
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
Janmashtami Recipe: राज्यभरात सगळीकडे श्री कृष्ण जन्माष्टमीचा मोठा आनंद आणि उत्साह आहे. जन्माष्टमीच्या दिवशी उपवास करून रात्री १२ वाजता कृष्णाची पूजा केली जाते. याशिवाय कृष्णाला वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य सुद्धा अर्पण केला जातो. माखन मिश्री, गोपालकाला, पिंजरी, लोणी हे पदार्थ श्री कृष्णाला खूप जास्त आवडतात. याशिवाय नैवेद्यात पंचामृत सुद्धा अर्पण केले जाते. याच पंचामृताचा वापर करून तुम्ही केक सुद्धा बनवू शकता. श्रीकृष्णच्या नैवेद्यात कायम तेच ठराविक पदार्थ बनवण्याऐवजी या पद्धतीने पंचामृत केक सुद्धा बनवू शकता. यामुळे सणांचा गोडवा आणखीनच वाढेल आणि घरातील मुलं सुद्धा खुश होतील. पंचामृताचा सुगंध आणि सुका मेवा वापरून बनवलेला केक केवळ नैवेद्यासाठीच नाहीतर इतर वेळी सुद्धा घरात खाण्यासाठी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पंचामृत केक बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)