Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जसलोक हॉस्पिटलची कमाल! कोणतीही शस्त्रक्रिया न करता ‘रोबोटिक’ पद्धतीने कर्करोगावर मात

Jaslok Hospital robotic surgery on rectal cancer: मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने ७५ वर्षीय रुग्णावर रोबोटिक ‘ट्रान्स-अॅनल मिनिमली इनव्हेसिव्ह सर्जरी’ (TAMIS) यशस्वीपणे करून सुरुवातीच्या टप्प्यातील गुदाशयाचा कर्करोग मोठ्या शस्त्रक्रियेविना पूर्णपणे काढून टाकला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 17, 2026 | 05:15 PM
जसलोक हॉस्पिटलची कमाल! कोणतीही शस्त्रक्रिया न करता ‘रोबोटिक’ पद्धतीने कर्करोगावर मात
Follow Us
Follow Us:
  • जसलोक हॉस्पिटलची कमाल
  • कोणतीही शस्त्रक्रिया न करता कर्करोगावर मात
  • रोबोटिक ट्रान्स-अॅनल मिनिमली इनव्हेसिव्ह सर्जरी
मुंबई : मुंबईतील नामांकित ‘जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर’ने वैद्यकीय क्षेत्रात एक नवा टप्पा गाठला आहे. जसलोक हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्ण श्री. जे. एम. यांच्यावर अत्यंत प्रगत अशी ‘रोबोटिक ट्रान्स-अॅनल मिनिमली इनव्हेसिव्ह सर्जरी’ (टीएएमआयएस) यशस्वीपणे पार पाडली आहे. या प्रक्रियेमुळे पोटावर कोणताही मोठा छेद न घेता, गुदाशय न काढता किंवा कायमस्वरूपी कृत्रिम विष्ठा मार्ग (स्टोमा) न बनवता सुरुवातीच्या टप्प्यातील गुदाशयाचा कर्करोग पूर्णपणे काढून टाकण्यात यश आले आहे.

‘An Apple a Day’ फक्त म्हण नाही! सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यास मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

रुग्णाला विष्ठेमधून रक्त येण्याचा त्रास होत होता, ज्यानंतर तपासणीत त्यांच्या गुदाशयात ४ ते ५ सेमी आकाराची मोठी गाठ आढळली. पुढील तपासणीत स्थानिक पातळीवर मर्यादित असलेल्या सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोगाची पुष्टी झाली. पारंपरिक पद्धतीनुसार यासाठी मोठी शस्त्रक्रिया करावी लागते, ज्यामध्ये गुदाशय काढून पोटात कृत्रिम मार्ग तयार करावा लागतो (जिथे विष्ठा पिशवीत गोळा होते). मात्र, रुग्णाचे वय ७५ वर्षे असणे आणि त्यांना मधुमेह, हृदयविकार व यकृताचा आजार असल्याने पारंपरिक शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची होती.

यावर उपाय म्हणून जसलोक हॉस्पिटलच्या बहुविद्याशाखीय टीमने ‘दा विंची सर्जिकल रोबोट’ वापरून नैसर्गिक गुदा मार्गाद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या रोबोटिक प्लॅटफॉर्मच्या अचूकतेमुळे अवयवांचे कार्य सुरक्षित ठेवून कर्करोगाची गाठ यशस्वीपणे काढून टाकण्यात आली. यामुळे रुग्णाची प्रकृती वेगाने सुधारली आणि त्यांना अवघ्या २ दिवसांत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. अंतिम पॅथॉलॉजी रिपोर्टनुसार रुग्णाचा आजार पूर्णपणे बरा झाला असून, शस्त्रक्रियेला ८ महिने उलटून गेल्यानंतरही रुग्ण पूर्णपणे कर्करोगमुक्त आहे. या शस्त्रक्रियेचे नेतृत्व जीआय सर्जरी व रोबोटिक कोलोरेक्टल सर्जरीचे कन्सल्टंट डॉ. चिंतामणी गोडबोले यांनी केले, तर त्यांना ज्‍युनिअर कन्सल्टंट डॉ. पर्णाशा आणि भूलतज्ज्ञांच्या टीमने सहकार्य केले.

जीआय सर्जरी आणि रोबोटिक कोलोरेक्टल सर्जरीचे कन्सल्टंट डॉ. चिंतामणी गोडबोले म्हणाले, “रोबोटिक ‘टीएएमआयएस’ ही गुंतागुंतीच्या गाठींच्या उपचारांमधील एक महत्त्वपूर्ण प्रगती आहे. वृद्ध व वैद्यकीयदृष्ट्या नाजूक रुग्णांमध्ये पारंपरिक शस्त्रक्रियेमुळे मोठे धोके निर्माण होऊ शकतात. रोबोटिक प्लॅटफॉर्म उत्तम अचूकता आणि दृश्यमानता प्रदान करतो, ज्यामुळे मोठी शस्त्रक्रिया टाळून प्रभावी कर्करोग उपचार देणे शक्य होते.”

कृतज्ञता व्‍यक्त करत श्री. जे.एम. म्‍हणाले, “माझ्या वयात आणि आजारपणामुळे मोठ्या शस्त्रक्रियेचा विचार भीतीदायक होता. पण डॉक्टरांनी मला धीर दिला. ही शस्त्रक्रिया मी विचार केला होता त्यापेक्षा खूप सुलभ झाली आणि मी लवकरच माझ्या सामान्य दिनचर्येत परतलो.”

जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे सीईओ श्री. जितेंद्र हरियान म्‍हणाल, “यासारख्या केसेस आरोग्य क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करतात. एखाद्या वृद्ध रुग्णाने अत्यंत कमी त्रासाच्या उपचारांद्वारे कर्करोगावर यशस्वी मात करणे कमालीचे समाधान देणारे आहे. प्रगत तंत्रज्ञान व तज्ज्ञ वैद्यकीय काळजी एकत्र आणण्यावर जसलोकचा भर कायम आहे.”

बदलती जीवनशैली ठरतेय धोकादायक; मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबामुळे वाढतोय रक्तवाहिन्यांच्या आजारांचा धोका

Web Title: Jaslok hospital robotic tamis surgery rectal cancer treatment mumbai da vinci robot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • cancer
  • daily health tips
  • Jaslok Hospital
  • Robot

संबंधित बातम्या

५ वर्षांपासून कानात येणाऱ्या ‘हृदयाच्या ठोक्यांसारख्या’ आवाजापासून मुक्ती; जसलोक हॉस्पिटलमध्ये २५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार
1

५ वर्षांपासून कानात येणाऱ्या ‘हृदयाच्या ठोक्यांसारख्या’ आवाजापासून मुक्ती; जसलोक हॉस्पिटलमध्ये २५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल
2

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.