इस्लाममध्ये रमजानच्या (Ramadan 2023) पवित्र महिन्यामध्ये प्रत्येक मुसलमान जकात देत असतो. रमजानच्या महिन्यामध्ये रोजा (Roja), नमाज आणि कुराण वाचण्यासोबतच जकात आणि फितरा देण्यालाही खास महत्त्व आहे. जकात इस्लामच्या 5 स्तंभापैकी एक आहे. रमजानच्या महिन्यामध्ये ईदच्या (Ramadan Eid) दिवशी नमाजच्या आधी ससुरा आणि सका देणं प्रत्येक मुसलमानासाठी आवश्यक मानलं जातं.
[read_also content=”देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 7633 नवे रुग्ण आढळले; 11 जणांचा मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या 61000 पार https://www.navarashtra.com/latest-news/in-the-last-24-hours-7633-new-corona-patients-were-found-in-the-country-11-people-died-nrps-386728.html”]
गाजावाजा न करता द्यावा जकात (Zakat And Fitra)
अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे मुफ्ती जाहिद अली सांगतात की, इस्लामनुसार ज्या मुसलमानाजवळ स्वत:च्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण केल्यानंतरही पैसे उरतात तो दान करण्यासाठी पात्र आहे. इस्लामनुसार या दानाचं दोन विभागामध्ये विभाजन केलं जातं. फितरा आणि जकात मुफ्ती. जाहिद अली सांगतात की, जर कोणी व्यक्ती जकात देत असेल तर त्याने त्याचा गाजावाजा न करता ते गुप्तपणे द्यावे. आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या व्यक्तीलाही आपण जकात घेतोय या गोष्टीची जाणीव करून देऊ नये. त्याच्यावर कोणीतरी उपकार करतंय असं जर त्याला वाटलं तर जकातचं महत्त्व कमी होतं.
उत्पन्नाचा 2.5 टक्के हिस्सा करावा दान
इस्लाममध्ये रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये ईदची नमाज अदा करण्याआधी ज्याची आर्थिक कुवत आहे त्या मुसलमानाने जकात देणं आवश्यक आहे. उत्पन्नातून वर्षभरात जी बचत होते त्याच्या 2.5 टक्के हिस्सा गरीब किंवा गरजू माणसाला दिला जातो, त्यालाच जकात म्हणतात. जर कोणत्या मुसलमानाजवळ सगळे खर्च केल्यानंतर 100 रुपये उरत असतल तर त्यातले 2.5 रुपये गरीबाला दान करायला हवे. यालाच जकात म्हणतात. जकातमध्ये 2.5 रुपये देणं निश्चित आहे. तर फितराला कोणतीही मर्यादा नाही. माणूस आपल्या कुवतीनुसार कितीही रक्कम फितरा म्हणून देऊ शकतो. गरीब आणि श्रीमंत सगळ्यांनाच ईद हा सण आनंदाने साजरा करण्यात यावा यासाठी जकात आणि फितरा देण्याची प्रथा आहे.