
उतारवयातही त्वचा राहील तेजस्वी! नियमित फॉलो करा 'या' स्किन केअर टिप्स, उतारवयातही मिळेल चमकदार ग्लो
जर तुमचे वय साठ पेक्षा पुढे गेले असेल तर तुम्ही त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. याच काळात तुम्हाला तुमच्या त्वचेची योग्य आणि जास्त काळजी घ्यावी लागते. निरोगी आणि समतोल आहारासोबत त्वचेची थोडीफार काळजी घेतल्यास तुमचे सौंदर्य दीर्घकाळ टिकू शकते. त्यामुळे उतारवयात पण सुंदर आणि तेजस्वी त्वचा मिळवू शकता. बऱ्याचदा वय वाढल्यानंतर त्वचेच्या असंख्य समस्या उद्भवू लागतात. पण सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. कालांतराने चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, त्वचा कोरडी पडणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. अशावेळी सर्वच महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किनचा वापर त्वचेसाठी करतात. पण वारंवार केमिकल युक्त स्किन केअरचा वापर त्वचेसाठी करणे फायदेशीर नाही. त्वचेला सूट होईल अशाच स्किन केअरचा वापर त्वचेसाठी करावे.चला तर जाणून घेऊया उतार वयात त्वचेची काळजी कशी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)
उतारवयात त्वचा कोरडी आणि निस्तेज बनते. झोपण्यापूर्वी जेल-आधारित फेसवॉशने चेहरा धुणे केव्हाही चांगले. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. चेहरा धुताना साबण टाळावा, साबणामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते.उतारवयात त्वचेतील नैसर्गिक तेलाचे
प्रमाणे कमी होते त्यामुळे त्वचा कोरडी दिसू लागते. त्वचेतील ओलावा कायम ठेवण्यासाठी चांगल्या मॉइस्चरायजरचा वापर करावा. हर्बल आणि रसायन मुक्त मॉइस्चरायजर मुळे तुमच्या त्वचेची चमक अधिक वाढू शकते.
सूर्यप्रकाशात असणारी अतिनील किरणे तुमच्या त्वचेसाठी हानिकारक असतात, त्यामुळे घरातून बाहेर पडताना सनब्लॉकचा वापर करावा. अतिनील किरणांमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि काळे डाग वाढू शकतात आणि काही जणांना कर्करोगाचा पण धोका असतो.
Monsoon Skin Care: पावसाळ्यात स्किन डल झालीये? घरी तयार करा नैसर्गिक टोनर, चेहऱ्यावर येईल ग्लो
सौंदर्यप्रसाधनांमधील घातक व हानिकारक रसायनांमुळे तुमची त्वचा निस्तेज दिसू शकते. त्याऐवजी नैसर्गिक सौंदर्यप्रसाधने आणि हेअर केअर प्रॉडकट्स वापरावेत ज्यामधे कोरफड, ऑलिव्ह ऑइल किंवा नारळाच्या तेलाचा समावेश असेल. याने तुमच्या त्वचेचा टेक्सचर सुधारण्यास मदत होईल.फळ आणि भाज्यांचा तुमच्या आहारात समावेश करा. शिमला मिरची मुळे शरीरातील रक्त संचलन चांगले होते आणि चेह-यावर सुरकुत्या येत नाहीत. व्हिटॅमिन-सी असणाऱ्या फळांमुळे उतारवायत कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.