त्वचा कोरडी पडते आणि त्वचेची जळजळ होते.

लोकांनी अधिक सतर्क असणं गरजेचं

विशेषतः शहरी भागांमध्ये राहणाऱ्या लोकांनी याबाबत अधिक सतर्क असणे गरजेचे आहे. दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळावे, आवश्यक असल्यास मास्कचा वापर करावा, तसेच घरी आल्यावर चेहरा आणि हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी हलक्या, नॉन-ऑइली मॉइश्चरायझरचा वापर करणे आणि भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.

दमा म्हणजे श्वसनमार्गास सूज येऊन ते अरुंद होणे, विविध पर्यावरणीय घटकांमुळे दम्याचा त्रास वाढू शकतो, ज्यामध्ये उन्हाळ्यातील उष्णता आणि ऍलर्जी ही महत्त्वाची कारणं आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दम्याच्या रुग्णांनी नियमित औषधांचे सेवन करणे घेणे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपचारात बदल न करणे गरजेचे आहे. घरात एअर प्युरिफायरचा वापर करणे, झाडं लावणे आणि घर स्वच्छ ठेवणे यामुळे प्रदूषणाचा परिणाम कमी करता येऊ शकतो. एकूणच, उष्णता आणि प्रदूषण हे एकत्रितपणे आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो. त्यामुळे योग्य प्रतिबंधक उपाययोजना आणि वेळोवेळी काळजी घेतल्यास दमा आणि त्वचारोगांचा धोका कमी करता येतो.

उन्हाळ्यात मुंबईपासून जवळ महाराष्ट्रातील या सुंदर ठिकाणांना भेट द्या, इथले सौंदर्य तुमची समर ट्रिप करतील संस्मरणीय

Web Title: Heat pollution health risks skin allergy asthma prevention see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • health awareness
  • Heat Waves
  • lifestyle news
  • Marathi News
  • Skin disease

संबंधित बातम्या

Amazon Case : ‘तलवारीने डास मारण्यासारखा प्रकार!’ ॲमेझॉन प्रकरणी हायकोर्टाने FDA ला सुनावले
1

Amazon Case : ‘तलवारीने डास मारण्यासारखा प्रकार!’ ॲमेझॉन प्रकरणी हायकोर्टाने FDA ला सुनावले

NUCFDC Headquarter : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! NUCFDC चे मुख्यालय मुंबईत होणार; अमित शाह यांची घोषणा
2

NUCFDC Headquarter : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! NUCFDC चे मुख्यालय मुंबईत होणार; अमित शाह यांची घोषणा

Government Spending : तिजोरी रिकामी झाली हो… सरकारी खर्चामुळे मेटाकुटीला आलेत ‘हे’ देश; परिस्थिती झाली ‘बेहाल’
3

Government Spending : तिजोरी रिकामी झाली हो… सरकारी खर्चामुळे मेटाकुटीला आलेत ‘हे’ देश; परिस्थिती झाली ‘बेहाल’

All The Best : महाराष्ट्र गाजवल्यानंतर ‘ऑल दि बेस्ट’चा डंका सातासमुद्रापार, तारखा जाणून घ्या…
4

All The Best : महाराष्ट्र गाजवल्यानंतर ‘ऑल दि बेस्ट’चा डंका सातासमुद्रापार, तारखा जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.