Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांची कमाल! मेंदूच्या मुख्य धमनीजवळ अडकलेली गोळी सुरक्षितपणे काढली

जळगावमधील गोळीबाराच्या घटनेत एका व्यक्तीच्या कवटीच्या तळाशी गोळी अडकली होती. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या धमनीजवळ अडकलेली ही गोळी बाहेर काढण्याचे आव्हान मुंबईतील जे.जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी यशस्वीपणे पेलले.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 17, 2026 | 01:03 PM
जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांची कमाल! मेंदूच्या मुख्य धमनीजवळ अडकलेली गोळी सुरक्षितपणे काढली

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांची कमाल! मेंदूच्या मुख्य धमनीजवळ अडकलेली गोळी सुरक्षितपणे काढली

Follow Us
Follow Us:
  • गोळी कवटीच्या तळाशी महत्त्वाच्या रक्तवाहिनीजवळ अडकली होती.
  • गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली.
  • न्यूरोसर्जरी आणि कान-नाक-घसा विभागाच्या डॉक्टरांनी समन्वयातून शस्त्रक्रिया केली.
जळगावमध्ये फायरिंगच्या घटनेत कानशिलावर पिस्तूल रोखलेले असताना संबंधित व्यक्तीने अचानक हालचाल केल्याने गोळी मेंदूत घुसण्याऐवजी कवटीच्या तळाशी अडकली. त्यामुळे मेंदूला थेट इजा होण्याचा धोका टळला, मात्र मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या धमनीच्या अगदी जवळ कवटीच्या तळाशी अडकलेली एक सेंटीमीटरची गोळी सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे आव्हान जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीरीत्या पेलले. अत्यंत नाजूक भागात अडकलेली ही गोळी बाहेर काढताना रक्तवाहिनीला इजा होण्याचा धोका होता. मात्र, आधुनिक तंत्रज्ञान, अचूक नियोजन आणि न्यूरोसर्जरी व कान-नाक-घसा विभागाच्या डॉक्टरांच्या समन्वयातून ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

इंडोनेशिया ते थायलंड… जगभरातील या देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होते रामलीला

कवटीच्या तळाचा भाग शस्त्रक्रियेसाठी अत्यंत संवेदनशील

वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे.जे. समूह रुग्णालयातील डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली. कवटीच्या तळाचा भाग हा शस्त्रक्रियेसाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो. त्यातच गोळी अंतर्गत कैरोटिड धमनीच्या जवळ अडकली होती. ही धमनी मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या प्रमुख रक्तवाहिन्यांपैकी एक आहे. त्यामुळे गोळीचे अचूक स्थान शोधणे आणि बाजूच्या महत्त्वाच्या संरचनांना इजा न करता ती बाहेर काढणे हे डॉक्टरांसमोरील मोठे आव्हान होते. या शस्त्रक्रियेसाठी न्यूरो नेव्हिगेशन तंत्रज्ञान, सी-आर्म इमेजिंग आणि एंडोस्कोपिक तंत्राचा वापर करण्यात आला.

या डॉक्टरांनी बजावली अत्यंत मोलाची भूमिका

न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. व्हर्नन वेल्हो आणि कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली. न्यूरोसर्जरी विभागाचे डॉ. हृषिकेश, कान-नाक-घसा विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. नवीन सिंह यांच्यासह भूलतज्ज्ञ डॉ. अनंतन कृष्णन आणि निवासी डॉक्टर डॉ. अरुनंधी यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. अत्यंत जोखमीच्या भागात अडकलेली गोळी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बाहेर काढल्याने जे.जे. रुग्णालयातील बहुविभाग उपचारपद्धती आणि डॉक्टरांच्या कौशल्याचे दर्शन घडले.

Cortisol Hormone: सकाळी उपाशी पोटी चहा कॉफी पिता? कॉर्टिसॉल हॉर्मोनच्या पातळीमध्ये बिघडल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

जेजे रुग्णालयातील डॉ. श्रीनिवास चव्हाण म्हणाले की, “गोळी आकाराने लहान होती आणि मेंदूच्या आजूबाजूच्या अतिशय नाजूक भागात अडकली होती. त्यामुळे तिचे अचूक स्थान शोधणे हे मोठे आव्हान होते. मात्र, सी-आर्म, न्यूरो नेव्हिगेशन आणि एंडोस्कोपी तंत्रज्ञानाची मदत झाल्याने गोळीचे स्थान निश्चित करून ती सुरक्षितपणे बाहेर काढता आली. मेंदूच्या या नाजूक भागातून गोळी काढण्यासाठी सुमारे चार तास लागले. जळगावमध्ये १२ ऑक्टोबरला गोळी लागल्याची घटना घडली. त्यानंतर रुग्णाला १३ ऑक्टोबरला जे.जे. रुग्णालयात आणण्यात आले आणि १४ ऑक्टोबरला शस्त्रक्रिया करून गोळी काढण्यात आली”.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Jj hospital doctors successful surgery bullet removed near brain artery jalgaon patient nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • Brain Surgery
  • Hospital
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी
1

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी

मुंबईत रक्ताचा तुटवडा? केईएम रुग्णालयात रक्त आणि पीआरबीसीसाठी नातेवाइकांची धावपळ
2

मुंबईत रक्ताचा तुटवडा? केईएम रुग्णालयात रक्त आणि पीआरबीसीसाठी नातेवाइकांची धावपळ

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!
3

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!

Brain Disease: अनेक वर्षे स्ट्रोक समजून चालू होते उपचार! मेंदूच्या दुर्मिळ आजारामुळे निदानातील त्रुटी उघड, जाणून घ्या सविस्तर
4

Brain Disease: अनेक वर्षे स्ट्रोक समजून चालू होते उपचार! मेंदूच्या दुर्मिळ आजारामुळे निदानातील त्रुटी उघड, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.